Healthy Life esakal
आरोग्य

Healthy Life : काही लोकांना कुठलाच आजार का होत नाही, असं काय खातात हे लोक? डॉक्टर्स म्हणाले...

निरोगी जीवन जगण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले तरी पण असे काही आहार आहेत ज्यांच्या मदतीने शरीर निरोगी बनवता येते

सकाळ ऑनलाईन टीम

Healthy Life : प्रत्येकाला दीर्घायुष्याची इच्छा असते, पण दीर्घायुष्यासह आजार नसतील तरच जगण्यात मजा आहे, नाहीतर अर्धे आयुष्य उपचारांतच गेले समजा. असे मानले जाते की दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी निरोगी आहार आणि निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. परंतु निरोगी आहारासाठी आपण काय खावे हे सर्वांनाच माहीत नसते. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की जपानसारख्या काही देशातील लोक खूप वृद्ध आहेत. मग हे लोक काय खातात आणि इतके दिवस का जगतात. निरोगी जीवन जगण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले तरी पण असे काही आहार आहेत ज्यांच्या मदतीने शरीर निरोगी बनवता येते.

नानावटी मॅक्स हॉस्पिटल, मुंबईच्या ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. रसिका माथूर सांगतात की, जर तुम्हाला निरोगी जगायचे असेल तर तुम्हाला सकस आहार घ्यावा लागेल. वनस्पती-आधारित आहारामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात. कदाचित यामुळेच काही ठिकाणी लोकांना कोणताही आजार होत नाही आणि ते दीर्घकाळ जगतात.

जीवन रोगमुक्त करण्यासाठी अनेक घटकांची आवश्यकता असू शकते. त्यासाठी आधी जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे. यानंतर आरोग्यदायी आहार खूप महत्त्वाचा आहे. असे पदार्थ खाल्ल्याने कोणताही आजार होणार नाही याची खात्री आपण देऊ शकत नाही, पण जर सकस आहार घेतला तर अनेक आजार टाळता येतात.

निरोगी आयुष्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा

1. डॉ. रसिका माथूर यांनी सांगितले की, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा अनेक गोष्टी शरीरात ऑक्सिडाइज होतात. यातून घातक रसायने तयार होतात. अँटिऑक्सिडंट्स हे हानिकारक प्रभाव टाळतात. हिरवा भाजीपाला आणि नैसर्गिक गोष्टींमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणूनच सर्वोत्तम आहार तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.

अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे तुम्हाला संसर्गही होत नाही. हे पदार्थ वृद्धत्व विरोधी देखील आहेत. वनस्पती-आधारित अन्नामध्ये कॅरोटीन असते जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, बीन्स, पालक, गाजर, बटाटे, एवोकॅडो, मुळा, रताळे, भोपळा, बीटरूट, केळी, गरम मसाले इत्यादींमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

2. व्हिटॅमिन सी - व्हिटॅमिन सीच्या सेवनाने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोणतेही आजार होत नाहीत. व्हिटॅमिन सी देखील वृद्धत्व विरोधी आहे. व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते. आंबट फळांचे सेवन व्हिटॅमिन सीसाठी पुरेसे आहे. टोमॅटो, लिंबू, संत्री, स्ट्रॉबेरी, काळा मनुका, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट, बटाटा, चेरी, मिरची, पेरू, किवी इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. तुम्ही रोज सॅलेट खाऊ शकता.

3. Omega 3 Fatty Acids - शरीर रोगमुक्त करण्यासाठी रोज ओमेगा 3 चे सेवन केले पाहिजे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप ताकद देते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. जेव्हा हृदयाचे स्नायू मजबूत होतील, तेव्हा जास्त काळ जगणे शक्य होईल. ओमेगा 3 फॅटी ऍसिडसाठी, तुम्ही मॅकेरल, सार्डिन, ट्यूना, सॅल्मन फिश, लिव्हर ऑइल, फ्लेक्स सीड्स, भोपळ्याच्या बिया, ऑयस्टर, चिया बिया, सोयाबीन इत्यादींचे सेवन केले पाहिजे. (Health)

4. डाळिंब - डॉ. रसिका माथूर यांनी सांगितले की, डाळिंब हे एक असे फळ आहे जे वृद्धत्व विरोधी देखील आहे आणि रोगांशी लढण्याची क्षमता देखील मजबूत करते. डाळिंबात अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरात जळजळ होऊ देत नाहीत. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की डाळिंबात कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत. डाळिंब हे प्रतिजैविक देखील आहे. याशिवाय मूत्रविकाराच्या समस्याही दूर करतात. डाळिंब हृदयाचे आरोग्य आणि मेंदूचे आरोग्य योग्य ठेवते.

5. प्रोटिन - डॉ. रसिका माथूर सांगतात की, शरीराला रोगांपासून मुक्त करण्यासाठी प्रोटीनचे सेवन देखील आवश्यक आहे. आपल्या देशात लोकांमध्ये प्रोटीनची खूप कमतरता आहे. म्हणूनच प्रत्येकाने प्रोटीनचे सेवन वाढवले ​​पाहिजे. प्रथिनांसाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. याशिवाय डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात. जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी अंडी, मासे, मटण पुरेसे आहे. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी बदाम, चीज, दूध, ताक, मसूर इत्यादी फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT