Remedies For Back Pain sakal
आरोग्य

Remedies For Back Pain: हेल्थ वेल्थ - पाठीच्या दुखणे टाळण्यासाठी...

पाठीच्या दुखण्याकडे बहुतांश वेळा वय वाढत असल्याचा संकेत म्हणून पाहिले जाते,

सकाल वृत्तसेवा

पाठीच्या दुखण्याकडे बहुतांश वेळा वय वाढत असल्याचा संकेत म्हणून पाहिले जाते, मात्र हे दुखणे कोणाच्याही व कोणत्याही वयात होऊ मागे लागू शकते. आपली पाठ नक्की कशाची बनली आहे? यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे पाठीचा मणका, जो अनेक हांडापासून बनलेला असतो. ही हाडे एकमेकांवर रचलेली असतात व त्यांच्यामध्ये एक चकती (डिस्क) असते. ही चकती एखाद्या उशीसारखे काम करीत हाडांमधील घर्षण कमी करते. हा सर्व आराखड्याला स्नायू आणि अस्थिबंधनाद्वारे (लिगामेंट्स) आधार दिलेला असतो. या सर्व हाडांना एकत्र धरून ठेवणाऱ्या धाग्याला मज्जारज्जू म्हणतात.(Remedies For Back Pain)

या मुळे होते पाठदुखी

शारीरिक हालचालीचा अभाव.

व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता

सरळ न बसणे किंवा सरळ उभे न राहणे

अतिवजन

योग्य शारीरिक स्थिती नसताना वजन उचलणे

धूम्रपान

पडणे किंवा कार धडकण्यासारखे अपघात

सांधेदुखी

गर्भारपण

पाठीदुखी कशामुळे होते?

व्यायामाच्या अभावामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो आणि कण्यात कडकपणा येतो व त्यामुळे वेदना जाणवतात. त्यातून हालचाल करताना वेदना जाणवतात. यात वाकणे, टेबल-खुर्चीवर बसून काम करणे, वजन उचलणे किंवा टीव्ही पाहताना वाकण्यासारख्या दैनंदिन हालचालींचा समावेश असतो.

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात व त्यामुळे अगदी छोटा अपघात झाल्यासही हाड मोडण्यासारखी समस्या उद्‍भवू शकते.

खेळताना झालेल्या जखमा, रस्ते अपघात उंचावरून पडणे व थेट पाठीवर झालेला आघात यांमुळे विविध तीव्रतेची पाठदुखी होऊ शकते.

स्लीप डिस्कसारख्या परिस्थितीमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक चकत्या मणक्याच्या बाहेर येतात. त्यामुळे शरीराच्या इतर भागांत सुन्नपणा, मुंग्या येणे किंवा कमकुवतपणा येऊ शकतो.

सायटिका आणि स्पॉंडिलायसिससारखे आजार सायटिका नर्व्हमधील ताण आणि कडकपणामुळे होतात आणि मणक्याच्या जोडांमध्ये सूज असल्यास वेदना जाणवतात. या वेदना सकाळच्या वेळेस अधिक तीव्र बनतात आणि थोड्या हालचालीनंतर बरे वाटते.

हे कसे टाळाल?

कायम सक्रिय राहा ः शारीरिक हालचाली करीत सक्रिय राहणे अत्यंत आवश्‍यक आहे. दर आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम करीत असल्याचे सुनिश्‍चित करा. त्यात पाठीच्या स्नायूंच्या बळकटीसाठीचे व्यायाम आणि स्ट्रेचिंगच्या व्यायामाचा समावेश करा. योगसनांमुळेही पाठीचे स्नायू बळकट होणे व तुमची बसण्याची पद्धत सुधारण्यास मदत होते.

शरीराची ढब योग्य ठेवा ः काही प्रकरणांत केवळ शरीराची ढब योग्य राखून पाठदुखीपासून बचाव करता येतो. ताठ बसा आणि सरळ उभे राहा. वाकून बसणे टाळा. तुम्ही खूप मोठ्या काळासाठी बसून काम करणार असल्यास अधून-मधून ब्रेक घ्यायला विसरू नका.

वस्तू काळजीपूर्वक उचला ः वस्तू उचलताना तुमच्या पायांचा वापर करा, पाठीचा नव्हे. तुमची पाठ सरळ ठेवा आणि तुमच्या गुडघे किंवा पार्श्‍वभागातून वाका. खूप जड वस्तू उचलणे टाळा.

व्हिटॅमिन डी ः योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ‘डी’चे सेवन केल्यास तुमची हाडे सुदृढ राहतात. व्हिटॅमिन ‘डी’ कॅल्शिअमचे शोषण करतात आणि त्याला शरीरात धरून ठेवतात.

अतिवजन ः अतिवजनामुळे तुमच्या पाठीवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे योग्य वजन राखल्यास पाठदुखीची धोका कमी होतो.

योग्य गादीवर झोपणे ः मध्यम कडक गादीवर झोपल्यास पाठीला खूप चांगला आधार मिळतो व पाठदुखीची समस्या कमी होते.

पाठदुखी नियंत्रणात ठेवण्यासाठी

पाठीच्या वरच्या आणि खालच्या भागात वेदना होत असल्यास पाठीवर झोपा, त्यामुळे वजन कण्याच्या सर्व भागांत समप्रमाणात विभागले जाईल. गुडघ्यांच्या खाली उशी ठेवल्यास कण्याचा नैसर्गिक बाक व्यवस्थित राखला जाईल. तुम्ही एका अंगावर झोपणार असल्यास उभी दोन गुडघ्यांच्या मध्ये ठेवा. त्यामुळे मणक्याचा खालचा भाग आणि पार्श्‍वभाग एका रेषेत येतील व मणक्याच्या खालच्या भागावरील ताण कमी होईल.

पाठीच्या स्नायूंसाठीचे व्यायाम आणि त्यांच्यावर ताण देणे, चालणे, योगासने, पिलेट्स यांसारख्या हालचालींचा पाठदुखीत उपयोग होतो.

धूम्रपान करीत असल्यास ते ताबडतोब सोडा. निकोटिनमुळे वेदना वाढतात आणि दुखणे बरे होण्यास अधिक कालावधी लागतो.

जुनाट पाठदुखीमुळे चिडचिड, नैराश्‍य येऊ शकते. योगासने व ध्यानधारणेने मन शांत होण्यास मदत होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT