How to overcome diseases caused by pollution Sakal
आरोग्य

प्रदूषणामुळे होतेय आजारांची लागण? या 2 पौष्टिक पदार्थांच्या सेवनाने करू शकता रोगांवर मात

प्रदूषणामुळे आपण वारंवार आजार पडत आहात का? तर आपल्या आहारत या पौष्टिक रेसिपींचा समावेश करा.

सकाळ डिजिटल टीम

वायू प्रदुषणामुळे लोकांना श्वसनाच्या आजारांसह आरोग्याच्या अन्य गंभीर समस्यांनाही तोंड द्यावे लागते. यामुळे धडधाकट असणारी मंडळीही आजारी पडत आहेत. दम्याच्या रूग्णांना वायू प्रदुषणाचा अधिक फटका बसतो. पण चिंता करू नका. 

प्रदुषणामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करायची असेल तर आहारामध्ये काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांमधील पोषणतत्त्वांमुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती…

टँगी चाट

सामग्री : अननस, सफरचंद, कीवी, लिंबाचा रस 

ही फळे कापा आणि एका बाऊलमध्ये एकत्रित घ्या. यामध्ये आवश्यकतेनुसार लिंबाचा रस मिक्स करा व या टँगी चाटचा आस्वाद घ्यावा.   

सफरचंद 

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सफरचंद हे फळ अतिशय लाभदायक मानले जाते. यातील क्वेर्सेटिन आणि केलिन हे दोन्ही फ्लेव्होनॉइड्स आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. या फळामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरासाठी पोषक आहेत.  

अननस

यामध्ये उपलब्ध असणारे एंझाइम हे पोषणतत्त्व फुफ्फुसांमध्ये जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करते. म्हणजे फुफ्फुसांचे नैसर्गिक स्वरुपात डिटॉक्स होण्यास मदत मिळते. 

कीवी

या फळामध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा अधिक असते. यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते. 

केळ्याचे स्मूदी

सामग्री - एक केळे, आल्याचा रस (आवश्यकतेनुसार), नारळ पाणी. ही सामग्री एकत्रित करा व मिक्सरमध्ये वाटा. स्मूदी तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये ओता व स्मूदीचा आस्वाद घ्यावा.  

केळे

नियमित एक केळे खाल्ल्यास दम्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन बी 6 चा उत्तम स्त्रोत म्हणजे केळे. 

आले 

आल्यातील पोषणतत्त्व फुफ्फुसात जळजळ होण्याआधी वायू प्रदूषकांना वायुमार्गातून बाहेर काढण्यास मदत करतात. यामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी पोषणतत्त्व अधिक प्रमाणात असतात.  

नारळ पाणी 

नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशिअम पोषणतत्त्व अधिक असतात, जे आरोग्यास पोषक असते. म्हणूनच आहारतज्ज्ञ डाएटमध्ये केळे व नारळ पाण्याचे समावेश करण्यावर भर देतात.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT