Health updates 
आरोग्य

पावसाळ्यात वाढवा मुलांची इम्युनिटी

इम्युनिटी वाढवण्यासाठी मुलांचा आहार चार्ट बनवण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

पावसाळा आपल्यासोबत अनेक नवीन जंतू घेऊन येतो. या काळात मुले जास्त आजारी पडतात. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. बाहेर बरेच जंतू असतात. अशावेळी त्यांच्या आहारात काहीतरी चांगले समाविष्ट करून, ते संसर्गाशी लढण्यास सक्षम होतील असा बदल करावा. इम्युनिटी वाढवण्यासाठी मुलांचा आहार चार्ट बनवण्याची गरज आहे.

संसर्गामुळे आजारी पडणे

  • सध्या नुसता पावसाळा नसून कोविड व्हायरसची साथ आहे.

  • या ऋतूत दुहेरी त्रासापासून मुलांचं संरक्षण करणं अधिक महत्त्वाच आहे.

  • यासाठी त्यांना पौष्टिक आहार द्या.

  • विषाणू दूर करण्यासाठी दही, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी आणि झिंकचा आहारात समावेश करा.

लसूणचा वापर करावा

  • लसूण हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

  • जर मुलाची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर तो लवकर आजारी पडत नाही.

कारले फायदेशीर

  • मुलांना कारलं आवडत नाही पण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

  • ते रक्त शुद्ध करतं आणि संसर्गाचा धोका कमी करतं.

  • त्यामध्ये बुरशीविरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.

टोफू

  • टोफू पनीर सारखाच आहे आणि मुलांना तो खूप आवडतो.

  • यामध्ये प्रथिने (प्रोटीन्स) मुबलक प्रमाणात असल्याने त्याचं सेवन फायदेशीर ठरते.

हंगामी फळे

  • ही फळे, हंगामी फळे, लिची, डाळिंब यांचे सेवन केल्याने मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राहते.

  • ही फळं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

ग्रीन सॅलड

  • मुलांनी शक्य तितकी हिरवे कोशिंबीर खावी, सर्व जीवनसत्त्वे त्यात आढळतात.

जंक फूड

  • मुलांना जंक फूडपासून दूर ठेवाव, मुलांना तेलकट पदार्थही कमी द्यावे कारण त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते.

हळद

  • हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबायोटिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत. मुलांना हळदीचे दूध पाजल्याने त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

नेमके होते काय ?

  • पावसाळ्यात मुलं लवकर आजारी पडतात कारण यावेळी बाहेर अनेक प्रकारचे विषाणू पसरलेले असतात आणि संसर्गाचा धोकाही वाढतो.

  • प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मुलांना चिकनगुनिया, डेंग्यू, विषाणूजन्य ताप सहज होतो.

  • मुलं अस्वस्थ होतात आणि त्यांच्या शरीरात अनेक प्रकारच्या खनिजांची कमतरता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT