Holi Colours and Respiratory problems: होळी ( Holi 2022) आनंदाचा उत्सव आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावतात. एकीकडे काही लोक मज्जा-मस्तीकर सणांचा आनंद घेतात तर काही लोकांसाठी हा रंग खूप हानिकारक सिद्ध होऊ शकतो. होळीसाठी कृत्रिम रंग तयार करण्यासाठी हानिकारक रसायनांचा (Chemicals)खूप वापर केला जातो, ज्यामुळे लोकांना त्वचा, डोळ्यासंबधित समस्या निर्माण होतात.हे रंग त्यांना नुकसान पोहचवू शकते. तसेच होळीमध्ये हे हानिकारक रंग श्नसनाच्या आजारानेग्रस्त(Respiratory Disorders) लोकांच्या जीवावरही बेतू शकतात.
शारदा हॉस्पिटल(ग्रेटर नोएडा) च्या प्रोफेसर, रेस्पिरेटरी मेडिसन डॉ. देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, होळीचे हानिकारक रंग श्वसनासंबधीत अॅलर्जीसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे राइनाइटिस (Rhinitis) न्यूमोनाइटिस (Pneumonitis), अस्थमा संबंधित अॅलर्जीसाठी (respiratory allergies) कारणीभूत ठरू शकतात.
राइनाइटिस अॅलर्जी होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्य रंगामुळे नकामध्ये दाहकता (inflamtory) प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे नाक वाहणे, शिंका येणे, नाक बंद होणे सारखी लक्षणे दिसू लागतात. न्यमोनाईटिस तेव्हा होतो, जेव्हा रासायनिक घटक नाकाच्या वाटे शरीरामध्ये जातात. यामध्ये छातीमध्ये कफ साचणे, श्वास घेण्यासा त्रास होणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. अस्थमा रुग्णांना होळीमध्ये रंगापासून जास्त वाचले पाहिजे. बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक रंगांमध्ये लहान PM10 कण असतात, ज्यामुळे श्वसनमार्ग खराब होऊ शकतो. त्यामुळे लोकांना श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
गर्दीच्या ठिकाणी जाऊन होळी खेळण्याची चूक करू नका
आपल्या घराची बाल्कनी किंवा टेरेसवर जाऊन होळीचा आनंद घेणार असाल तर डस्ट मास्क वापरा
नैसर्गिक किंवा हर्बल रंगाचा करा वापर. सुक्या रंगाऐवजी करा ओल्या हर्बल रंगाचा वापर योग्य असेल कारण ते नाकात किंवा श्वासामध्ये जात नाही.
होळीच्या दिवशी शरीरावर नारळाचे किंवा ऑलिव ऑईल लावा, जेणेकरून कोणी रंग लावला तरी पटकन रंग निघतो.
जर तुम्हाला हातावर रंग किंवा लिक्विड रंग लागला असेल तर काही खाणे टाळा. पहिल्यांदा हात स्वच्छ धूवून घ्या
अस्थमामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, इनहेलर सोबत ठेवा जेणेकरून थोडा जरी त्रास झाला तरी तुम्हाला ऐनवेळी शोधावे लागणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.