Healthy Fruits For Winter esakal
आरोग्य

Healthy Fruits For Winter : हिवाळ्यात फिट राहायचं असेल तर आजच ही ५ फळे खायला सुरुवात करा

बदलत्या वातावरणाच्या या स्थितीत तुमची इम्युनिटी मजबूत राहावी यासाठी आहारातसुद्धा काही बदल महत्वाचे आहेत

साक्षी राऊत

Healthy Food For Winter : ऑक्टोबर महिना संपायला अवघे काहीच दिवस उरले असून सकाळी सकाळी थंडीची चाहूल लागयला सुरुवात झालीये. बदलत्या वातावरणाच्या या स्थितीत तुमची इम्युनिटी मजबूत राहावी यासाठी आहारातसुद्धा काही बदल महत्वाचे आहेत. हिवाळ्यात सर्दीमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही हेल्दी फळांचा तुमच्या आहारात समावेश करायला हवा.

हिवाळ्यात आहारात या फळांचा समावेश करून घ्या

सफरचंद

हिवाळ्याच्या दिवसांत सफरचंद खावे. यात असलेले व्हिटॅमिन सी इम्युन सिस्टिम मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय सफरचंदात फायबर, पेक्टिन आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे फळ मधुमेहाच्या रूग्णांसाठीही फायदेशीर आहे.

संत्री

आंबट चिंबट संत्री आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. या फळात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फोलेट आणि अनेक पोषक तत्व आढळतात.

पेरू

हिवाळ्यात पेरू हे फळ तुम्हाला बाजारात सहज मिळतं. पौष्टिक गुणांनी युक्त हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यात व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम, फायबर व्यतिरिक्त बरेच पोषक तत्व असतात. तुम्हा पचनासंबंधित समस्या असतील तर तुम्ही आहारात पेरूचा समावेश करून घ्यावा.

द्राक्षे

द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असतात. जे पचनशक्ती सुधारण्यास प्रोत्साहन देतात. यात असलेले नॅचरल फायटोकेमिकल सूज कमी करण्यास मदत करतात.

आलूबुखार

हे फळ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मँगनिज, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त गुणांनी भरपूर असते. हे फळ हाय बीपीच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर असते. यात उपलब्ध असलेले पोटॅशियम तुम्हीला हाय बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT