prostate cancer symptoms and treatment Esakal
आरोग्य

पुरुषांमध्ये Prostrate Cancerचा धोका वाढतोय, काय आहेत लक्षण आणि उपाय ?

Prostate cancer symptoms and treatment: वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ही ग्रंथी वाढू शकते आणि कॅन्सरचा धोका निर्माण होवू शकतो. प्रोस्टेट ग्रंथीतील कॅन्सर कालांतराने शरीरातील इतर अवयवांपर्यंत पसरू शकतो. अनेकदा अनुवांशिकता किंवा लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो

Kirti Wadkar

गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये प्रोस्टेट Prostrate Cancer कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसत आहे. WHOच्या एका अहवालानुसार २०२० सालामध्ये १० मिलियन म्हणजेच जवळपास १ कोटी पुरुषांचा प्रोस्टेट कॅन्सरमुळे मृत्यू Death झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर गेल्या वर्षी जगभरात, अंदाजे १.४१ दशलक्ष पुरुषांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झालं. How to avoid prostrate Cancer through lifestyle and food

६० टक्के केसेसमध्ये हा कर्करोग Cancer ६५ वर्षांवरील पुरुषांमध्ये होत असल्याचं आढळून आलं आहे. तरी काही तरुणांदेखील प्रोस्टेट कॅन्सरचं Prostrate Cancerनिदान झालं आहे. प्रोस्टेट ही पुरुषांमध्ये आढळणारी एक ग्रंथी आहे. शिश्न आणि मूत्राशयाच्या मधल्या भागात साधारण अकरोडाच्या आकाराएवढी ही ग्रंथी असते.

वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ही ग्रंथी वाढू शकते आणि कॅन्सरचा धोका निर्माण होवू शकतो. प्रोस्टेट ग्रंथीतील कॅन्सर कालांतराने शरीरातील इतर अवयवांपर्यंत पसरू शकतो. अनेकदा अनुवांशिकता किंवा लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

तज्ञांच्या मते प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीच्या काळामध्ये विशेष लक्षण दिसून येत नाहीत. जोपर्यंत कॅन्सर मूत्राशयातील ट्यूबवर दबाव टाकेल इतका मोठा होत नाहीत तोवर या कॅन्सरची लक्षण दिसून येत नाहीय. या कॅन्सरमुळे पुरुषांमध्ये नपुंसकता तसचं इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या निर्माण होवू शकते.

हे देखिल वाचा-

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं

वारंवार लघवीला होणं. खास करून रात्रीच्यावेळी वारंवार लघवीला जावं लागणं-

लघवी करताना त्रास होणं.

ओटीपोटामध्ये वेदना होणं.

लघवी केल्यानंतरही ब्लॅडर भरलेलं असल्याची सतत जाणीव.

प्रोस्टेट कॅन्सरमध्ये काहीवेळा लघवीमधून रक्त येऊ शकतं.

वीर्यातून रक्त येणं

तसंच वारंपार पाय दुखणं

इरेक्टाइल डिसफंक्शन

प्रोस्टेट कर्करोगामध्ये ही काही लक्षणं कालांतराने दिसून येतात. अर्थाच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य चाचण्या केल्याशिवाय या कर्करोगाचं निदान केलं जातं नाही. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक गरजेचं आहे.

प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य थेरपी घ्यावी. मात्र हा कॅन्सर होवू नये यासाठी काही उपाय करणं शक्य आहे.

प्रोस्टेट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी सर्वप्रथम चांगली जीवनशैली आणि पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. यामध्ये खास करून आहारात फ्लाॅवर आणि कोबी सारख्या भाज्यांचा समावेश करावा.

हे देखिल वाचा-

तसंच ओमेगा ३ फॅटी ऍसिड असलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. यासाठी आहारामध्ये कुपा, रावस, ट्राउट अशा माशांचं सेवन करावं, तसंच सुकामेवा देखील आहारात घेणं फायदेशीर ठरतं.

भोपळ्याच्या बियांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक उपलब्ध असतं. यामुळे प्रोस्टेट हेल्द सुधारण्यास तसचं पुरुषांची प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.

टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपीन अँटीऑक्सिडंट्समध्ये अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होवू शकतो. यासाठी नियमित आहारात टोमॅटोचा समावेश करा.

तसंच आहारामध्ये सोयाबीन, बीन्स आणि मुबलक प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि विटामिन्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

अशा प्रकारे दक्षता म्हणून पौष्टिक आहार आणि वजन नियंत्रणात ठेवून प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करणं शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT