how to use a menstrual cup and precautions to take during periods 
आरोग्य

Health: मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरताना कोणती काळजी घ्याल?

सकाळ डिजिटल टीम

जग कितीही पुढे गेलं तरी भारतात मासिक पाळीवर आजही उघडपणे बोलले जात नाही. समाजात मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आहेत. भारतात ३० कोटींपेक्षा जास्त महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. विज्ञान आणि प्रगतीच्या युगात आज ग्रामीण व शहरी भागामध्ये बऱ्याच महिला मासिक पाळीदरम्यान डिस्पोसेबल सॅनिटरी पॅड वापरतात.

पण सध्याच्या जगात बहुतांश महिलांचा कल सॅनिटरी नॅपकिन पॅड वापरण्यापेक्षा मेंस्ट्रुअल कप वापरण्याकडे वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. पण हे वापरताना नवख्या तरुणींची तारांबळ उडते. अनेकवेळा मेन्स्ट्रुअल कप खरेदी करताना बहुतांश महिलांना कपची निवड कशी करावी? लिक तर होणार नाही ना? अशी भिती मनात येऊ लागते.

मेन्स्ट्रुअल कप हे एक मेडिकल ग्रेड सिलिकॉनपासून बनलेले वैद्यकीय साधन आहे. हे लवचिक असल्यामुळे योनीमार्गात सोप्या पद्धतीने घालता येते. १२ तासांपर्यंत लिक फ्री प्रोटेक्शन असते. मेंस्ट्रुअल कप सोबत धावणे, प्रवास करू शकता, पोहू शकता, योगा, जिम करू शकता.

एक मेन्स्ट्रुअल कप सहजपणे ५ ते ६ वर्ष वापरता येतो म्हणून हे पर्यावरणासाठी उपयुक्त ठरते. मेन्स्ट्रुअल कप पुन्हा वापरण्यास योग्य असून त्याचा कचरा निर्माण होत नाही.

मेन्स्ट्रुअल कप खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

मेन्स्ट्रुअल कप वेगवेगळ्या आकारात ऑनलाइन आणि केमिस्टकडे उपलब्ध असतात. हे कप तीन आकारांमध्ये मिळतात. लहान, मध्यम आणि मोठे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टची भेट घेऊन तुमच्यासाठी कोणता कप योग्य आहे, याची चर्चा करा आणि खरेदी करा.

मेन्स्ट्रुअल कप हे दोन प्रकारचे असतात. एक रियुजेबल आणि दुसरा डिसपोजेबल. रियुजेबल तुम्ही पाच वर्ष वापरू शकता तर काही डिसपोजेबल कप हे प्रत्येक मेन्स्ट्रुल सायकलनंतर बदलावे लागतात तर काही प्रत्येक युजनंतर बदलावे लागतात.

मेन्स्ट्रुअल कप वापरताना कोणती काळजी घ्याल?

मेन्स्ट्रुअल कप वापरण्यापुर्वी निर्जंतुक करा. वापरण्यापुर्वी प्रत्येक महिन्यात मेन्स्ट्रुअल कप उकळत्या पाण्यात उकळवुन स्वच्छ करा. कप तुमच्या योनीमध्ये घालण्यापूर्वी तुमचे हात व्यवस्थित धुवा. जर वापरण्यापूर्वी भिती वाटत असेल तर, दीर्घ श्वास घ्या. हा कप फोल्ड करून योनिमार्गातून आत टाकावा. याची एक बाजू हाताच्या चिमटीत पकडून बाहेर काढता येतो. दिवसातून दोन वेळा कप बदलावे.

मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे फायदे

या कपची किंमत स्वस्त असते.

टॅम्पोन्सपेक्षा सुरक्षित असते.

टॅम्पोन्सप्रमाणे योनि या कपमुळे कोरडी पडत नाही.

या कपचा वापर केल्याने दुर्गंधी येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT