मसाले आणि तणावमुक्ती Esakal
आरोग्य

तणाव आणि चिंता दूर करायचीय? मग Kitchen मधले हा मसाला ठरेल उपयुक्त

तुम्हाला तणाव आणि चिंता यामुळे शारीरक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून दूर रहायचं असेल किंवा यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करायच्या असतील तर तुमच्या किचनमधील एक मसाला या सर्व समस्या दूर करू शकतो

Kirti Wadkar

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकजण सतत ताण-तणावात Tension असतात. वाढत्या तणावामुळे चिंता वाढू लागते आणि अनेकदा तणाव आणि चिंतेचं रुपांतर नकळत नैराश्यामध्ये Depression होतं. Healthy Cooking Tips Know this Kitchen Masala to keep away mental Stress

वाढत्या कामाचा ताण, स्पर्धा, पैसा अशा अनेक गोष्टींमुळे दिवसेंदिवस ताण वाढतं जातो. याचा मानसिक आरोग्यावर Mental Health परिणाम होत असतो. ऑफिसमधील कामं, घराच्या जबाबदाऱ्या, वाढते खर्च या सगळ्या गोष्टीं सांभाळत असताना दैनंदिन आयुष्यात Daily Routine अनेकजण तणावपूर्ण जीवन जगत असतात.

मात्र जर तुम्हाला तणाव आणि चिंता यामुळे शारीरक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून दूर रहायचं असेल किंवा यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करायच्या असतील तर तुमच्या किचनमधील एक मसाला या सर्व समस्या दूर करू शकतो.

भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात हळदीचा Turmeric वापर केला जातो. याच हळदीच्या सेवनामुळे ताण-तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होईल. पाण्यामध्ये हळद मिसळून या पाण्याचं रोज सकाळी सेवन केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतील. पाहुयात हळदीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे

हे देखिल वाचा-

तणाव होईल कमी- रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हळदीचं सेवन उपयुक्त ठरतं. हळदीच्या पाण्याचं नियमित सेवन केल्यास स्ट्रेस आणि चिंता दूर होण्यास मदत होते. तसचं या पाण्याच्या सेवनामुळे मूड फ्रेश राहतो. त्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो.

मेंदूसाठी फायद्याचं- रोज सकाळी हळदीचं पाणी प्यायल्यास मेंदूची ताकद वाण्यास मदत होते. यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते. हळदीच्या पाण्याचं सेवन केल्यास स्मरणशक्ती चांगली होते. अल्झायमर सारख्या आजाराचा धोका यामुळे कमी होतो.

त्वचेसाठी उपयुक्त- हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. खास करून त्वचेसाठी हळदीचे अनेक फायदे आहेत. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसचं चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.

हळदीच्या पाण्याचं सेवन केल्यास त्वचा उजळण्यासोबतच त्वचेवर ग्लो येतो. यासाठी नियमित १ ग्लास कोमट पाण्यामध्ये १ चमचा हळद मिसळून या पाण्याचं सेवन करावं.

सूज कमी होण्यास होतो मदत- शरीरात कोणत्याही कारणामुळे सूज आली असले आणि औषधाने ती कमी होत नसेल तर यासाठी हळदीच्या पाण्याचं सेवन उपयुक्त ठरू शकतं. हळदीतील क्यूरक्युमिन तत्वामुळे तसचं अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे सूज कमी होण्यास मदत होते. तसचं सांध्यामधील वेदनाही कमी होतात.

कॅन्सरचा धोका होतो कमी- हळदीमध्ये अँटीकॅन्सर गुण आढळतात. यामुळे हळदीच्या पाण्याच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी होवू शकतो. आठवड्यातून किमान ३ वेळा हळदीच्या पाण्याचं सेवन केल्यास कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

हृदय निरोगी राहतं- हळदीतील पोषक गुणधर्मांमुळे रक्त घट्ट होण्याची समस्या कमी होते. म्हणजेच हळदीच्या पाण्याच्या सेवनामुळे रक्त पातळ राहण्यास मदत होते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

अशा प्रकारे हळदीच्या पाण्याच्या सेवनामुळे हृदय, लिव्हर तसंच त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तर कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT