Improve Metabolism esakal
आरोग्य

Improve Metabolism : अन्न नीट पचत नाही? या 9 प्रकारे सुधारा तुमचे मेटाबोलीझम

आरोग्यासाठी चयापचय योग्य होणे फार आवश्यक असते.

धनश्री भावसार-बगाडे

9 Ways To Improve Your Metabolism In Marathi :

आपले आरोग्य नीट राहण्यासाठी अन्नाचे नीट पचन होणे आवश्यक आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण चयापचय मंद झाले तर भूक लागत नाही, अन्नाचे पचन नीट होत नाही आणि पोटात बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहते. त्यामुळे अनेक आजार जडण्याची, रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

म्हणून आज आपण मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी काही टिप्स जाणून घेवूया..

Improve Metabolism

मेटाबोलीझम सुधारण्याचे उपाय

दालचीनीचा चहा

दालचिनीच्या चहामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे चयापचय गती वाढवतात आणि अन्न पचन करण्यास मदत करतात.

शुद्ध तुपाचे सेवन करा

तुपातील फॅटी ऍसिड्स पोटातील पाचक एन्झाईम्सला प्रोत्साहन देतात आणि अन्नाचे जलद पचन करण्यास मदत करतात.

Improve Metabolism

आल्याचा चहा

आल्याचा चहा चयापचय गतिमान करते. त्यामुळे अन्न सहज पचते आणि आतड्याची हालचालही बरोबर होते.

ओव्याचे सेवन

ओव्याचे सेवन केल्याने पचनक्रिया जलद होण्यास मदत होते. ओवा पाचक एंजाइमचे कार्य सुधारते आणि चयापचय गतिमान करते.

नाश्त्यात प्रथिनेयुक्त पदार्थ खा

नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. दही, दूध, पनीर आणि नट्स इत्यादींचा नाश्त्यामध्ये समावेश करा.

सॅलड खा

चांगल्या चयापचयासाठी सॅलड खाणे नेहमीच चांगले आहे. याचे कारण असे की अनेक प्रकारच्या भाज्या सॅलडमध्ये वापरल्या जातात. आणि त्या फायबरने समृद्ध असतात.

Improve Metabolism

स्प्राउट्स खा

मूग डाळ, चना डाळ आणि सोया इत्यादी स्प्राउट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे चयापचय गतिमान करते आणि पोटाच्या समस्या कमी करते.

बाजरीची भाकरी खा

बाजरीच्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते जे आतड्याची हालचाल गतिमान करते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत करते.

सफरचंद आणि संत्री खा

सफरचंद आणि संत्री दोन्हीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात. सफरचंद खाल्ल्याने पोटातील पाचक एन्झाईम्सला प्रोत्साहन मिळते आणि चयापचय क्रिया गतिमान करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT