Health Care : नारळ पाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नारळपाणी हे इंस्टंट एनर्जी बुस्टरचं काम करतं. यासाठीच अशक्तपणा किंवा तब्येत खालावलेली असताना नारळ पाण्याचं सेवन केलं जातं. Health Tips Marathi Does coconut water helpful to diabetic patients
नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक साखर Natural Sugar असल्याने एनर्जी येण्यास मदत होते. मात्र अनेक मधुमेही रुग्णांना Diabetic Patients नारळ पाण्याच सेवन करावं की नाही असा प्रश्न कायम पडतो.
मधुमेही रुग्णांना जास्त गोड फळं, कोल्ड्रिक तसचं ट्रेट्रा पॅकमधील ज्यूसचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थांमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. मात्र नारळ पाणीदेखील चवीला गोड असल्याने मधुमेही रुग्णांनी त्याचं सेवन करावं का ? असा प्रश्न देखील निर्माण होतं.
मधुमेही रुग्णांसाठी नारळ पाण्याचं सेवन
नारळ पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, प्रोटीन तसंच इलेक्ट्रोलाइट आणि विटामिन सी सारखी पोषक तत्व उपलब्ध असतात. तसंच नारळ पाण्यामध्ये कॅलरीचं प्रमाण शून्य असत. तसंच याच फॅट्सचं प्रमाण अत्यल्प असतं.
नारळ पाणी चवीला गोड असलं तरी यात साखरेचं प्रमाण अगदी कमी असतं. त्यामुळे मधुमेह असलेले रुग्ण नारळ पाण्याचं सेवन नक्कीच करू शकतात. नारळ पाण्यात असलेल्या मॅग्नेशियममुळे इंसुलिन इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते.
नारळ पाण्यामुळे ब्लड शुगर राहते नियंत्रणात
नारळ पाण्याचा ग्लाइसेमिक इंडेक्सही कमी म्हणजेच केवळ ३ इतका असतो त्यामुळे ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते. ५५ हून कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
नारळ पाण्यामध्ये फ्रुक्टोज म्हणजेच नैसर्गित साखर उपलब्ध असते. ही साखर योग्य प्रमाणात शरीरात गेल्यास त्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत.
हे देखिल वाचा-
एका दिवसात किती नारळ पाण्याच सेवन करावं.
आरोग्य तज्ञांच्या मते मधुमेह असलेल्या रुग्ण दिवसभरात १ कप किंवा २० मिली नारळाच्या पाण्याचं सेवन करू शकतात. जास्त प्रमाणात नारळ पाण्याचं सेवन मात्र आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. खास करून ज्या व्यक्ती सकाळी इंसुलिनचं इंजेक्शन घेत असतील त्यांनी नारळ पाण्याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
नारळ पाण्याचे आरोग्यासाठी इतर फायदे
नारळ पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयासंबधीच्या इतर समस्या देखील दूर होतात.
नारळ पाण्यातील पोषक तत्वांमुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.
नारळ पाण्यातील फायबर आणि मॅग्नेशियमुळे पचनासंबधीच्या समस्या दूर होतात. यासाठी ज्यांना पचनक्रियेच्या समस्या असतील त्यांनी नियमितपणे उपाशीपोटी नारळ पाण्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
अशा प्रकारे आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या नारळ पाण्याचं योग्य प्रमाणातील सेवन मधुमेही रुग्णांसाठी देखील लाभदायक ठरू शकतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.