Migraine  sakal
आरोग्य

'या' गोष्टी खाल्ल्याने होऊ शकतो मायग्रेन

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मायग्रेन हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. महिन्यातून अनेकदा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

मायग्रेन ही अत्यंत सामान्य आजार असला तरी हा जगातील प्रत्येक सातव्या व्यक्तीला होत असतो. तज्ञानुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेन तीन पटीने अधिक आढळतो. मायग्रेनग्रस्त व्यक्ती तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. ही डोकेदुखी सामान्यत: 4-72 तास असते. या दरम्यान, व्यक्तीला मळमळ, उलट्या, चक्कर येणे,प्रकाश आणि मोठा आवाज सहन न होणे यासारख्या समस्या उद्भवतात. (if you are migraine patient avoid these things check here symptoms and precaustions)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मायग्रेन हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. महिन्यातून अनेकदा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मायग्रेन कशामुळे होऊ शकते?

चीज, अल्कोहोल, चॉकलेट, नट्स, तीव्र प्रकाश, झोपेचा त्रास, मासिक पाळी, मेनोपॉज, प्रवास, हवामानातील बदल आणि तणाव या सर्वांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मायग्रेनचे चार टप्पे

मायग्रेनचे चार टप्पे असतात. प्रोड्रोम फेज (Prodrome Phase ) नावाचा पहिला टप्पा डोकेदुखी सुरू होण्याच्या काही तास आधी सुरू होतो. या दरम्यान व्यक्ती चिडचिड करतो आणि उदास होतो. वारंवार जांभई येते

दुसरा टप्पा ऑरा फेज (Aura Phase) आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या डोळ्यांसमोर प्रकाशाच्या तिरक्या रेषा दिसतात. या दरम्यान, शरीर सुन्न झाले आणि मुंग्या आल्या असे वाटते.

तिसरा टप्पा म्हणजे डोकेदुखीचा टप्पा जो 4-72 तास टिकतो आणि चौथा टप्पा म्हणजे मायग्रेन हँगआउट टप्पा ज्यामध्ये व्यक्ती अस्वस्थ, चिडचिड आणि गोंधळलेली असते.

डॉक्टराच्या म्हणण्यानुसार,महिलांना मासिक पाळी दरम्यान मायग्रेन होऊ शकतो कारण या काळात शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन कमी होतात.

मुलांनाही मायग्रेन होतो

लहान मुलांमध्येही मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. मुलांमध्ये मायग्रेनचे लक्षण डोकेदुखी नसते, परंतु त्यांना उलट्या किंवा पोटदुखी होते. लहान मुलांमध्ये, पोटदुखी हे मायग्रेनचे पहिले लक्षण असू शकते. जर पालकांपैकी एखाद्याला मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्यांच्या मुलास देखील मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता 50 टक्क्यांपर्यंत वाढते. दुसरीकडे, आई-वडील दोघांनाही मायग्रेनची समस्या असल्यास, मुलामध्ये मायग्रेनचा धोका 75 टक्क्यांनी वाढतो.

यावर उपचार कसा करायचा?

डॉक्टर म्हणतात की मायग्रेन ही धोकादायक समस्या नाही, पण काही उपायांनी याला प्रतिबंध करता येतो. यामध्ये धूम्रपान सोडणे, अल्कोहोलपासून दूर राहणे, जास्त प्रमाणात कॅफिन कमी करणे सोबतच मायग्रेनने पीडित महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या टाळणे यांचा समावेश होतो.

याशिवाय औषधांशिवायही मायग्रेन थांबवता येतो, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये दीर्घ श्वास घेणे आणि योगासने करणे गरजेचे आहे. शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली तरी मायग्रेन आजार कमी करण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT