Incomplete Sleep side effects esakal
आरोग्य

Lack of Sleep: रात्री ७ ते ८ तास झोप हवीच, अन्यथा होऊ शकतो मेंदूचा हा गंभीर आजार

lack of sleep side effects: टीनेजमध्ये मुलांची ७-९ तासापेक्षा कमी झोप झाल्याने त्यांच्यात मेंदूचे आजार होण्याची ४० टक्के शक्यता वाढते असं संशोधनातून समोर आलं आहे, जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Increased Risk of Brain Disease Due To lack Of Sleep : दिवसेंदिवस मेंदूशीसंबंधीत आजारांचं प्रमाण वाढत आहे. याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा यामागचं कारण लहानपणात, कुमार वयात सापडतं. जागे असताना मेंदू सतत कामात असतो.

पण गाढ झोपेचा काळ हात मेंदूला आराम देणारा काळ असतो. त्यामुळे योग्य झोप मिळणं गरजेचं आहे. जर ती मिळाली नाही तर मेंदूचे आजार होऊ शकताता, असा निष्कर्ष एका संशोधमातून मांडण्यात आला आहे. जाणून घेऊया.

हैद्राबादच्या अपोलो हॉस्पीटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी नुकतच याविषयीचं ट्वीट शेअर केलं आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, जेव्हा कुमार वयात (टीनेज) मुलांना ७-९ तासांची पुर्ण झोप मिळत नाही. किंवा शांत झोप नसेल तर अशा मुलांना भविष्यात मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) हा मेंदूचा आजार होण्याची शक्यता ४० ते ५० टक्क्यांनी वाढते.

कुमारवय म्हणजे मुलांच्या वेगाने वाढीचं वय असतं. पूर्ण आणि शांत झोप नसणे यामुळे भविष्यात या मुलांना MS चा धोका वाढतो.

झोपेची कमतरता आणि एमएसची संभाव्य धोका

अपुऱ्या झोपेमुळे दाहक जुनाट आजार होण्याचा धोका संभवतो.

झोपेचे निर्बंध आणि झोपेची खराब गुणवत्ता यामुळे अतिआक्रमकता (प्रॉइनफ्लेमेटरी सिग्नलिंग), रोगप्रतिकारक शक्तींवर परिणाम करते, ज्यामुळे एमएसचा धोका वाढू शकतो.

झोप नीट न झाल्यामुळे तुमच्या शरीराचा संपूर्ण ताल बिघडतो आणि त्याचा थेट परिणाम प्रतिकार क्षमतेवर होतो.

यामुळे तुमच्या मेलॅटोनिन सिक्रीशन वर विपरीत परिणाम होऊन प्रतिकारशक्तीचे कार्य विस्कळीत होते.

कसे टाळावे?

हल्लीच्या काळात मुलांना झोपेपासून विचलीत करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. इंटरनेट, सिनेमा, व्हिडीओ गेम किंवा अगदी अभ्यास अशा विविध कारणांनी मुलं रात्री नीट झोप घेत नाहीत.

पण मुलांनी ७ ते ९ तास झोप घेणे आवश्यक असल्याचं त्यांना पटवून द्या.

तेवढी झोप व्हावी यासाठी प्रोत्साहीत करा.

झोप शांत लागण्यासाठी शरीर दमणे आवश्यक आहे. त्यासाठी फिजीकल अ‍ॅक्टिव्हीटी करण्यासाठी प्रोत्साहीत करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT