Foods For Brain  esakal
आरोग्य

Foods For Brain : छोट्या-छोट्या गोष्टींचा विसर पडतोय? मग, मेंदूला तल्लख बनवण्यासाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Foods For Sharp Brain : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. संपूर्ण आरोग्याची आपण नीट काळजी घेतो परंतु, मेंदूकडे आपले काहीसे दुर्लक्ष होते. मेंदू हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे. परंतु, मेंदूची आपण कमीतकमी काळजी घेतो. त्यामुळे, वाढत्य वयासोबतच मेंदू देखील हळूहळू कमकुवत होऊ लागतो.

वय वाढले की, अनेकदा काही गोष्टींचा विसर पडू लागतो. अनेकदा महत्वाच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. अशा स्थितीमध्ये तुम्ही मेंदूची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, मेंदू तल्लख व्हावा, यासाठी काही खाद्यपदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करायला हवा. हे खाद्यपदार्थ मेंदू निरोगी ठेवतात आणि कमकुवत स्मरणशक्तीसारख्या समस्या टाळतात. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट खायला सगळ्यांनाच आवडते. हे डार्क चॉकलेट आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉईड्स सारखे घटक आढळतात. हे एक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आहे. त्यामुळे, डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणाऱ्या नुकसानापासून मेंदूचे संरक्षण होण्यास मदत होते. शिवाय, मेंदूचे आरोग्य निरोगी राहते. डार्क चॉकलेटचे सेवन मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु, या चॉकलेटचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.

बेरीज

बेरीजमध्ये अँथोसायनिन मोठ्या प्रमाणात आढळते. हा दाहकविरोधी घटक असून, बेरीजमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स देखील विपुल प्रमाणात असतात. हे सर्व पोषकघटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. बेरीजचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत होते. या व्यतिरिक्त बेरीजचे सेवन केल्याने अल्झायमर प्रतिबंधित केला जातो. त्यामुळे, तल्लख मेंदूसाठी आहारात बेरीजचा जरूर समावेश करा.

सॅल्मन

प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंडी, मासे आणि चिकनकडे प्रामुख्याने पाहिले जाते. सॅल्मन या माशामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळते. हे ॲसिड मेंदूसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. हे ओमेगा-३ फॅटी ॲसिड न्यूरॉन्सला निरोगी बनवण्यास मदत करतता. यासोबतच सॅल्मनमध्ये आढळणारे इतर पोषकघटक कॉग्निटिव्ह हेल्थसाठी प्रभावी मानले जातात. त्यामुळे, तुमच्या आहारात या माशाचा जरूर समावेश करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

SCROLL FOR NEXT