पावसाळ्यात त्वचेची काळझी Esakal
आरोग्य

Monsoon मधील फंगल इन्फेक्शनवर आयुर्वेदिक उपाय, घरगुती उपायांनी Infection होईल दूर

काहींना अनेक वर्षांपासून त्वचेच्या काही समस्या असतात. पावसाळ्याच्या काळामध्ये या समस्या किंवा इन्फेक्शन गंभीर रुप धारण करतात. अशावेळी मलम किंवा लेप अशा बाह्य उपचारांसोबत विविध काढे किंवा औषधांचा वापर करून उपचार करणं गरजेचं असतं.

Kirti Wadkar

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील दमटपणा तसंच सतत ओले कपडे घातल्याने आणि विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये धुतलेले कपडे देखील पूर्णपणे नीट वाळत नसल्याने तसचं सिंथेटिक कपड्यांमुळे Synthetic Clothes देखील त्वचेचे संसर्गजन्य आजार होवू शकता. How to save your skin in monsoon from fungal infection

पावसाळ्यात होणाऱ्या फंगल इंन्फेक्शनमध्ये Fungal Infection अनेकदा त्वचेला खाज येणं, गजकर्ण, नायटा अशा समस्या निर्माण होतात. यावर वेळीच उपाय केले नाहीत तर या समस्या अधिक वाढून त्रासदायक ठरू शकतात. तसचं त्वचेचे हे आजार Skin Diseases संसर्गजन्य असल्याने त्यावर वेळीच उपाय करणं गरजेच आहे.

फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी किंवा ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक Ayurveda उपचार करू शकता. औषधी तेल किंवा आयुर्वेदिक लेप आणि मलम लावून या संसर्गावर नियंत्रण मिळवता येतं.

काहींना अनेक वर्षांपासून त्वचेच्या काही समस्या असतात. पावसाळ्याच्या काळामध्ये या समस्या किंवा इन्फेक्शन गंभीर रुप धारण करतात. अशावेळी मलम किंवा लेप अशा बाह्य उपचारांसोबत विविध काढे किंवा औषधांचा वापर करून उपचार करणं गरजेचं असतं. यासाठी खास करून रक्त शुद्ध करणारी औषधं दिली जातातं.

हे देखिल वाचा-

शुद्ध आहार गरजेचा

आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये क्लेद म्हणजेच शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे रक्त दुषित होतं आणि रक्ताचे, श्वसनाचे, त्वचेचे आणि पोटाचे विकार होवू लागतात. यासाठीच पावसाळ्यात शुद्ध आणि ताजं तसंच गरम अन्नाचं आणि पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे.

तसंच या ऋतूमध्ये कमी तेलकट आणि कमी फॅट्स असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. संसर्गापासून बचाव होण्यासाठी तुम्ही घरगुती काढ्याचं सेवन करू शकता. यासाठी खैर, धणे, जीरं आणि सुंठ यांना पाण्यात चांगलं उकळून घ्यावं आणि या काढ्याचं सेवन करावं. यामुळे पचन क्रिया सुधारण्यास आणि पोट शुद्ध होण्यासही मदत होते.

विरेचन करणं लाभदायक

आयुर्वेदानुसार पंचकर्म केल्याने शरीर शुद्ध होण्यास मदत होते. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढल्यास किंवा शरीरातील दूषित पाण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पंचकर्मामध्ये विविध चिकित्सा सांगण्यात आल्या आहेत. यातील विरेचन चिकित्सा केल्याने फंगल इंन्फेक्शनची समस्या दूर करण्यास मदत होते.

अभ्यंग

अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीराचं मसाज. मात्र यामध्ये हर्बल किंवा आयुर्वेदिक तेलाचा वापर केला जातो. अभ्यंगामुळे त्वचेला पुरेसं पोषणं मिळतं आणि त्वचा पुनरुज्जीवित होण्यास मदत होते. पावसाळ्यात तुम्ही फंगल इन्फेशक्नपासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय करू शकता.

कडूलिंबाचा वापर

आयुर्वेदामध्ये विविध समस्यांसाठी आणि खास करून त्वचेच्या समस्यांसाठी कडूलिंबाचा वापर केला जातो. एक्जिमा आणि सोरायसीस सारख्या पावसाळ्यात वाढणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी कडूलिंबाचा वापर प्रभावी ठरू शकतो. तसंच पावसाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी कडूलिंबाचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

यासाठी निय़मितपणे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडूलिंबाची पानं टाका. तसचं तुम्ही एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात कडूलिंबाची पानं टाकून चांगलं उकळून घ्या. हे पाणी गार झाल्यानंतर इन्फेशक्न असलेला भाग किंवा त्वचा या पाण्याने दिवसातून २-३ वेळा धुतल्यास त्रास कमी होईल.

हे देखिल वाचा-

त्रिफळा चूर्ण

त्वचेच्या ऍलर्जी किंवा इन्फेशक्शनसाठी त्रिफळा चूर्णाचा वापर लात्रदायक ठरतो. यासाठी १ ग्लास पाण्यामध्ये १ चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून हे पाणी ४-५ मिनिटांसाठी उकळावं. त्यानंतर पाणी गाळून गार करावं. अॅलर्जी किंवा इन्फेक्टेड त्वचा या पाण्याने धुवावी.

त्रिफळामध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असल्याने त्वचा स्वच्छ होण्यास आणि लवकर बरी होण्यास मदत होते.

याचप्रमाणे तुम्ही प्रभावित ठिकाणी एलोवेरा जेल लावू शकता. तसचं आयुर्वेदामध्ये हळदीला महत्वाचं स्थान आहे. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी सेप्टिक असे अनेक महत्वाचे गुणधर्म असल्याने इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही हळदीच्या पाण्याने त्वचा स्वच्छ करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT