How To Meditate sakal
आरोग्य

How To Meditate : मेडिटेशनपूर्वी करा अशी तयारी; मिळेल बेस्ट Experience

चला तर जाणून घेऊया मेडिटेशन करण्यापूर्वी काय आणि कशी तयारी करावी.

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर शारिरीक आरोग्यासाठीही उत्तम आहे. मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर खोलवर परिणाम होतो. अनेकदा मेडिटेशन कसे करावे, हे कळत नाही त्यामुळे अनेकदा मेडिटेशन करुन फायदा होत नाही. चला तर जाणून घेऊया मेडिटेशन करण्यापूर्वी काय आणि कशी तयारी करावी. (How To Meditate Meditation benefits )

मेडिटेशन का करावे?

अनेकदा आयुष्यात असे कटू प्रसंग येतात ज्यामुळे भावनांचा कल्लोळ होतो. अशावेळी आपण वर्तमानकाळातील आपलं अस्तित्व विसरुन जातो. ही घटना माझ्यासोबतच का घडली, याचा आपण सतत विचार करतो आणि मानसिक आरोग्य खालावून बसतो.

अशा वेळी या प्रसंगातून बाहेर कसे पडायचे अन् असे पुन्हा आपल्या बाबतीत घडू नये यासाठी आपण काय करायला हवे, याचा विचार करणे गरजेचे असते. त्यापूर्वी या तणावातून बाहेर पडणे गरजेचे असते. त्यासाठी मेडिटेशन हा उत्तम मार्ग आहे.

मेडिटेशनचे फायदे

  • मेडिटेशनमुळे आपले मन आणि मेंदू सशक्त होते, त्यामुळे आपल्यापुढे कोणतेही संकट किंवा समस्या निर्माण झाली, तरी आपण प्रसन्न राहू शकतो.

  • नियमित मेडिटेशनमुळे आपल्या मनामध्ये एक आंतरिक ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेमुळेच आपण अनेक संकटांचा व समस्यांचा प्रभावीपणे सामना करू शकतो.

  • सततच्या मेडिटेशनमुळे आपली भावनिक लवचिकता वाढण्यास मदत होते. तसेच, मेडिटेशन हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.

‘मेडिटेशन’साठी कोणती तयारी करावी?

१ मेडिटेशनसाठी शांत परिसर असलेली जागा निवडावी, जेणेकरून शांत ठिकाणी मेडिटेशन करताना कोणताही अडथळा न येता पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.

2 मेडिटेशनचा सराव नियमित करावा, सातत्याने मेडिटेशन करणे उत्तम. नियमित मेडिटेशन केल्याने आपल्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचे मूल्यमापन करता येणे शक्य होते.

3 मेडिटेशन करण्याआधी थोडा हलका शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. शारीरिक व्यायामामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT