Plums Health Benefits : चवीला आंबट-गोड असणारे आलुबुखार हे एक हंगामी फळ आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा साठा मुबलक प्रमाणात असतो. आलुबुखारमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराचे अनेक समस्यांपासून बचाव होण्यास मदत मिळते.
हे फळ पचनासाठीही खूप चांगले मानले जाते, तसेच यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांही कमी होऊ शकतात. या फळाच्या सेवनामुळे आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, जाणून घेऊया सविस्तर…
आलुबुखारमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण खूप असते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील सोडिअम सहजरित्या बाहेर उत्सर्जित होते.
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी डाएटमध्ये या फळाचे समावेश करावा. या फळामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होते. पोटाशी संबंधित समस्या देखील कमी करायच्या असतील तर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे.
अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत म्हणजे आलुबुखार. या फळाच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख होण्यास मदत मिळते. या फळाचा आपण नाश्त्यामध्येही समावेश करू शकता. एकूणच हे फळ तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
हाडांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी आलुबुखार हे फळ अतिशय लाभदायक मानले जाते. हे फळ खाल्ल्याने महिलांमधील ऑस्टिओपोरोसिस समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते. योग्य प्रमाणात नियमित स्वरुपात या फळाचे सेवन केल्यास या आजाराचा धोका टळला जाऊ शकतो.
आलुबुखारमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. यामध्ये असणारे व्हिटॅमिन सीचे घटक शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.