Incorrect ways of thinking  sakal
आरोग्य

विचार करण्याच्या अयोग्य पद्धती

Pessimism किंवा नकारात्मकता हा एक सर्वाथानं घातक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन असलेली व्यक्ती एखाद्या परिस्थितीत वाईटच किंवा प्रतिकूल तेच घडणार हे जणू गृहीतच धरते.

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

नॉर्मन व्हिंसेंट पिएले यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘There is a basic law that Like attracts Like. Negative thinking Definitely attracts Negative results. Conversely, if a person habitually thinks optimistically and hopefully, his Positive thinking sets in motion creative forces and success instead of eluding him flows towards him.’

Pessimism किंवा नकारात्मकता हा एक सर्वाथानं घातक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन असलेली व्यक्ती एखाद्या परिस्थितीत वाईटच किंवा प्रतिकूल तेच घडणार हे जणू गृहीतच धरते. याला situational pessimism म्हणतात. साधारणपणे या व्यक्ती एकूण आयुष्याबद्दल उदासीन असतात. या व्यक्ती सतत नकारात्मक विचारच करत असतात.

त्यांना व्यक्तींमधल्या किंवा प्रसंगांमधल्या वाईट गोष्टीच महत्वाच्या वाटत रहातात. त्यांना आयुष्यात आनंदी राहता येत नाही. त्यांनी नकारात्मक विचार करण्याचा pattern बदलून सकारात्मक विचार करण्याचा pattern शिकून घेणं, स्वत:त प्रोग्र्याम करणं गरजेचं ठरतं. आणि हे बहुतेकांना प्रयत्नांतीशक्य आहे.

आपण ट्रकच्या मागे ‘विचार बदला, नशीब बदलेल’ असं लिहिलेलं अनेकदा वाचतो. गमतिदार वाक्य म्हणून हसून सोडून देतो; पण वास्तविक खरोखरच आपलं नशीब बदलायला, आपली मन:स्थिती बदलायला आपले विचारच कारणीभूत असतात.

सकारात्मक विचार आपल्याला सर्वार्थांनी उर्जितावस्थेला नेतात, तर नकारात्मक विचार, नकारात्मक स्व-संवाद आपलं खच्चीकरण करू शकतात. जगात घडणारी प्रत्येक चांगली घटना, मग ती निसर्गातली असो वा मानवाच्या आणि समाजाच्या संदर्भात असो ती फक्त सकारात्मक उर्जेवरच घडत असते. सकारात्मक विचारांचा मनावर, शरीरावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो, तर नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम होतो.

नकारात्मक विचारांमुळे राग, दुख:, नैराश्य आणि एकूणच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होतेच आणि प्रगतीच्या सगळ्या शक्यता संपुष्टात येतात. आत्मप्रतिमा दुर्बल होते, आत्मविश्वास नाहीसा होतो. नात्यांवर विपरीत परिणाम होतो. cortisol आणि andranalin सारखी स्ट्रेस हार्मोन्स सतत स्रवल्यामुळे शारीरिक आजार, मनोकायिक आजार निर्माण होऊ शकतात.

नकारात्मक विचार हे बहुदा Negative Automatic Thoughts म्हणजे आपोआप मनात निर्माण होणारे विचार असतात. जेव्हा व्यक्ती सतत negative थिंकिंग करत राहते, तेव्हा जणू ती स्वत:ला एक प्रकारे negatively programmed करत राहते. असं programmed होण्यामागे खोलवर रुजलेली नकारात्मक विचार करण्याची पद्धत किंवा pattern असतो. हे patterns ओळखून, समजावून घेऊन त्यावर काम करायला लागते. तेव्हा अशी नकारात्मक विचारसरणी नाहीशी व्हायला मदत होते.

काही Negative Thinking Styles किंवा patterns मानले गेले आहेत. यांतील एक किंवा अनेक प्रकार आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असू शकतात आणि मग त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर आणि स्वस्थतेवर होतो. वाचताना वर वर सगळ्याच थिंकिंग पॅटर्न्समध्ये साम्य वाटेल; पण त्यात सूक्ष्म भेद आहेत. त्यांची माहिती पुढील भागा घेऊ.

(क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT