मुंबई : गेल्या काही वर्षांत केलेल्या अभ्यासानुसार, भारतात चारपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे म्हटले आहे. असे देखील आढळून आले आहे की ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यापैकी फक्त १२% लोकांमध्येच ते नियंत्रणात आहे.
उच्च रक्तदाब हे आता अकाली मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि भारतात सुमारे ५०% स्ट्रोक आणि २५% हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू होतोय.
लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाच्या यांच्या संबंधाबद्दल सांगत आहेत सैफी रुग्णालयाच्या बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर. (how to control obesity related hypertension)
लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब
जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असताना, टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या लठ्ठपणाशी संबंधित आजारांमध्येही वाढ होत आहे. लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता ३.५ पटींनी जास्त असते.
असा अंदाज आहे की, प्रौढांमधील जवळजवळ ६० ते ७०% उच्च रक्तदाब थेट लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकतो. लठ्ठपणा असलेल्या मुलांमध्ये उच्च रक्तदाब होण्याची शक्यता तीन पटींनी अधिक असते.
लठ्ठपणाशी संबंधित उच्च रक्तदाबाची कारणे
लठ्ठपणाशी संबंधित उच्च रक्तदाब विकसित करण्यात आहाराची गुणवत्ता, शारीरिक हालचाली आणि तणावाची पातळी यांसारखे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. जास्त प्रमाणात व्हिसेरल किंवा ओटीपोटात लठ्ठपणा असलेले तसेच इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते.
लेप्टिन आणि अॅडिपोनेक्टिन सारख्या संप्रेरकांचा समावेश आहे. लठ्ठपणा हा देखील अडथळा आणणारा स्लीप एपनिया विकसित करण्यासाठी एक जोखीम घटक आहे आणि काही व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब विकसित होण्याचे हे आणखी एक कारण आहे.
मूत्रपिंडाच्या सभोवतालची चरबी आणि पोटाच्या आतील दाब वाढल्याने मूत्रपिंडाचा दाब वाढतो. लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये सोडियम धारणा वाढते आणि यामुळे लठ्ठपणा संबंधित उच्च रक्तदाब वाढतो. रेनिन अँजिओटेन्सिन प्रणाली सक्रिय केल्याने लठ्ठपणामध्ये उच्च रक्तदाब देखील वाढतो.
लठ्ठपणाशी संबंधित उच्च रक्तदाबाचे व्यवस्थापन कसे करता येईल
लठ्ठपणाशी संबंधित उच्च रक्तदाबाचा उपचार हा इतर रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाच्या उपचारांसारखाच असतो. बहुतेक रुग्णांना त्यांच्या डॉक्टरांकडून रक्तदाबाची औषधे दिली जातात.
औषधोपचारांसह जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. लठ्ठपणा संबंधित उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये वजन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
जास्त वजन (BMI 23.5 ते 27.5 Kg/m2) व्यक्तींनी योग्यप्रकारे वजन कमी करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे जितक्या लवकर केले जाईल तितके चांगले परिणाम प्राप्त होतील.
कमी केलेले वजन कायम ठेवण्यासाठी दररोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करणं आवश्यक आहे. याशिवाय दररोज रात्री ६ ते ८ तासांची झोप घेतली तरी वजन नियंत्रणात ठेवू शकतो.
ग्रेड १ लठ्ठपणा (BMI 27.5 ते 32.5 Kg/m2) असलेल्या व्यक्तींनी पर्यवेक्षणाखाली वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अथक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसल्यास वैद्यकीय उपचार किंवा इंट्रा-गॅस्ट्रिक बलून इन्सर्शन यांसारख्या एंडोस्कोपिक वेट लॉस थेरपी वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
आजकाल वजन कमी करण्याच्या नवीन औषधांचा ओघ आहे. ज्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहे. तथापि, ते अद्याप भारतात उपलब्ध नाहीत आणि अद्याप त्यांची प्रतीक्षा आहे.
ग्रेड २ किंवा ३ लठ्ठपणा असलेल्या रुग्णांसाठी (BMI ≥ 32.5 Kg/m2) वजन कमी करणे हे प्राथमिक उद्दिष्ट असणे आवश्यक आहे. जसजसे वजन वाढत आहे, तसतसे या व्यक्तींना उच्च रक्तदाब व्यतिरिक्त चयापचय सिंड्रोमचे इतर घटक जसे की, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल संबंधित समस्या विकसित होण्याची शक्यता असते.
यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अशा प्रकरणांमध्ये वजन कमी करण्यासाठी औषधोपचार आणि एन्डोस्कोपिक उपचार केले जातात. याशिवाय उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा संबंधित आजारावर बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक शस्त्रक्रिया एक प्रभावी उपाय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.