hypertension disease High Blood Pressure  Sakal
आरोग्य

सावधान! उच्च रक्तदाबाचा धोका वाढतोय, WHOने दिला हा इशारा

पाच रूग्णांपैकी चौघांवर अपुरे उपचार, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल.

सकाळ डिजिटल टीम

High Blood Pressure Symptoms And Causes : जगभरात विविध कारणांमुळे नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब या आजाराचा धोका वाढतोय. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) यासंदर्भात सावधगिरीचा इशारा दिला आहे. सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उच्च रक्तदाब या आजाराशी संबंधित WHOकडून अहवाल प्रकाशिक करण्यात आला असून जगभरात उच्च रक्तदाबाच्या पाचपैकी चार रूग्णांवर अपुरे उपचार केले जात असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दक्षिण कोरिया, कॅनडा या देशांनी प्रौढांमधील उच्च रक्तदाबांची समस्या नियंत्रणात ५० टक्क्यांपेत्रा अधिक प्रमाणात यश मिळवल्याचे उदाहरणही दिले आहे. उच्च रक्तदाब या आजारावर शाश्वत, पद्धतशीरपणे राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्याची गरजही या अहवालात व्यक्त केली आहे. 

जगातील देशांनी वेळीच योग्य उपाययोजना राबवल्यास २०५० पर्यंत सुमारे साडेसात कोटींहून अधिक मृत्यू टाळता येतील, असा सल्लाही दिला आहे. त्याचप्रमाणे, पक्षाघाताचे १२ कोटी, हृदयविकाराचे आठ कोटी आणि हृदय निकामी होण्याचे पावणेदोन कोटी मृत्यूही टळू शकतात, असेही अहवालात म्हटले गेले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा हा अशा प्रकारचा पहिलाच अहवाल आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ७८व्या आमसभेत मंगळवारी (१९ सष्टेंबर) हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. ‘रक्तदाबावरील जागतिक अहवाल; शर्यत सायलेंट किरलविरुद्धची’ नावाचा हा अशा प्रकारचा पहिलाच अहवाल आहे. 

भारतापुरते बोलायचे झाल्यास ३० ते ७९ वयोगटातील उच्च रक्तदाबाच्या रूग्णांची ही समस्या नियंत्रित केल्यास २०४० पर्यंत देशात चार कोटी मृत्यू टळू शकतात. WHOने उच्च रक्तदाबाशी संबंधित डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब १४०/९० पेक्षा अधिक असल्यास किंवा ती व्यक्ती उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असल्याच्या माहितीच्या आधारे हा डेटा तयार करण्यात आला आहे. 

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, किडनीचे विकार, पक्षाघातासह आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवू शकतात. चौरस आहार, नियमित व्यायाम, ताणतणावांचे नियोजन आणि नियमितपणे रक्तदाब मोजणे आदी उपायांद्वारे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित ठेवली जाऊ शकते.

"उच्च रक्तदाबाच्या आजाराचे बहुतेक वेळेस कोणतेही लक्षण जाणवत नाही. मात्र निदान होईपर्यंत हृदय, रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांचे बरेच नुकसान झालेले असते. अनेकांना बऱ्याच वर्षांपासून उच्च रक्तदाबाची समस्या असू शकतो. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात, किडनीचे विकार इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. सोडियमचे (मीठ) अधिक सेवन, पोटॅशिअमच्या कमी सेवनामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवू शकता." - डॉ. अजल कौल फोर्टिस रुग्णालय, नोयडा

"उच्च रक्तदाबाच्या समस्येवर अतिशय सहजरित्या, स्वस्त औषधांच्या मदतीने नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र, असे असले तरीही जगातील पाचपैकी केवळ एकाच व्यक्तीला उच्च रक्तदाबाचे यशस्वीरित्या व्यवस्थापन करता येते." - अघ्नोम घेब्रेयेसूस, महासंचालक, WHO

अहवालातील प्रमुख निष्कर्ष

  • उच्च रक्तदाबाचे रुग्ण २० वर्षांत दुप्पट, १९९९ मधील ६५ कोटींवरून २०१९मध्ये एक अब्ज ३० लाखांवर

  • जगातील तीनपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब, निम्म्याहून अधिकांना याची कल्पनाच नाबी

  • भारतात ३० ते ७९ वयोगटातील १८ कोटींहून अधिक नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास

  • केवळ ३७ टक्के जणांचेच वेळेवर निदान तर ३० टक्के जणांवर वेळेवर उपचार

  • उच्च रक्तदाबाच्या विकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी साडेसहा कोटी लोकांवर परिणामकारक उपचाराची गरज

  • प्रतिबंध, लवकर निदान आणि परिणामकारक व्यवस्थापन या प्रभावी त्रिसूत्रीचा अवलंब गरजेचा

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT