Clean Teeth Tips esakal
आरोग्य

Clean Teeth Tips : पिवळे दात झटक्यात होतील पांढरे शुभ्र, त्यासाठी करा हा उपाय

आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचे पिवळे दात अगदी झटक्यात पांढरे शुभ्र दिसतील

सकाळ डिजिटल टीम

Clean Teeth Tips : आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेबरोबरच दातांची स्वच्छता तर महत्वाची आहेच पण त्याबरोबरच तुमच्या दातांचा रंगही महत्वाचा ठरतो. हसताना तुमचे दात पिवळे असतील तर पुढल्या व्यक्तीच्या नजरेत तुमचं बॅड इम्प्रेशनसुद्धा पडू शकतं. पिवळे दात होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचे पिवळे दात अगदी झटक्यात पांढरे शुभ्र दिसतील.

दातांना या उपायांनी करा पांढरे शुभ्र

रोज सकाळी ब्रश केला म्हणजे दातांचा पिवळेपणा जातो असे काही नाही. दाताचं पिवळेपण घालवण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोड्याचा वापर करावा लागेल. तुम्हाला त्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोड्यात चिमुटभर मिठ टाकायचं आहे. तसेच बोटांच्या मदतीने त्याला दातांवर घासा. दोन ते तीन वेळा हे करा. त्यानंतर तुमच्या दातांचा रंग तुम्ही बदललेला बघाल. तुमचे दात अगदी पांढरे शुभ्र दिसतील.

हेल्थ एक्सपर्टच्या मते ज्यास्त कोल्ड ड्रिंक पिल्यानेसुद्धा दात पिवळे होतात. त्यामुळे कोल्ड ड्रिंक, सोडा, चहा, रेड वाइन यांसारख्या पेयांपासून दूर राहावे. यामुळे जर तुमच्या दातांना पिवळेपणा आला असेल तर आल्याची पेस्ट बनवा आणि त्याला तुमच्या टूटपेस्टमध्ये मिक्स करून घ्या. याने तुमचा ब्रिदिंग स्मेल दूर होईलच सोबतच तुमचे दात पांढरे शुभ्र होतील. (Adverse Effect On Teeth)

आयुर्वेदात तुळशीची पानं ही फार गुणकारी असल्याचे सांगितल्या गेलेय. तुलशी आणि कडूनिंबाची पेस्ट दातांचा पिवळेपणा दूर करते. आणि दातांना मजबूत बनवते. तुम्हाला पेस्टमध्ये तुळशी आणि निंबाची पेस्ट मिक्स करून त्यांने ब्रश करायचा आहे. त्यामुळे तुमचे दात मजबूत होतील आणि दातांचा पिवळेपणाही जाईल. (Lifestyle)

डिस्क्लेमर - वरील लेख घरघुती उपायांवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT