शरीरातून काढून टाका LDL Esakal
आरोग्य

How To Lower Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल रक्तात मिसळलंच नाही तर चिंता कशाला

जंकफूड किंवा तेलकट पदार्थांमधून निघणारे फॅट्स हे रक्तवाहिन्यांमध्ये Blood Vessels दीर्घ काळासाठी चिटकून बसतात आणि यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचा धोका वाढतो. यासाठी हे LDL रक्त वाहिन्यांमध्ये चिटकून राहणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

Kirti Wadkar

अलिकडे धकाधकीचं जीवन, कामाचा वाढता ताण आणि चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. यातील एक महत्वाची समस्या म्हणजे मानवी शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल Cholesterol . कोलेस्ट्रॉल म्हणजेच मुळात बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखणं गरजेचं आहे.

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यास हृदया विकारांचा Heart Diseases धोका वाढतो. खरं तर हे बॅड कोलेस्ट्रॉल Cholesterol कसं नियंत्रणात आणायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. Remove LDL from your body Cholesterol Control

तर दररोज अनेकजण मोठ्या प्रमाणात जंक आणि तळलेल्या पदार्थांचं Junk Food सेवन करत असतात. हे सर्व पदार्थ शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल (low-density lipoprotein) म्हणजेच लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल LDL वाढवण्याचं काम करत असतात.

जंकफूड किंवा तेलकट पदार्थांमधून निघणारे फॅट्स हे रक्तवाहिन्यांमध्ये Blood Vessels दीर्घ काळासाठी चिटकून बसतात आणि यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचा धोका वाढतो. यासाठी हे LDL रक्त वाहिन्यांमध्ये चिटकून राहणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

जर तुमच्या रक्तातच कोलेस्ट्रॉल मिसळलं गेलं नाही तर किंवा ते थेट शरीराबाहेर पडलं तर कोणती समस्याच निर्माण होणार नाही. काही पदार्थांच्या सेवनामुळे हे शक्य आहे. एका अभ्यासानुसार काही विरघळणाऱ्या फायबरमुळे रक्तात मिसळणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलचं शोषण रोखणं मदत होवू शकते हे समोर आलं आहे. हे फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल आपल्यासोबत घेऊन शरीराबाहेर पडतं. यासाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करणं गरजेंचं आहे. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

ओट्स- अनेकजण साधारण वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये ओट्सचा समावेश करतात. ओट्समध्ये असलेल्या फायबरमुळे वजन कमी होण्यास तर मदत होतेच शिवाय यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर टाकण्यासही मदत होते. ओट्समध्ये असलेल्या बीटा ग्लुकन्स नावाच्या घटकामुळे आतड्यांमध्ये जेल सारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते. यामुळे कोलेस्ट्रॉल शोषण्याचा रेट कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

हिरवे वाटाणे- प्रोटीनचा चांगला स्त्रोत असलेला हिरवा मटार हृदय विकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. हिरव्या मटारच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सॉल्यूबल म्हणजेच विरघळणारं फायबर आढळतं. यामुळे LDLम्हणजेच बॅट कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये चिकटत नाही आणि ते फायबरसोबत शरीरा बाहेर पडतं.

सफरचंद- सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. निरोगी राहण्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कॉलेस्ट्रॉलची समस्या दूर करून निरोगी हृदयासाठी सफरचंद फायदेशीर आहे. सफरचंदमध्येही सॉल्युबल फायबरचं प्रमाण जास्त असतं. हे फायबर आतड्यांमधील LDLमध्ये मिसळून ते मलावाटे शरीराबाहेर टाकण्याचं काम करतं. यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल साचण्याचा धोका कमी होतो.

आंबट फळं- संत्र, मोसंबी तसचं बेरीजमुळे देखील शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. अनेक आंबट फळांमध्ये मोठ्या प्रमाणात सॉल्यूबल फायबर आढळतात. ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल रक्तात न मिसळता ते शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. शिवाय या फळांमधील विटामिन सी आणि इतर पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासोबत इतर अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

बीन्स- आहारामध्ये बीन्स म्हणजे सोयाबीन, राजमा, चवळी या पदार्थांचा समावेश करणं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सॉल्युबल फायबर आढळतं. तसचं यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने सॅच्युरेटेड फॅट्स प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांसाठी बीन्स हा एक चांगला पर्याय आहे.

हे देखिल वाचा-

टोमॅटो- नेहमीच्या स्वयंपाकासाठी वापरण्यात येत असलेला टॉमेटो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं कंपाउंड असतं ज्यामुळे शरिरातील लिपिडची मात्र वाढते परिणामी बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. या शिवाय यात कोलेस्ट्रॉल कमी करणार फायबर आणि नाइसिनही असतं.

आहारात या पदार्थांचा समावेश केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल रक्तात मिसळण्यास प्रतिबंध होऊन हृदय विकारांचा धोका कमी होईल. यासोबतच पुरेशे झोप आणि व्यायामाच्या मदतीने देखील कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करणं शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT