health tips What are the benefits of Asafoetida blood pressure weight loss  
आरोग्य

Benefits Of Hing : फोडणीसाठी लागणाऱ्या चिमुटभर हिंगाचे आहेत अनेक फायदे

हिंग हा भारतीय पदार्थांमधील एक महत्त्वाचा मसाल्याचा घटक. लोणच्या पासून ते प्रत्येक जेवणाच्या डिशमध्ये हिंग वापरले जाते. पदार्थाला चव येण्यासाठी वापरला जाणारा हिंग आरोग्यासाठी खुप फायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

बहुतांश गृहिणी फोडणीसाठी हिंग वापरताना दिसतात. हिंग हा भारतीय पदार्थांमधील एक महत्त्वाचा मसाल्याचा घटक. लोणच्या पासून ते प्रत्येक जेवणाच्या डिशमध्ये हिंग वापरले जाते. पदार्थाला चव येण्यासाठी वापरला जाणारा हिंग आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.

हिंगामध्ये पांढरे, पिवळे, लाल हिंग, खडे हिंग असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. हिंगाचा आयुर्वेदीक औषधांमध्येही वापर केला जातो. आपल्या जेवणात हिंगाचा चिमुभरच वापर केला असता त्याचे अनेक जबरदस्त फायदे आपल्या आरोग्याला मिळतात. तर जाणुन घेऊयात या चिमुटभर हिंगाचे फायदे.

वजन कमी करण्यास मदत

सध्या वजन ही खुप मोठी समस्या बनली आहे. सध्याच्या कामाच बैठी जीवनशैली असल्यामुळे अनेकांना लठ्ठपणा या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काहीजण योगा, जीम असे अनेक मार्ग अवलंबताना दिसत आहेत.

पण तुम्हाला माहितीय का हिंगसुद्धा तुमचे वजन कमी करण्यास मदत करु शकते. जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर सकाळी हिंगाचे पाणी प्या. यामुळे तुमचे वजन कमी होईल.

रक्तदाब कमी होतो

हिंगामध्ये रक्त पातळ करणारे घटक असतात. याशिवाय हे ब्लडप्रेशर कमी करण्यास आणि हृदयाला निरोगी ठेवण्यासही मदत करते. रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.

श्वसनाशी निगडित तक्रारींवर हिंग उपयुक्त

हिंगामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने दमा ,ब्राँकायटीस यांसारख्या श्वसनाशी निगडित तक्रारींवर हिंग उपयुक्त ठरतो. हिंगाची पेस्ट छातीवर लावल्यास कफ कमी होण्यास मदत होते. हिंग, आलं आणि मध यांची गोळीचे सेवन केल्याने कफ कमी होण्यास मदत होते. त्यामुळे श्वसनाशी निगडित तक्रारींवर हिंग गुणकारी आहे.

मासिक पाळीच्या वेदनांमध्ये आराम

मासिक पाळीत स्त्रियांना होणारी पोटदुखी, मळमळ यांसारख्या त्रासावर हिंग अतिशय फायदेशीर ठरतो. हिंग पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते. कारण त्यात नैसर्गिक रक्त पातळ करणारे संयुगे असतात.

हिंग शरीराच्या कोणत्याही भागामध्ये अडथळा न आणता रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत करते. मासिक पाळी दरम्यान कोमट पाण्यात हिंग मिसळुन ते पाणि पिल्याने पाठ आणि खालच्या ओटीपोटात वेदना कमी होते.

ताकद वाढावण्यासाठी उपयोगी

पुरूषांमध्ये ताकद वाढविण्यासाठी हिंग खाल्ल्यास खूप फायदा होतो. एक ग्लास गरम पाण्यात चिमुटभर हिंग टाकून नियमित ते पाणी प्यायल्याने पोटालाही खूप फायदा होतो. हिंगाबरोबरच सुंठाचाही वापर करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT