High BP : हाय ब्लड प्रेशरने जगभरातील एक तृतीयांश लोखसंख्या प्रभावित आहे. यावर योग्य उपाययोजना केल्या गेल्यास २०२३ ते २०५० पर्यंत ७६ मिलीयन मृत्यू टाळता येतील. असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, IHCI अंतर्गत जून २०२३ पर्यंत भारताच्या २७ राज्यांतर्गत जवळपास ५.८ मिलीयन लोकांवर हाय बीपीच्या त्रासावर उपचार सुरु आहेत.
TOI च्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, WHO च्या रिपोर्टमध्ये जगभरातील ३०-७९ वयोगटातील लोकांमध्ये हाय बीपीचा त्रास एक तृतीयांश असल्याचा अंदाज आहे. यातील २१ टक्के लोकांनी त्यांचे हाय बीपी नियंत्रणात आणले आहे.
छातीचे दुखणे - बीपी हाय झाल्यावर छातीचे दुखणे जाणवते.
डोकेदुखी - बरेचदा हाय बीपीच्या रूग्णांना डोकेदुखीचा त्रास असतो.
चक्कर येणे - हाय बीपीमुळे अनेकदा गरगरल्यासारखे वाटू शकते.
दृष्टी कमजोर होणे - काही प्रकरणांमध्ये हाय बीपीमुळे दृष्टी कमजोर होऊ शकते.
कोरडा खोकला आणि थकवा - काही प्रकरणांमध्ये रूग्णांना कोरडा खोकला आणि थकवा जाणवतो. (Lifestyle)
हाय बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच लोक औषधांवर अवलंबून असतात. मात्र काही घरगुती उपाय करूनही तुम्ही हाय बीपी नियंत्रणात ठेवू शकता.
लिंबू पाणी - कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून तुम्ही त्याचे सेवन केल्यास हाय ब्लशरच्या त्रासातून मुक्ती मिळेल.
लसूण - लसणात सल्फर असते. तेव्हा हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होते.
तुळशी - तुळशीची पाने बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते.
दिनचर्येत बदल - नियमित व्यायाम करा. आणि हेल्दी डाएट फॉलो करा.
स्ट्रेस - स्ट्रेस कमी करण्यासाठी प्राणायम करा. (Health)
कायम डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. हाय बीपी भविष्यात गंभीर आजाराचे कारण ठरू शकते. तेव्हा हेल्दी डाएट आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरु ठेवा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.