Right way to eat fruits: आहारामध्ये फळांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. फळांमुळे शरीराला आवश्यक अनेक विटामिन्स, खनिजं तसचं इतर अनेक पोषक तत्व मिळत असतात. रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढण्यापासून ते हृदय निरोगी राहण्यासाठी असे फळांच्या सेवनाचे आरोग्यासाठी Health अनेक फायदे आहेत. How to eat fruits Marath Health and diet tips
यासाठीच नियमितपणे फळांचं सेवन करणं आवश्यक आहे. फळांचं सेवन न केल्यास त्याचा परिणाम पोटाच्या मेटाबोलिक रेटवर होतो. तसंच फायबरच्या Fiber कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेसारख्या Constipation समस्या निर्माण होतात.
शरीराला आवश्यक पोषक तत्व न मिळाल्याने त्वचा आणि केस निस्तेज होतात. तसचं इतरही अनेक समस्या निर्माण होवू शकतात.
आहारामध्ये फळांच्या सेवनाचं जेवढं महत्व आहे तेवढचं फळांचं सेवन योग्य प्रकारे करणं देखील अधिक गरजेचं आहे. तरच तुमच्या शरीराला त्यातील पोषक तत्व मिळतील. अनेकजण विविध फळांचे चाकूने बारीक तुकडे करून त्याचं सेवन करतात
मात्र फळं ही चाकूने कापून न खाता ती थेट दाताने चावून खाल्यास तुमच्या शरीराला त्याचा अधिक फायदा होईल.
फळं कापून खावू नका
फळांधील पोषक तत्व कमी होण्यासाठी ३ कारणं जबाबदार असतात. ती म्हणजे प्रकाश, उष्णता आणि ऑक्सिजन. फळं कापताना या तीन गोष्टींचा फळांवर परिणाम होत असतो. म्हणजेच फळांचे तुकडे केल्याने त्याच्या सर्व भागावर सुर्यप्रकाश पडतो तसचं ते उष्णतेच्या आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येतात परिणामी त्यातील पोषक तत्व कमी होतात.
अनेकदा तर फळं कापतानाच त्यातील झिंक आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स तत्त्वे निघून जातात. तसंच फळांच्या तुकड्यांचा हवेशी संपर्क आल्याने रिअॅक्शन होवून त्यातील विटामिन सी Vitamin C नष्ट होतं.
तसंच फळं कापल्याने फळाच्या श्वसन दरावर त्याचा परिणाम होतो यामुळे त्यातील शुगरचं कार्बन डायऑक्साइडमध्ये रुपांतर होतं. यामुळे फळांची चव बिघडते तसचं त्यांचा रंग देखील बदलतो आणि ते लवकर खराब होवू शकतं. एकंदरच फळं कापून खाल्याने त्यातील पोषक तत्वांचा शरिराला काहीच फायदा होत नाही.
हे देखिल वाचा-
फळं कापून खाण्याचे तोटे
अनेकजण टिफिनमध्ये फळं कापून नेतात. ही कापलेली फळं अनेक तासांनंतर खाल्ली जातात. मात्र अशा प्रकारे फळांचं सेवन करणं शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. कापलेल्या फळांचा वातावरणाशी संपर्क झाल्यास त्यामुळे संसर्गजन्य आजार होवू शकतो.
कापलेल्या फळांचं सेवन केल्याने काही समस्या निर्माण होवू शकतात. यात पोटदुखी, तसचं पोटात मुरड पडणं, सूज आणि जळजळ अशा काही समस्या उद्भवू शकतात. त्याचसोबत काहीवेळीस डायरिया आणि फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.
ही फळं थेट दातांनी चावून खा
डाळिंब, पपई, फणस, कलिंगड अशी अनेक फळं आहेत जी थेट चावून खाणं शक्य नाही. अशी फळं कापूनच खावी लागतात. मात्र ही फळं देखील तुम्ही कापून लगेचच त्याचं सेवन केल्यास त्याचा आरोग्याला अधिक फायदा होतो. तर काही फळं मात्र तुम्ही थेट दातांनी चावून खावू शकता.
सफरचंद, चिकू, पियर, केळं, स्ट्रॉबेरी, अंजीर, आंबा अशी अनेक फळं आहेत ज्यांचं तुम्ही थेट सेवन करू शकता. मात्र ही फळं स्वच्छ धुणं गरजेचं आहे. ही फळं स्वच्छ धुवून थेट चावून खाल्ल्याने तुम्हाला त्यातील सर्व पोषक तत्व मिळतील.
ही फळं थेट चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यासही मदत होते तसचं हिरड्याचं आरोग्य देखील सुधारत. यातील फायबरमुळे आतड्यांचं कार्य सुरळीत होवून मेटाबोलिज्म जलद होवून आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.