शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे किडनी. किडनी म्हणजेच मूत्रपिंड Kidney हे शरीरातील रक्त Blood शुद्ध करून शरीरातील घाण मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचं काम करतं. त्यामुळे किडनीमध्ये बिघाड झाल्यास किंवा किडनीच्या समस्या Kidney Problems निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. Health Tips Marathi symptoms of Kidney Cancer and its cure
जेव्हा किडनीमधील पेशींच्या कार्यात बिघाड होतो आणि त्या प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागतात तेव्हा किडनीमध्ये ट्युमर होवू लागतो यालाच किडनीचा कर्करोग Cancer म्हणतात. गेल्या काही वर्षामध्ये किडनीच्या कर्करोगाचं प्रमाण वाढू लागलं आहे.
वेळेत जर स्क्रिनिंग करून उपाचार सुरु केले नाहीत तर हा कर्करोग Kidney Cancer जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळेच काही प्राथमिक लक्षणं Symptoms दिसताच स्क्रिनिंग करून घेतल्यास किडनीच्या कर्करोगावर उपचार करून त्यातून बाहेर पडणं शक्य आहे.
किडनीचा कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये छोट्या ट्यूबच्या अस्तरांमध्ये दिसून येतो. या प्रकारच्या मूत्रपिंडाच्या कर्करोगाला रेनल सेल कार्सिनोमा म्हणतात. किडनीचा कर्करोग हा केवळ एकच आजार नसून यामध्ये इतर अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत. त्यामुळे त्या कर्करोगाच्या प्रकारानुसार उपचार करणं गरजेंच असतं.
किडनीचा कॅन्सर कधी होतो?
किडनी ही अनेक पेशींच्या थरांनी बनलेली असते. यापैकी कोणत्याही एका थराला किंवा सगळ्या थरांवर कर्करोगाचा प्रभाव होवू शकतो. जेव्हा शरीरामध्ये पेशींचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढू लागतं. तेव्हा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते.
मूत्रपिंडातही अशा पेशी वाढल्यास किडनीच्या कार्यात अडथळा येऊन कार्यात बिघाड येतो. कॅन्सर किंवा ट्यूमरचं प्रमाण वाढत गेल्यास त्यास मेटास्टेसिस म्हटलं जातं. जेवढा जास्त कॅन्सर पसरतो त्यावर उपचार करणं कठिण होतं आणि धोका वाढत जातो.
हे देखिल वाचा-
किडनीच्या कर्करोगाची लक्षणं
मूत्रपिंडाच्या कर्करोगामध्ये सुरुवातीला कोणती लक्षणं दिसून येत नाहित. मात्र जसं जसा ट्युमर वाढू लागतो. काही लक्षणं दिसू लागतात.
किडनीच्या कॅन्सरच्या लक्षणांमध्ये लघवीतून रक्त येणं हे एक लक्षण आहे.
तुमच्या हातामध्ये किंवा पोटामध्ये गाठ तयार होणं.
भूक न लागणे.
पोटात न थांबणाऱ्या वेदना.
कोणतही इतर कारण नसताना अचानकपणे वजन कमी होणं.
अनेक आठवडे सतत ताप येणं. सर्दी किंवा खोकला असे इतर त्रास न होताच हा ताप जास्त काळ राहणं.
खूप थकवा आणि अॅनिमिया
घोट्यांना किंवा पायांना सूज येणं.
अशी काही लक्षणं दिसताच त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने काही चाचण्या कराव्या, रक्त तपासणी किवा स्क्रिनिंगच्या मदतीने कॅन्सरबद्दल माहिती मिळू शकते.
कॅन्सर हा एक गंभीर आजार असला तरी विज्ञानाने सध्या त्याच्यावर विजय मिळवला आहे. योग्य वेळेत उपचार सुरू केल्यास किडनीचा कर्करोगही बरा होणं शक्य आहे. रिनल म्हणजेच किडनीच्या कॅन्सरमध्ये बऱ्याचदा सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातही रुग्णाची स्थिती आणि कॅन्सरचं प्रमाण पाहून वेगवेगळ्या प्रकारची सर्जरी केली जाते.
किडनीच्या कर्करोगावरील उपचार
काही सर्जरी तसंच काही थेरपींच्या मदतीने किडनीच्या कॅन्सरवर उपचार केले जातात.
पार्शियल नेफरेक्टोमी- जर एक किडनी खराब झाली असेल किंवा आधीच काढून टाकण्यात आली असेल तर दुसऱ्या किडनीचं कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी पार्शियल नेफ्रेक्टॉमी केली जाऊ शकते. यामध्ये मूत्रपिंड आणि त्याच्या सभोवतालच्या काही टिश्यूमधून कर्करोग काढून टाकण्यासाठी सर्जरी केली जाते.
सिंपल नेफ्रेक्टॉमी- या सर्जरीमध्ये किडनी संपूर्णपणे काढून टाकली जाते.
रेडिकल नेफ्रेक्टॉमी- या सर्जरीमध्ये किडनीसह आजुबाजूच टिश्यू तसचं किडनीला जोडणाऱ्या काही नसा शस्त्रक्रिया करून काढून टाकल्या जातात. या शस्त्रक्रियांव्यतिरिक्त शरीराबाहेरून काही थेरपीच्या मदतीने कर्करोगावर नियंत्रण आणण्याच प्रयत्न केले जातात.
कर्करोग बरा करण्यासाठी रेडियएशन थेरपीच्या मदतीने उपचार केले जाताता. कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी रेडिएशनच्या मदतीने ही थेरपी केली जाते.
हे देखिल वाचा-
किमोथेरपी- किमोथेरपीमध्ये औषधांच्या मदतीने कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचा प्रयत्न केला जातो. शरीरात काही इंजेक्शनच्या मदतीने औषधं इंजेक्ट करण्यात येतात. यामुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशींपर्यंत हे औषध पोहचून त्या नष्ट होतात किंवा त्यांची वाढ थांबते.
इन्यूनोथेरपी- इम्युनोथेरपी ही एक अशी थेरपी आहे ज्यात कर्करोगाशी लढण्यासाठी रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर केला जातो. याप्रकारच्या थेरपीला बायोथेरपी किंवा बायोलॉजिक थेरपी असंही म्हणतात.
टारगेट थेरपी- या थेरपीमध्ये चांगल्या पेशींचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत केवळ कॅन्सरच्या पेशींना टार्गेट करून औषधं किंवा इतर माध्यमांनी त्या नष्ट केल्या जातात.
अशा प्रकारे योग्य वेळेत कर्करोगाचं निदान झाल्यास योग्य सर्जरी किंवा थेरपीच्या मदतीने कॅन्सरमुक्त होणं शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.