Healthy Nutrients  esakal
आरोग्य

Healthy Nutrients : 2023 मध्ये या पोषक घटकांनी वाढेल तुमची रोगप्रतिकारशक्ती

योग्य व्यायाम आणि डाएटपेक्षाही एक गोष्ट महत्वाची असते आणि ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती

सकाळ डिजिटल टीम

Healthy Nutrients : नवीन वर्षामध्ये अधिक चांगली रोगप्रतिकारशक्ती मिळविण्याचा संकल्प करत नव्या वर्षाची एक सुदृढ सुरुवात करा. योग्य व्यायाम आणि डाएटपेक्षाही एक गोष्ट महत्वाची असते आणि ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. रोगप्रतिकारशक्तीला पाठबळ देण्यासाठी चांगले पोषक घटक पोटात जाणं खूप गरजेच आहे.

पोषक घटकांच्या आपल्या खाण्यात वाढ केल्याने आपण अनेक आजारांवर नियंत्रण ठेवू शकतो. आहारात पुरेशा अन्नाचा समावेश नसलेल्या व्यक्ती, ज्यांना प्रमुख पोषक घटक असलेले अन्न मिळत नाही अशी माणसे, कुपोषित व्यक्ती किंवा आतिरिक्त पोषक घटकांचा आधार आवश्यक असलेल्या विशिष्ट आरोग्य समस्यांचा सामना करणारी माणसे यांची रोगप्रतिकारशक्ती खालावण्याचा धोका सर्वाधिक असतो. मात्र अधिक निरोगी सवयींच्या साथीने तुम्ही एक परिपूर्ण आयुष्य जगू शकता.

आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली तर आपल्याला अजून चांगल्या आरोग्याचे लाभ मिळू शकता. ही गोष्ट वयोवृद्ध लोकांसाठी जितकी खरी आहे तितकीच ती श्वसनमार्ग, यकृताचे विकास, संधीवात, मधुमेह यांसारख्या प्रदीर्घ आरोग्य समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींनाही लागू होणारी आहे. अशा व्यक्तींनी तर स्नायूंची झीज आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी अधिकच सतर्क राहणे गरजेचे असते.

अधिक चांगली रोगप्रतिकारशक्ती मिळविण्यासाठी अबॉटच्या न्यूट्रीशन बिझनेसच्या मेडिकल अँड सायन्टिफिक अफेअर्स विभागाचे अध्यक्ष डॉ. इरफान शेख महत्त्वाच्या पोषक घटकांची यादी आणि त्यांचे स्त्रोत यांची यादी देत आहेत. हे पोषक घटक तुम्हाला सुदृढ बनवू शकतील:

1. एचएमबी (Beta-hydroxy-beta-methylbutyrate)

हा घटक स्नायूंचे विघटन अथवा झीज होण्याची प्रक्रिया मंदावत आपल्या स्नायूंचे संतुलन राखण्याचा एक मार्ग म्हणून काम करतो. आपले शरीर ल्यूसाइन (leucine) नावाच्या अत्यावश्यक अमिनो आम्लाच्या विघटनप्रक्रियेद्वारे हा घटक नैसर्गिकरित्या निर्माण करते, मात्र हे आम्ल एचएमबीमध्ये परिवर्तित होण्याचे प्रमाण खूप कमी असते. अव्हॅकाडो, ग्रेपफ्रुट आणि कॉलिफ्लॉवरसारख्या पदार्थांमध्ये हा घटक लहान प्रमाणात उपलब्ध असतो.

2. प्रथिने

शरीरातील प्रतिजैविके आणि रोगप्रतिकारक यंत्रणेतील पेशी घडविण्यासाठी त्याची आवश्यकता असते. तसेच प्रथिनांची निर्मिती करणारी काही अमिनो आम्लेही रोगप्रतिकार यंत्रणेतील पेशींना महत्त्वाचे असलेले इंधन पुरविण्याचे काम करतात. अंडी, चणे, पनीर, क्विनोआ, ग्रीक योगर्ट, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणे आणि बदाम मदत करू शकतात.

3. अ जीवनसत्त्व

अ जीवनसत्त्व रोगप्रतिकारयंत्रणेच्या नियमनास मदत करते. ‘अँटी-इन्फेक्टिव्ह व्हिटॅमिन’ अर्थात संसर्गांना प्रतिबंध करणारे जीवनसत्व म्हणून ओळखला जाणारा हा घटक आपली त्वचा, तोंड, पोट आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवतो, जेणेकरून त्यांना संसर्गाशी अधिक चांगल्या प्रकारे लढा देता यावा. शिवाय याने आपली नजरही तीक्ष्ण होते. रताळी, भोपळा, गाजर आणि पालकामध्ये अ जीवनसत्व असतं.

4. व्हिटामीन सी

व्हिटामीन सी आपली त्वचा आणि शरीरातील संयोगी उती (connective tissue) यांच्या उभारणीच आणि बाहेरील सूक्ष्मजीवांना शरीरात येण्यापासून अडवण्याच काम करतं. संत्री, किवी, स्ट्रॉबेरीज, ब्रोकोली, टोमॅटो, कॉलिफ्लॉवर आणि रेड पेपर्स या पदार्थांमध्ये व्हिटामीन सी आढळते.

5. व्हिटामीन ई

व्हिटामीन ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते व पेशीपटल अर्थात सेल मेम्ब्रेन्सचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करते. निरोगी पेशीपटल बाह्य सूक्ष्मजीवसंस्थांना बाहेर ठेवण्यास मदत करते आणि आजारांचा योग्य प्रतिकार करते. व्हिटामीन ई हे बहुतांश पदार्थांमध्ये सहज आढळते. खाद्यतेले, बिया आणि सुक्यामेव्याचे पदार्थ हे या जीवनसत्वाचे अत्यंत समृद्ध स्त्रोत आहेत.

6.व्हिटामीन डी

व्हिटामीन डी रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय ठेवण्यास आणि त्यांचे कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत करते. हा बहुगुणी पोषक घटक आपल्या शरीरात कॅल्शियम शोषले जाण्याच्या क्रियेला मदत करतो. निसर्गत:च व्हिटामीन डीने समृद्ध असलेले फारसे पदार्थ नाहीत. काही चरबीयुक्त माशांचे मांस आणि फिश लिव्हर ऑइल, अंड्यातील पिवळा बलक, संत्र्याचा रस आणि चीज हे ड जीवनसत्व मिळविण्याचे काही स्त्रोत आहेत.

7. झिंक

हा धातू जखम भरून काढण्यासाठी आणि रोगप्रतिकार यंत्रणेतील नवीन पेशींच्या संश्लेषणासाठी महत्त्वाच्या असलेल्या पेशींच्या पुनर्निर्माणामध्ये मदत करतो. योग्य वाढ आणि विकासासाठी, विशेषत: बालपण, किशोरवयात आणि गर्भावस्थेमध्ये ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. चणे, डाळी आणि शेंगा या सर्व गोष्टींतून झिंकचा व्यवस्थित पुरवठा होऊ शकतो.

8. द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स

द्रवपदार्थ (पाणी) आणि सोडियम, पोटॅशियम व क्लोराइड यांसारखे इलेक्ट्रोलाइट्स पुरेशा प्रमाणात घेतल्यास शरीराचे तापमान नियमित राहते. हे घटक आपल्या पेशी आणि उतींना निरोगी ठेवतात, शरीरातील टाकाऊ घटक बाहेर टाकतात आणि आपल्या शरीरातील आर्द्रता अधिक चांगल्या प्रमाणात टिकविण्यासाठी शरीराला द्रवपदार्थ टिकवून ठेवण्यातही मदत करतात.

हिरव्या पालेभाज्या, केळी, प्रून्स आणि सुकविलेल्या अॅप्रिकॉट्ससारख्या अनेक पदार्थ आणि पेयांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात. याखेरीज शेंगा, डाळी, सुक्यामेव्याचे पदार्थ, सँड सीड्स यांतूनही बऱ्यापैकी इलेक्ट्रोलाइट्स मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT