Yoga Tips: Sakal
आरोग्य

Yoga Tips: तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर करा 'हे' दोन योगा, राहाल तंदूरूस्त आणि उत्साही

Yoga Tips: नियमितपणे योगा केल्याने शरीरातील ऊर्जेची पाती दिवसभर टिकून राहते.

पुजा बोनकिले

how to keep yourself energetic bhujangasan kapalbhati try at home

सकाळी उठल्यानंतर अनेकदा तुम्हाला अशक्तपणा जाणवत. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करावेसे वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल केला पाहिजे.

तुम्ही पुढील 2 योग करून थकवा दूर करू शकता. तसेच तुमच्या शरीरातील उर्जा पातळी दिवसभर कायम राहील. चला तर मग जाणून घेऊया ते योग कसे करावे.

भुजंगासन

हा योग पोटाच्या स्नायूंना टोनिंग करण्यास देखील मदत करते. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, पाठ आणि खांदे मजबूत करते आणि तुमच्या मणक्याची लवचिकता देखील सुधारते. तणाव आणि थकवा दूर करण्यात ती मोठी भूमिका बजावते. तुम्हा तंदुरूस्त ठेवण्यासाठी हा योग फायदेशीर ठरतो.

भुजंगासन करण्याची पद्धत

सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपावे.

आता दोन्ही तळवे जमिनीवर ठेवा.

दोन्ही पायंची बोटे आणि टाच जोडून घ्या.

नंतर श्वास घेतानातहातावर दाब द्या आणि डोके, छाती आणि नाभीपर्यंत पोट वर उचलावे. या स्थितीत आकाशाकडे पाहावे. मान सर ठेवा. काही वेळ अशा स्थितीत राहा आणि श्वास सोडा.

तुम्ही हा योग ३ ते ५ वेळा करू शकता.

कपालभाती

हा योग केल्याने शरीराचे स्नायू मजबूत होतात. याशिवाय तुमच्या पोटाची चरबीही कमी होईल. या योग केल्याने श्वसन प्रणाली मजबूत होते. यामुळे तुमच्या नसा मजबूत होतात. याशिवाय रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते. कपालभाती पचनसंस्था सुरळित ठेवण्यास मदत करते. असे केल्याने स्मरणशक्ती देखील मजबूत होते. तसेच तुम्ही दिवसभर उत्साही राहता.

कपालभाती करण्याची पद्धत

सर्वात आधी जमिनीवर बसावे.

डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यावा आणि जोराने सोडावा.

तुमचे पोट आत किंवा बाहेर फिरत आहे ना याकडे लक्ष द्यावे.

आपल्या क्षमतेनुसार असे करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT