Symptoms of High Cholesterol Esakal
आरोग्य

Symptoms of High Cholesterol: डोळ्याभोवती निळे डाग दिसतायत? सावधान, ‘ही’ आहेत Cholesterol वाढल्याची लक्षणं

खरं तर मानवी शरीराचं Human Body गणित बिघडलं तर अनेकदा ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला संकेत देत असतं. असंच कोलेस्ट्रॉलच्या बाबतीतही आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षण ही आपल्या शरीरात काही अन्य बदल घडवून आणत असतात

Kirti Wadkar

Symptoms of High Cholesterol: बदलत्या जीवनशैलीमुळे तसचं चुकीच्या आहार पद्धती आणि तणावपूर्ण राहणीमान यामुळे अलिकडे कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

अगदी कमी वयातच कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या निर्माण झाल्याने तरुणांमध्ये हार्ट अटॅक Heart Attack येण्याचं प्रमाणही वाढलं आहे. कमी वयात हृदयासंबधीत आजार वाढू लागल्याने चिंता वाढतेय. High Cholesterol Warning Sign WatchOut-for-White-Grains-Around Eyes

अनेकदा रक्तात कोलेस्ट्रॉल Cholesterol वाढलंय याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. परिणामी स्ट्रोक, उच्च रक्त दाब High Blood Pressure तर कधी हार्ट अटॅक अशा गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची वेळ येते. 

खरं तर मानवी शरीराचं Human Body गणित बिघडलं तर अनेकदा ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला संकेत देत असतं. असंच कोलेस्ट्रॉलच्या बाबतीतही आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षण ही आपल्या शरीरात काही अन्य बदल घडवून आणत असतात.

High cholesterol symptoms त्यामुले त्या बदलांकडे गांभिर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. ही लक्षण वेळीच ओळखता आलीत तर आपण वेळीच काळजी घेऊन किंवा औषधोपचार करून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणू शकतो आणि पुढील धोका टळू शकतो. तर कोलेस्ट्रॉल वाढलंय हे तुम्ही कसं ओळखाल?

  1. जैंथिलास्मा Xanthelasma- कोलेस्ट्रॉल वाढल्याचं एक मुख्य लक्षण म्हणजेच जैथिलास्मा. यामध्ये डोळ्यांच्या भोवती पिवळटपणा दिसू लागतो. त्वचेखाली जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलमुले हा पिवळटपाणा दिसू लागतो. यामुळे कोणत्याही वेदना होत नाहित त्यामुळे बऱ्याचदा या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. 

  2. ऑर्कस सेनिलिस – ऑर्कस सेनिलिस हे एक असं लक्षण आहे ज्यात तुमच्या डोळ्यांच्या कॉर्नियाच्या चारही बाजुंना निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा थर जमा होवू लागतो. कॉर्नियाच्या वरच्या किंवा खालच्या बाजूने असे चट्टे तयार होण्यास सुरुवात होते. कालांतराने ते अधिक वाढू शकतात. शरीरात जास्त फॅट जमा झाल्याने असं होतं. 

  1. शरीरावरील गाठी- अनेकदा शरीरावरील कोणत्याही भागात गाठी होवू लागतात. यालाच लायपोमा Lipoma म्हणतात. हा एका प्रकारचा ट्युमर असतो. तो लहान मोठा असू शकतो. मात्र गाठींमुळे कोणत्याही वेदना होत नाहीत. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्यास खांद्यावर, हातांवर किंवा पायांवर अशा प्रकारच्या ट्युमरच्या गाठी तयार होतात. शरीरावर अशा प्रकारच्या गाठी दिसणं म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत समजावे. 

  2. सेंट्रल रिटिनल ऑर्टरी Retinal vein occlusion- या लक्षणामध्ये डोळ्यातील नसांमध्ये ब्लॉकेज झाल्याने डोळ्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यासारख्या दिसतात. किंवा संपूर्ण डोळा लाल दिसू लागतो. यात कोणत्याही वेदना होत नसल्या तरी यामुळे दृष्टीसंबंधित गंभीर समस्या निर्माण होवू शकते. तसचं दृष्टी जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे हे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे.

  3. पाय आणि हातांच्या त्वचेवर परिणाम- डोळ्याभोवती दिसणाऱ्या निळ्या आणि पिवळ्या रंगांच्या मेणासारख्या चट्ट्यांप्रमाणेत पायच्या खालील त्वचेवर तर हातांच्या मागील त्वचेवर निळ्या आणि पिवळ्या रंगाचे कण तयार होता. याला जैथोमा म्हणतात. 

    हे देखिल वाचा-

  1. सोरायसिस-नवीन शोधानुसार हाय कोलेस्ट्रॉल high Cholesterol आणि सोरायसिसमध्ये संबध असल्याचं निदर्शनास आलं आहे. यालाच हायपरलिपिडिमिया म्हणून संबोधल जातं. यात अनेक आजारांचा समावेश असतो. यामुळे रक्तातील चरबीचं प्रमाण वाढतं. हायपरलिपिडिमियावर उपचार होणं शक्य असलं तरी अनेकदा आयुष्यभर ही समस्या कायम राहण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच जीवनशैलीत योग्य बदल केल्यास याचा त्रास कमी होण्याची शक्यता असते.

  2. त्वचेता रंग बदण, कोरडी होणं- कोलेस्ट्रॉल वाढल्यास यामुळे त्वचेखाली असलेल्या नसांमधील रक्तप्रवाह कमी होवू शकतो. त्यामुळे त्वचेच्या पेशींना पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्वचेचा रंग बदलू लागतो. तसचं जर तुम्ही जास्त काळ उभे राहिलात तर पायाकडील भाग जांभळा पडू शकतो. याऊलट जर पाय उंच ठिकाणी ठेवले असतील तर ते पिवळे दिसू शकतात.

शरीरातील ही लक्षण ओळखून वेळीच खबरदारी घेतल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होवू शकते. यासाठी कोलेस्ट्राल कमी होण्यासाठी योग्य तो आहार घेणं Foods For Cholesterol, पुरेशी झोप तसचं व्यायाम करणं हे पर्याय योग्य ठरतील.

तसचं तणाव कमी घेणं हा देखील ही देखील एक महत्वाची बाब आहे. योग्य काळजी घेतल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणणं सहज शक्य आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT