micro organisms sakal
आरोग्य

‘गट हेल्थ’ सुधारण्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

सूक्ष्म जीवाणूंच्या वस्तीचे आपल्या आरोग्यामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावते, हे आपण गेल्या आठवड्यात पाहिले. या वस्तीचे आरोग्य या गोष्टींवर अवलंबून असते : त्यांच्यातील species ची विविधता (हजारो प्रजाती असतात व त्यांची विविधता टिकून राहायला हवी), चांगल्या जीवाणूंचा आकडा वाईट जीवाणूंपेक्षा अधिक असावा.

‘चांगल्या’ जीवाणू वस्तीसाठीचे घटक

आपण जन्माला येतो, तेव्हा आपल्या शरीरावर व आतड्यामध्ये जास्त जीवाणू नसतात; तसेच आपली प्रतिकारशक्तीही सुसज्ज नसते. जन्मापासून पुढे दोन वर्षे आतड्यातील जीवाणू वस्ती संपूर्ण तयार होऊन ते कार्यरत व्हायला लागतात. म्हणजेच आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांतच आयुष्यभरासाठीच्या ‘गट हेल्थ’चा पाया रचला जातो आणि भविष्यात जुनाट आजारांना आपले शरीर बळी पडेल, की त्यांच्यापासून बचाव होईल हेही ठरते.

डिलिव्हरीचा प्रकार : आपला जन्म नॉर्मल डिलिव्हरीने झाला, तर जन्मताना आईच्या योनिमार्गातील सर्व जीवाणूंशी आपला थेट संपर्क येतो आणि आपल्या सूक्ष्म जीवाणू वस्तीसाठी पहिले सुदृढ रहिवासी मिळतात आणि गट हेल्थचा व आरोग्याचा पाया रचला जातो. पण जन्म c section म्हणजे सिझर करून झाला असेल, तर मात्र आपल्याला आईच्या सूक्ष्म जीवाणूंचा संपर्क मिळत नाही. हे माझे वैयक्तिक मत नसून, वैद्यकीय संशोधनात असे आढळून आले आहे, की नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत, सिझरने जन्म झालेल्यांमध्ये मधुमेह, autoimmune आजार, कॅन्सर अशा आजारांचे प्रमाण अधिक आढळले आहे.

आईचे दूध आणि फॉर्म्युला फीड : आईचे दूधदेखील चांगल्या सूक्ष्म जीवाणूंचा स्रोत असते आणि त्यामुळे गट हेल्थ आणि प्रतिकारशक्ती वाढीला मदत होते; पण काही कारणांमुळे बाळाला पॅकेज्ड फॉर्म्युलाचे दूध प्यावे लागले, तर हेही गट हेल्थसाठी घातक ठरते.

अँटिबायोटिक्सचा वापर : आपल्याला खूप लवकर अँटिबायोटिक औषधे खाण्याची सवय असते. ॲंटिबायोटिक्स वाईट जीवाणूंचा नाश करत असल्याने ती उपयुक्त आहेत; परंतु ती चांगल्या जीवाणूंचाही नाश करतात आणि त्यामुळे आपली जीवाणूंची वस्ती खराब होते. अँटिबायोटिक घेतल्यानंतर चांगल्या जीवाणूंना पुनर्वत व्हायला पुढील सहा-आठ आठवडे लागतात. वारंवार अँटिबायोटिक घेतल्यास गट हेल्थ खराब होऊन जुनाट आजार होऊ शकतात.

आहार आणि गट हेल्थ

प्रीबायोटिक अन्न : या अन्नामुळे जीवाणूंची वाढ चांगली होते. फळाचा ज्यूस गाळल्यानंतर उरलेला चोथा किंवा पीठ चाळल्यावर उरलेला कोंडा म्हणजे फायबर. चांगले सूक्ष्म जीवाणू आहारातील फायबरचे पचन करतात; तसेच फायबरपासून ते ब्युटिरीक ॲसिडसारखे (यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते, कॅन्सरपासून बचाव होतो) उपयुक्त रसायन बनवतात. फळे, भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि हे सर्वोत्तम प्रीबायोटिक अन्न आहे.

आपल्या आहारातील पॉलिश्ड अन्नाचे प्रमाण. आपण सेवन करत असलेले धान्य (गहू, तांदूळ इत्यादी), डाळी (तूर, मूग इत्यादी) हे अतिपॉलिश केलेले असतात- म्हणजेच त्यांच्यातील तुसे/फायबर काढून टाकलेले असतात. मात्र, आपण हातसडीचे तांदूळ, खपली गहू, कमी भरडलेल्या डाळी यांचे सेवन करण्यास सुरुवात केली, तर भरपूर फायबर पोटात जाऊन आहाराच्या, जुनाट आजाराच्या समस्यांवर विजय मिळतो.

प्रोबायोटिक अन्न : या अन्नामध्ये जिवंत, चांगले जीवाणू असतात. सर्व आंबवलेले पदार्थ - इडली, दही, आंबिल, कंजी इत्यादी यात समाविष्ट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT