Heel Pain  esakal
आरोग्य

Heel Pain : टाचेचे दुखणे जरा गांभीर्याने घ्या! नाहीतर..

तळपायापासून टाचेपर्यंतचा भाग काही कारणांमुळे दुखत असेल तर टाचदुखीचे कारण जाणून घ्यावे

सकाळ ऑनलाईन टीम

Heel Pain : गुडघेदुखी तसेच कंबरदुखीसारखे टाचेचे दुखणे सामान्य झाले असून अलीकडे चाळीशीनंतर हे दुखणे हैराण करते. पायाच्या तळव्याच्या मधल्या भागात, तळव्याच्या कडेला किंवा पाठीमागच्या भागात वेदना जाणवतात, त्यावेळी होणाऱ्या दुखण्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय टेकवताना होणाऱ्या वेदना असह्य असतात.

बराच वेळ एका ठिकाणी बसून राहिल्यावर उठताना पायाचा पंजा जमिनीवर टेकवताना टाच दुखते. थोडी पावले चालल्यावर मात्र वेदना कमी होतात. तळपायापासून टाचेपर्यंतचा भाग काही कारणांमुळे दुखत असेल तर टाचदुखीचे कारण जाणून घ्यावे.

अधूनमधून पायांचे दुखणे जाणवत असेल तर तुमचे पायाचे पंजे तपासून घ्यावे. ज्यांचे पाय सपाट असतात अशा लोकांना भविष्यात पायाचा आणि गुडघ्याचा त्रास होण्याची शक्यता असते. अनेकांना पाय सपाट आहेत, हे माहीत नसते. शूजमध्ये योग्य ते बदल करण्याचा सल्ला अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ देतात. याशिवाय आहारात कॅल्शिअमची कमतरता होऊ देऊ नये, व्हिटॅमिन डी, मिनरल्स आहारातून शरीराला मिळावे, असे ज्येष्ठ अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी म्हणाले.

टाच दुखण्याची कारणे

कडक बूट घातल्याने

चपलेला व्यवस्थित सपोर्ट नसल्याने

व्यवस्थित हिल सपोर्ट नसल्याने

उंच टाचेच्या चपला दीर्घकाळ वापरल्याने

पायाचे स्नायू घट्ट असल्याने

अशी घ्यावी प्राथमिक काळजी

टाच १५ ते २० मिनिटे बर्फाने शेकावे.

शक्यतो जास्त वेळ उभे राहणे टाळावे

त्रास वाढल्यास जॉगिंग, धावणे टाळावे

बेडवरून खाली उतरून बोटांवर उभे राहावे

शूजमधे हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करा.

झोपेतून उठल्या उठल्या सर्वांत आधी पंजे वर-खाली करावे (Lifestyle)

प्लांटर फसायटिस हा जाड टिश्यू पायाच्या तळव्यात असतो. यावर सूज आल्यास वेदना होतात. यामुळे टाच दुखते. स्थूल व्यक्तीमध्ये हा प्रकार जास्त आढळतो. टाचेच्या हाडाला इजा झाल्यास तसेच टाचेच्या मागच्या भागाला असलेल्या फ्लुईडने भरलेल्या पिशवीला इजा झाल्यास आणि कॅल्शिअम साठून टाचेच्या हाडांची वाढ होते, त्यामुळे देखील टाच दुखते. याशिवाय ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं, अशा लोकांमध्ये टाचेवरचे नैसर्गिक आवरण दुखावले जाते. भार सहन करण्याची क्षमता कमी होते. संधीवात तसेच एखादा संसर्ग होऊन पायाला दुखापत झाली असेल तर टाचा दुखू शकतात, टाचदुखीवर हमखास उपचार आहेत. मात्र ते उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून घ्यावे. (Health)

-डॉ. संजीव चौधरी, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT