Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : तूमच्या घोरण्यानं इतरांच्या झोपेचे वाजतायत तीन तेरा? मग हे उपाय आताच सुरू करा! 

घोरण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे!

सकाळ डिजिटल टीम

आई गं काय या माणसांच घोरंणं, स्वत: झोपतात घोरत, इथं आमच्या झोपेचं रोज खोबरं होतंय, हा असा सूर रोज उठल्यावर तूम्हालाही ऐकायला येतोय का? तर मग तूम्हाला आमच्या सल्ल्याची नितांत गरज आहे.

झोपेत घोरणे ही सामान्य बाब आहे. पण, त्या घोरण्याचा इतरांना त्रास होत असेल तर मग ती सामान्य बाब राहत नाही. तो एक मोठा गहन प्रश्न बनतो. अनेकदा जास्त आणि वेगाने घोरण्यामुळे ते लोकांसाठी त्रासदायक ठरतात.

काहीवेळा लोकांना पटत नाही की ते घोरत असतात. तूम्हीही घोरत असाल तर कसे ओळखायचे यासाठी घोरण्याची लक्षणे कोणती हे पाहुयात.

  • घोरण्यामुळे श्वास रोखला जातो

  • दचकून जाग येते, पुन्हा वेगात श्वास सुरु होतो, या क्रियेत श्वसनमार्गावर भार येतो

  • झोपेतून उठल्यानंतर चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी सुरु होणे

  • एकाग्रता कमी होणे, सतत लक्ष विचलित होणे

  • जागे झाल्यानंतर घशास वा तोंडास कोरड पडणे

घोरण्यामूळे तूमच्या प्रिय पत्नीची झोप मोड होते

घोरण्याची कारणे

घोरण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. काही लोक अति ताण घेतल्यानेही घोरतात. पण, हलका वाटणारा  हा आजार कधी मोठा होतो हे आपल्यालाही समजत नाही. घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉईड संप्रेरकांची कमतरता, इ. निरनिराळी कारणे यामागे असतात.

वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येते व घोरणे सुरु होते. लठ्ठपणामध्ये स्नायूंमध्ये चरबी साठून स्नायू दुबळे होतात. हे आजार नसतील तर उतारवयातील घोरण्यापासून ही व्यक्ती मुक्त असू शकते.

घोरण्यामुळे श्वास अडून आचके येत असतील तर डॉक्टरकडे नक्की दाखवले पाहिजे. यासाठी काही तपासण्या करून घोरण्याचे कारण आणि प्राणवायू प्रमाणाची कमतरता निश्चित करता येते. छातीच्या डॉक्टरकडून तपासणी केल्यास रात्रभराचा घोरण्याचा कार्डिओग्राम (ईसीजी) काढता येतो.

यावरून निश्चित निदान करता येते. यातील बहुतेक लोकांना जीभ जडावल्यामुळे घोरण्याचा त्रास होत असतो. कारणाप्रमाणे यावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. जीभ जागच्या जागी रहावी म्हणून प्लॅस्टिकची आधारपट्टी किंवा शस्त्रक्रियेने घोरणे दुरुस्त करता येते.

घोरण्याने तूम्हाला त्रास होतो

योग्य आहार, व्यायाम, प्राणायामाचे काही प्रकार (उज्जायी व भस्त्रिका) वजन कमी करणे, कुशीवर झोपणे, या साध्या साध्या उपायांनी घोरण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो. यातून उपाय न झाल्यास व त्रास जास्त असल्यास डॉक्टरकडे आवश्य गेले पाहिजे.

भारतात २० टक्के लोक न चुकता घोरतात. तर ४० टक्के लोक कधीतरीच घोरतात. घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी लोक बरेच उपाय आणि युक्त्या वापरतात. परंतु ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) चे डॉक्टर या समस्येवर मात करण्यासाठी एका सोप्या उपायाचा सल्ला देतात.

पुरूष अधिक घोरतात?

भारतात पुरूषांचे घोरण्याचे प्रमाण जास्त आहे. पुरूषांचे सतत बैठी काम असते. त्यामूळे त्यांच्यात वाढलेला लठ्ठपणाच घोरण्याच्या समस्येसाठी कारणीभूत ठरतो. वाढत्या वयातही हे प्रमाण पुरूषांमध्ये अधिक आहे. तरूणपणीच घोरण्याची समस्या असलेल्यांमध्ये उतारवयात निद्रानाशाचा सामना करावा लागतो.

घोरण्याचा भविष्यात काही जास्त त्रास होऊ शकतो का?

  • झोपेचा अभाव आणि याचा परिणाम म्हणून हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

  • तुमच्या घोरण्याचा परिणाम होणाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या.

  • झोपेची गुंगी, वाढलेली चीडचीड, वैतागणे.

  • श्वासात अनियमितपणा किंवा श्वासमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे धाप लागणे, गुदमरणे.

  • घसा बसणे, काही वेळा छातीत दुखणे.

  • दूरगामी परिणामांची वाढती शक्यता – अर्धांगवायूचा झटका, हृदय विकार.

झोपेच्या वेळी काही हलके व्यायाम करून तूम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता, असे तज्ज्ञांनी सांगितले. भारतीय वंशाचे ब्रिटीश डॉक्टर करण राज म्हणतात की, जिभेचे काही साधे व्यायाम आहेत. जे केल्याने घोरण्याची समस्या दूर होऊ शकते.

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये डॉ. करण राज यांनी जीभ बाहेर काढणे, ती एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलवणे आणि तोंडाला स्पर्श करणे यासारख्या अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगितले आहे.

जीभेचा व्यायाम

डॉ. राज यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, घोरणे कमी करण्याचा पहिला व्यायाम म्हणजे पाच सेकंद जीभ काढून काही काळ तशीच ठेवावी. घोरणे कमी करण्यासाठी तीन-चार वेळा हा व्यायाम करण्यास डॉ.करण यांनी सांगितले आहे.

हा व्यायाम करताना अडचण येत असेल तर चमच्याच्या साहाय्याने जीभेला आधार देऊ शकता, असेही ते म्हणाले.

जिभेचा व्यायाम तूमची मदत करेल

दबाव न जाणवता आपली जीभ शक्य तितक्या बाहेरच्या दिशेने खेचा. ताकद वाढवून स्नायूंना लवचिक बनविणे हा या व्यायामाचा उद्देश आहे. पाच सेकंद जीभ बाहेर ठेवा आणि नंतर आपली जीभ पुन्हा तोंडाच्या आत घ्या. असे तीन ते चार वेळा करा.

डॉ. राज म्हणाले की, हा व्यायाम आपल्या जीभ आणि घशाच्या स्नायूंची ताकद वाढविण्याशी संबंधित आहेत. हा व्यायाम संतुलन निर्माण करतात.

या व्यायामामुळे स्नायू संतुलित राहतील आणि झोपताना ते फडफडणार नाहीत. घसा आणि जिभेचे स्नायू बळकट केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि तुमची घोरण्याची समस्याही दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT