High Carb Foods: आजकाल कोणाला नक्की कोणता आजार होईल काही सांगता येत नाही. लहान लहान मुलांना सुद्धा भयानक असे आजार होता आहेत. अशात आपणच आपली पथ्य पाळली तर याचा धोका कमी होऊ शकतो.
सध्या सगळ्यांना अगदीच होणारे आजार म्हणजे कॅन्सर, लो बीपी आणि डायबिटीस. बाकी काही आजार तरी बरे होतात पण डायबिटीस एकदा लागलं की लागलं. मरेपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागते.
अनेकदा लोकांना वाटतं की फक्त साखर न खाल्ल्याने डायबिटीस चा धोका टळतो पण अस काहीही नाहीये. एकदा का डायबिटिसने थैमान घातलं की त्यातून सुटका होणे अगदीच कठीण. यात खाण्या पिण्याबाबत भरपूर काळजी घ्यावी लागते. वेगवेगळे पथ्य पाळावी लागतात. नाही केली तर शुगर वाढते आणि यात खूप धोका असतो.
अचानक लोकांना हार्टअटॅक सुद्धा येऊ शकतो. डायबिटीस पेशंट अशात खूप काळजी घेतात आणि साखर असलेले पदार्थ खाणं टाळतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की फक्त साखर किंवा साखर असलेले पदार्थ खाल्ल्यानेच शुगर वाढत नाही तर बाकीही काही पदार्थ आहेत ज्याने तुमची शुगर वाढू शकते.
साखरसुद्धा आहे कार्बोहायड्ेट्सचा एक प्रकार
हे जाणून आश्चर्य वाटेल की साखर देखील सर्वात प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, जो रक्तात वेगाने विरघळतो. शिवाय, स्टार्च आणि फायबर हे त्याचे जटिल प्रकार आहेत. कार्बोहायड्रेट फूड ज्यामध्ये साखर आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते, त्यांचा दर्जा खराब मानला जातो. हे पदार्थ खाणे टाळावे.
मुळात शुगर वाढणं म्हणजे रक्तातले ग्लुकोज चे प्रमाण वाढणं आणि हे हाय कार्बोहाइड्रेट मुळेही वाढू शकते. म्हणूनच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ नसावेत यावर बारीक लक्ष दिले पाहिजे.
भारतीय संशोधकांनी डायबिटीसमध्ये कार्बोहायड्रेटची (कार्ब्स) भूमिका जाणून घेण्यासाठी एक संशोधन केले. हे संशोधन, पबमेड सेंट्रलवर प्रकाशित झाले.
यात असे आढळले की हाय-कार्ब डाएट खाणे हे टाइप 2 डायबिटीसच्या विकासाशी संबंधित आहे आणि त्याचे व्यवस्थापन करण्यात अडचण आहे. पण, कार्बोहायड्रेट्सच्या प्रमाणापेक्षा त्यांची गुणवत्ता कारणीभूत असल्याचे दिसून आले.
हाय कार्बोहाइड्रेट असलेले पदार्थ
१. सोडा, एअरटाईट ज्युस
उन्हाळ्यात तापमान खूप वाढलेले असते अशात लोक टेट्रा पॅकमध्ये असलेले ज्युस किंवा सोडा घेण्याचा विचार करतात. पण या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात शुगर काँटेन असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत.
२. बटाटा-कॉर्न चिप्स, फ्रेंच फ्राईज
जर तुम्ही बटाटा चिप्स, कॉर्न चिप्स किंवा फ्रेंच फ्राईजचे शौकीन असाल तर तुम्ही टाइप 2 डायबिटीसचा शिकार होऊ शकता. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यासोबत भरपूर फॅट्स असतात.
हे कार्बोहायड्रेट पदार्थ आरोग्यदायी आहेत
अंडी
avocado
बदाम
अक्रोड
ओट्स
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.