if You Are often go to the toilet in winter, find out why  
आरोग्य

तुम्हीही हिवाळ्यात वारंवार टॉयलेटमध्ये जाताय, काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात, आपण सहसा उन्हाळ्यापेक्षा जास्त वेळा टॉयलेटमध्ये जातो. अनेक वेळा कमी प्रमाणात पाणी पिऊनही वारंवार लघवीला जावे लागते. तसे, उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये अधिक वेळा टॉयलेटमध्ये जाणे सामान्य आहे.

तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात आपल्याला वारंवार लघवी करावी लागते. निसर्गातील बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्याला कोल्ड इन्ड्युस्ड डायरेसिस म्हणतात. विशेषत: हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे आपल्याया वांरवार टॉयलेटमध्ये जावे लागते.

हिवाळ्यात 5-6 वेळा टॉयलेटला जाणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु कधीकधी ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकते देते. तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्ती २४ तासांत ४ ते १० वेळा शौचालयात जाते. पण यापेक्षा जास्त वेळा तुम्ही टॉयलेटला जात असाल तर यामागे अनेक कारणे असू शकतात.

मूत्राशयाची कारणे (प्रो-अॅक्टिव्ह युरिनरी ब्लॅडर) Causes of Urinary Bladder (Pro-Active Urinary Bladder)

जर एखाद्या निरोगी व्यक्तीला अनेक वेळा शौचास जावे लागत असेल, तर ते मूत्राशयाच्या अतिक्रियाशीलतेमुळे ते असू शकते. यासोबतच जर तुमच्या मूत्राशयाची लघवी गोळा करण्याची क्षमता कमी होऊ लागली किंवा त्यावर जास्त दबाव येत असेल तर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत अनेकांना लघवी थोड्या वेळासाठी रोखून ठेवण्यास त्रास होतो.

साखरेच्या पातळीत वाढ (Increase In Sugar Level)

मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार शौचालयात जावे लागते. टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांना याचा थोडा जास्तच सामना करावा लागतो. जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा पुन्हा पुन्हा शौचाला जावे लागते. यासोबतच तुम्हाला लघवीमध्ये जळजळ देखील होऊ लागते.

मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग (Urinary Tract Infection)

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्येही तुम्हाला वारंवार लघवी करावी लागते. या आजारात तुम्हाला हलका ताप आणि उलट्या आल्यासारखे वाटते. ही समस्या महिलांमध्ये सामान्य आहे आणि या काळात त्यांना लघवीमध्ये जळजळ आणि हलके दुखू शकते.

मूत्रपिंडाचा संसर्ग (Kidney Infection)

जर तुम्ही पुरेसे पाणी पीत नसाल तर त्याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो. कमी पाणी प्यायल्याने किडनीच्या संसर्गाचा धोका वाढतो. या काळात वारंवार लघवी होणे आणि असह्य जळजळ होणे ही मूत्रपिंडाच्या संसर्गाची मुख्य लक्षणे असू शकतात. तीव्र जळजळीसह तुम्हाला वारंवार लघवी होत असल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT