why does perfume gives headache sakal
आरोग्य

अगबत्ती किंवा सेंटच्या सुगंधामुळे डोके का दुखते? जाणून घ्या यामागील कारण

अगरबत्ती किंवा सेंट यासारख्या सुगंधीत गोष्टींमुळे काही जणांना गरगरल्यासारखे किंवा डोके का दुखू लागते? जाणून घेऊया सविस्तर…

Harshada Shirsekar

तन्मयने अत्तराची कुपी उघडताच शेजारी बसलेल्या गंधालीला लागोपाठ सात ते आठ शिंका आल्या. शिंका येणे थांबताच तिनं तन्मयला सर्वप्रथम त्याला आता माझ्या शेजारी बसू नकोस, असे ठणकावून सांगितलं. आसपास बसलेल्या मित्रमैत्रिणींना काही कळेना गंधाली इतकी का चिडतेय. 

तन्मय उठून जेव्हा दुसरीकडे बसायला गेला, तेव्हा कळलं की गंधालीला अत्तराच्या सुगंधाने डोकेदुखी, शिंका येणे यासारखा त्रास होतो. काही लोकांना तर धूप, अगरबत्ती इत्यादी गंधामुळेही चक्कर येऊ लागते. आपणही यांपैकीच एक आहात का? तर तुम्हाला देखील अत्तर, सेंट, अगरबत्तीच्या गंधाची अॅलर्जी आहे, हे लक्षात घ्या मंडळींनो.

काही लोकांना तीव्र स्वरूपातील सुगंधामुळे हा त्रास होतो, तर काही लोकांना सुगंध अगदी सौम्य जरी असला तरीही त्यांचे डोके दुखू लागते. परिणामी या लोकांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते, डोळे लाल होणे यासारख्याही समस्या उद्भवतात. अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणीही मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती

सेंटमुळे गरगरणे किंवा डोके दुखीची समस्या का वाढते?

सेंट किंवा परफ्युममध्ये कृत्रिमरित्या तयार केलेल्या सुगंधाचा समावेश केला जातो. यामुळेच लोकांना सेंटच्या सुगंधाची अॅलर्जी होऊ शकते. डिओ, सेंट, परफ्युम, अगरबत्ती इत्यादी गोष्टी तयार करण्यासाठी अॅल्कोहल, हायड्रोकार्बनसह अन्य रसायनांचाही वापर केला जातो. ज्यामुळे अॅलर्जीची समस्या निर्माण होते.

सेंटच्या सुगंधामुळे अॅलर्जी झाल्यास ही लक्षणे आढळतात 

  • त्वचेशी संबंधित समस्या

  • डोळे लाल होणे

  • डोळ्यांतून पाणी येणे

  • डोके दुखी

  • गरगरल्यासारखे वाटणे

  • चक्कर येणे

  • गुदमरल्यासारखे वाटणे

  • अस्वस्थता वाढणे

  • शिंका येणे

कसा करावा बचाव? 

  • सेंट, अत्तर किंवा परफ्युमच्या सुगंधामुळे अॅलर्जी होत असल्यास आपण शक्यतो या गोष्टींचा वापरच करणं टाळावे. 

  • सार्वजनिक ठिकाणी याचा सामना करावा लागत असल्यास एअर प्युरिफायर स्वतःसोबत नक्की ठेवा.

  • नैसर्गिक सामग्रींपासून तयार केलेल्या सेंट, अत्तराचा वापर करावा.

  • सेंटच्या सुगंधामुळे जास्त त्रास होत असल्याचा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • डॉक्टरांकडूनच खबरदारीचे उपाय जाणून घ्या आणि त्यांचे पालन करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT