डॉ. राजेन खेरडे
समुपदेशन व औद्योगिक मानसशास्त्र तज्ज्ञ
नागपूर
Human Psychology Of Critical Thinking : आपल्याला यश का मिळत नाही म्हणून बऱ्याचदा आपण रडत असतो. पण योग्य वेळी योग्य संधी साधता येणे हे यशाची सोपे गमक आहे, आणि तेच बऱ्याचदा आपल्या हातून सुटते हे आपल्या ध्यानात येत नाही. क्रिटीकल परिस्थितीत योग्य निर्णय घेता येणे ही काळाची गरज असते. यालाच क्रिटीकल थिंकींग म्हणतात. पण ते कसे करावे, हे जाणून घ्या.
‘क्रिटिकल थिंकिंग’ म्हणजे काय?
काही लोकांमध्ये ही क्षमता अंगभूत असते. तर काहींना योग्य अभ्यासाने ती अवगत करता येते. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या रुग्णालयात एकाच वेळी अनेक रुग्ण दाखल असताना नेमक्या कुणाला उपचारासाठी टेबलवर घ्यावं, हे निष्णात डॉक्टर लगेच ओळखतात. मानसशास्त्रानुसार ‘क्रिटिकल थिंकिंग’च्या निर्णयप्रक्रियेत तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.
मानसशास्त्रात ‘क्रिटिकल थिंकिंग’ एक संज्ञा आहे. याला निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. ही क्षमता असणारे परिस्थितीनुरूप निर्णय घेतात. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास माहितीचा ढिगारा उपसून त्यातून नेमके काय उपयुक्त आहे ते काढण्याची कला त्यांच्यात असते. या व्यक्ती संधी मिळाल्यास जीवनात अतिशय यशस्वी होतात. किंबहुना प्राप्त परिस्थितीत संधी निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात असते. व्यवस्थापनात अशा व्यक्तींना ‘गो गेटर’ संबोधले जाते.
काही लोकांमध्ये ही क्षमता अंगभूत असते. तर काही योग्य अभ्यासाने ती आत्मसात करतात. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या रुग्णालयात एकाच वेळी अनेक रुग्ण दाखल असताना नेमक्या कुणाला उपचारासाठी टेबलवर घ्यावं, हे निष्णात डॉक्टर लगेच ओळखतात. मानसशास्त्रानुसार क्रिटिकल थिंकिंगच्या निर्णय प्रक्रियेत तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.
१. माहिती उपलब्ध असणे व अपेक्षित माहिती उपलब्ध करून घेणे. यासाठी वाचन तसेच संवाद कौशल्य आवश्यक आहे.
२. माहितीचे विश्लेषण करणे. वेगवेगळ्या विषयातील माहितीचा परस्पर संबंध जोडता येणे, हे विचार कौशल्य आहे. यालाच कनेक्टिंग डॉट्स म्हणतात. त्यातील साम्य व भेद ओळखून ती योग्य शब्दात व्यक्त करता येणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रवाहाच्या बाजूला उभे राहून निरपेक्ष भावनाने परीक्षण करणे अपेक्षित आहे.
३. उपलब्ध पर्याय आणि स्वतःमधील बलस्थाने, कमकुवतपणा यांची सांगड घालून योग्य निर्णय प्रक्रिया राबवणे.
वरील प्रक्रियेचा वैयक्तिक आयुष्यात कसा उपयोग करता येईल यासाठी आपण एक साधे उदाहरण घेऊ.
परवा अचानक ‘दैनिक सकाळ’मधून फोन येतो. ‘राजन बोलता आहात का?’ सुखद पण सावध धक्का! सावध, कारण आजकाल आपल्याला पन्नास लाखांची लॉटरी लागली आहे. तुम्हाला बॅंकेत... वगैरे फोन कुणालाही येऊ शकतात ना?
मी बोला म्हणताच समजलं की दैनिकासाठी त्यांना माझ्याकडून माझ्याशी संबंधित विषयावर लिखाण हवंय. मी होकार देताच त्यांनी लिखाण पाठविण्यास सांगितले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे छानही वाटलं आणि प्रश्नही पडला. काय करावे? Positive stress वाढायला लागला. ताण दोन्ही प्रकारचे असतात. म्हटलं चला मेंदूला ताण देऊन पाहुया.
विचार करताना लक्षात आलं की, रोजच्या आयुष्यातील मानवी घडामोडींवर अनेक तज्ज्ञ मानसशास्रज्ञांनी भरपूर लेखन केले आहे. अभ्यास करता असे लक्षात आले की, काहींची लेखनशैली उत्तम आहे. काहींना खरोखर चांगलं लिहिलंय म्हणून वाचकांनी स्वीकारलं. आता पुढचा टप्पा म्हणजे आपली बलस्थानं कोणती याचा मागोवा घेणे.
समुपदेशन क्षेत्रातील उत्तम अनुभव. प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवरील व्यक्तींच्या समपातळीवर येण्यासाठी लागणारं कसब. जर्नालिझम, पब्लिक रिलेशन व ॲडव्हरटायझिंग यांचा एकत्रित अभ्यास केल्याने टार्गेट ऑडियन्स व थोडेफार लिखाण याचा अभ्यास. तसेच औद्योगिक मानसक्षेत्रातील कामामुळे काहीतरी नवीन देण्याची वृत्ती.
मग आपण काय वेगळं देऊ शकतो? काही वेगळेपण असल्याशिवाय वाचकवर्ग कसा मिळणार? आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण होण्यासाठी त्यात वेळोवेळी बदल करावे लागतील. त्यासाठी जगण्याचा आणि मनाचा पॅटर्न बदलावा लागेल.
पुढील टप्प्यावर आता निर्णयाआधी पर्याय व आराखडा याचा गोषवारा घेऊया
१. विषयाची वेगळ्या तऱ्हेने मांडणी करून त्याला आकर्षक आणि माहितीपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करणे.
४. नवीन संशोधनावर लिहून आणि सोबत वाचकांच्या मतांचा अंतर्भाव करून विषयास अद्ययावत ठेवणे.
५. मानसशास्त्राचे कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसावे. जसे ठोकळमानाने - क्लिनिकल, समुपदेशन किंवा औद्योगिक मानसशास्त्र.
६. लेखनशैली सहज, साधी व प्रवाही असावी.
७. लेखात उपदेश नकोतच. ते तर सगळीकडून मिळतातच
८. वेळोवेळी सुचलेल्या नवनवीन कल्पनांचा लेखनात अंतर्भाव करणे.
९. वेळोवेळी पॅटर्न बदलवून लेखमाला वैविध्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करून त्याचा आनंद घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.