Hands Illness Symptoms : आजवर आपल भविष्य बघण्यासाठी म्हणूनच तुम्ही ज्योतिषांना हात दाखवला असेल पण आपले हात फक्त आपल भविष्यच सांगतात अस नाही; काहिदा आपल्या हातात जाणवणारे छोटे छोटे बदल खूप मोठ्या आजारांच कारणही असतात.
कोणतेही काम करायचं असेल तर आपले हात एका साधनाप्रमाणे काम करतात. मग ते जेवण असो, काहीतरी उचलणं असो किंवा काहीतरी लिहिणं.. तसं फोन खेळायलाही आपल्याला हातांची बरीच गरज असते. म्हणजेच हाताच्या समस्यांवर दुर्लक्ष करणं खूप कठीण ठरू शकतं. जसं शरीरात काही आजार उद्भवला की त्याचा परिणाम थेट डोळ्यांवर होतो किंवा इतर भागात दिसतात तसच आपल्या हातावरही दिसतात.
बोटांच्या जॉईंटस् मध्ये दुखत असेल, सूज आल्या सारखं वाट असेल किंवा कडकपणा जाणवत असेल, बोटांमध्ये मुंग्या येत असतील, सुन्नपणा वाटत असेल तर ही कार्पल टनल सिंड्रोम आणि क्यूबिटल टनल सिंड्रोमची किंवा संधिवाताची लक्षण असू शकतात. यांच्याकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं.
हात थरथरत आहेत
हातांमध्ये थरथर होण; एखादी गोष्ट करतांना, उचलतांना अचानक हातात थरथर होते आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण असे करणे चुकीचे आहे. हाताचा थरकाप सहसा काही आजारांमुळे होऊ शकतो. यामध्ये पार्किन्सन रोग, मल्टिपल स्क्लेरोसिस, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, थायरॉईड आणि काही औषधांचा दुष्परिणाम यांचा समावेश आहे.
हाताला आतून मुंग्या येता आहेत
बोटांची सुन्नता आणि थंडपणा तसेच त्यांना मुंग्या येण हे सहसा थंडीमध्ये होत; कारण बाहेरच्या वातावरणामुळे थोडीशी संवेदनशीलता कमी होते. याला रेनॉड रोग म्हणतात. या आजारामुळे आपल्या शरीरातील काही भागांमध्ये विशेषत: हात-पायांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो. अनेकदा अशक्तपणाचही हे लक्षण असू शकतं. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या बोटांमध्ये अशा समस्या होत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे.
कशी असते हाताची रचना
आपल्या हातांची रचना खूप गुंतागुंतीची आहे. आपले हात मनगट, तळवे, बोटे आणि अंगठ्यांनी बनलेले आहेत. आपल्या एका हातात 27 हाडे असतात. प्रत्येक हातात सुमारे 30 स्नायू असतात. यापैकी बरेच स्नायू आपल्या मनगटात आणि हातात असतात, पण बोटांमध्ये कोणतेही स्नायू नसतात. आपल्या हातात 27 सांधे आणि 120 अस्थिबंधन आहेत. अस्थिबंधन म्हणजे साधारणपणे असे दोरे जे सगळ्या हाडांना धरून ठेवतात. हाताची हालचाल मुख्यतः हाताच्या स्नायूंद्वारे सुरू होते जे टेंडन्सद्वारे बोटांना आणि अंगठ्याला जोडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.