Energy Booster Vegetables Esakal
आरोग्य

Instant Energy Food: पुरुषांसाठी Energy Booster आहेत या भाज्या, नियमित खाल तर तंदूरूस्त रहाल

Instant Energy Food: तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुरुषांना निरोगी आणि तंदूरुस्त राहायचं असले तर त्यांनी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश करणं गरजेचं आहे. यातही खास करून पालक खाण्याचा सल्ला तज्ञ देतात

Kirti Wadkar

Instant Energy Foods: अलिकडे धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना योग्य आहार घेण्यास वेळ मिळत नाही. खास करून पुरुषांवर कुटुंबाच्या Family उदरनिर्वाहाची मोठी जबाबदारी असते. अशात कामाच गडबडीत अनेकदा ते स्वत:च्या आहाराकडे दूर्लक्ष करतात.

यामुळेच अलिकडे पुरुषांमध्ये देखील अनेक आजारांच्या Ailments समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. Healthy Diet Tips in Marathi Know the vegetables which will boost your energy

कामाच्या तणावामुळे, प्रवासामुळे आणि योग्य आहार Diet न घेतल्याने अनेकदा त्यांना थकवा जाणवतो. अशातही काम कर राहिल्याने आजारी होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पुरुषांनी त्यांच्या आहारात अशा काही भाज्यांच्या समावेश करावा ज्या पुरुषांसाठी एनर्जी बुस्टर Energy Booster आहेत.

तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुरुषांना निरोगी आणि तंदूरुस्त राहायचं असले तर त्यांनी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश करणं गरजेचं आहे. यातही खास करून पालक खाण्याचा सल्ला तज्ञ देतात. पालकामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वं आहेत. ज्यामुळे एनर्जी वाढण्यास मदत होते. पाहुयात पालक खाण्याचे फायदे....

पालकामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन आढळत. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होण्यास मदत होते. तसचं शरीरात रक्तीची कमतरता भरून काढण्यास मदत होते आणि एनर्जी टिकून राहते. health benefits of spinach

पालकामध्ये विटामिन के देखील आढळतं. Vitamin K शरीरात कॅल्शियम सोशन घेण्यास मदत करत यामुळे हाडं मजबूत होतात.

पालक हा अँटीऑक्सिडंटचा एक मुख्य स्रोत आहे. त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारांपासून दूर राहता येतं. संपूर्ण शरीराच्या वाढीचस यामुळे मदत होते.

पालक खाल्ल्याने शरीराला विटामिन ए मिळतं. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते. Spinach Benefits

पालकामधील मॅग्नेशियम आणि झिंकमुळे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. 

पालकामधील पोषकतत्व मानसिक स्वास्थ उत्तम ठेवण्यास मदत करतात. त्यामुळेच आहारात पालकचा समावेश करणं गरजेचं आहे. 

पालकामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी होते आणि फिट राहण्यास मदत होते. 

पालकाच्या सेवनामुळे पचनसंस्था मजबूत होते. तसचं पालकमध्ये असलेल्या केरॅटीन, विटामिन सी आणि विटामिन डी या पोषक तत्वामुळे शरीरातील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

त्याचसोबत हृदयासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक असलेलं ओमेगा-३ फॅटी ऍसिड पालकामध्ये आढळतं. यामुळे पालकच्या सेवनाने पुरुषांमध्ये निर्माण होणाऱ्या हृदयासंबधीत आजारापासून दूर राहणं शक्य आहे.

हे देखिल वाचा-

पालकामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत होते.

पालकाच्या सेवनाने हृदय निरोगी राहण्यास मदत होतो. 

पोषक तत्वांचा खजिना असलेल्या पालकाच्या सेवनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याने याला सुपरफूडही म्हंटलं जातं. पालक विविध प्रकारे आहारात सामाविष्ट करता येऊ शकता. फक्त पालकाच्या पानाचा ज्यूस तसचं पालक सूप आहारात समावेश करू शकता. त्याच सोबतच डाळ-पालक, पालक पनीर अशा भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आरोग्यास फायदा होवू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT