Healthy Sleep Healthy Life Sakal
आरोग्य

Healthy Sleep: तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण का वाढले ? हृदयरोग तज्ज्ञ सांगतात झोपेचे महत्त्व

Healthy Sleep: हृदयविकाराचा झटक्याने मृत्यूचे प्रमाण वृद्धांमध्येच नव्हे तर तरुणांमध्येही आढळून येत आहे, त्याचे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Healthy Sleep: हृदयविकाराचा झटक्याने मृत्यूचे प्रमाण वृद्धांमध्येच नव्हे तर तरुणांमध्येही आढळून येत आहे, त्याचे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वोक्हार्ट रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी यांनी केले. ‘सकाळ’ कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी वोक्हार्ट रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमय बिडकर, डॉ. दिनेश पडोळे, विपणन प्रमुख जितेंद्र झाडे, विपणन व्यवस्थापक अमर कुमरे उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांनी हृदयविकार व त्यावरील उपायांबाबत चर्चा केली. हृदयविकारासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. हृदयविकाराचा झटक्याने मृत्यूचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तणाव असल्याचे ते यावेळी म्हणाले.

दररोज ‘मर्निंग वॉक’ गरजेचा: बिडकर

दररोज ‘मर्निंग वॉक’ आरोग्यासाठी आवश्यक आहे. शारीरिक तंदरुस्ती ही महत्त्वाची आहे. दररोज किमान ३० मिनिटे चालल्याने आरोग्य चांगले राहते. सकाळच्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण जास्त राहते. चालण्यासोबतच सकाळी व्यायाम सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.

अधिक वजन उचलणे धोकादायक: पडोळे

जीममध्ये जाणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. जास्त भारी वजन उचलल्याने अनेकांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जीम प्रशिक्षकांना आपात्कालीन उपचाराचे प्रशिक्षण आवश्यक आहे. जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवल्यास या प्रशिक्षणाचा उपयोग जीव वाचविण्यासाठी होऊ शकतो असे डॉ. दिनेश पडोळे म्हणाले.

भीती नको जागरूकता हवी: तिवारी

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकांची भंबेरी उडते. भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. हृदयविकाराचा झटका येणे हे आनुवंशिक सुद्धा असू शकते. तंदुरुस्त राहण्यासाठी जीम करणे हा एकमेव उपाय नसून चांगले राहणीमान व योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा असल्याचे डॉ. नितीन तिवारी यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT