आरोग्य

Infertility Test : वंधत्वाचा शिकार होण्याआधी जोडप्यांनी आजच करा या टेस्ट!

प्रजनन क्षमता कमी होण्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक जोडप्याची इच्छा असते की, त्यांचंही स्वत:चे बाळ असावे. पण, लग्नानंतर तीन वर्ष उलटून गेल्यावर घरातही चर्चा सुरू होते. प्रयत्न करूनही गुडन्यूज मिळत नसेल तर वंधत्वाची समस्या आहे, असे समजले जाते.

भारतातील वंध्यत्वाचे ओझे वाढतच चालले आहे, ज्यात स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. केवळ शहरी भागातच नाही तर खेडेगावातही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रजनन क्षमता कमी होण्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

काही अनुवंशीक कारणानेही गर्भधारणा होण्यास उशीर होतो. तर, काही शारिरीक गोष्टीही कारणीभूत असतात. पण, अशावेळी योग्य सल्ला न घेतल्याने जोडप्यांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारिरीक जाचाला सामारे जावे लागते. योग्य वयोगटातील व मुले होण्याची इच्छा असलेल्या सर्व जोडप्यांपैकी सु. ८ ते १०% जोडप्यांत वंध्यत्व ही तक्रार आढळते आणि इतर १० ते १२% जोडप्यांना इच्छा असूनही एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ शकत नाहीत. 

जर तुम्हाला वंध्यत्वाचा बळी व्हायचे नसेल वेळीच काही तपासण्या करणे गरजेचे आहे. याबद्दल इंदापूरम दिल्ली येथील इनफर्टीलिटी सल्लागार डॉ. हरिथा मान्नेम यांनी अधिक माहिती दिली आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

अल्ट्रासाऊंड

वंधत्वाची समस्या जाणून घेण्यासाठी सीरम AMH पातळी, थायरॉईड, प्रोलॅक्टिन सारख्या हार्मोनल चाचण्या कराव्या लागतात. एखाद्या समस्येचा संशय असल्यास, एचएसजी,एसएलजी सारख्या टेस्टद्वारे फॅलोपियन ट्यूबची चाचणी केली जाऊ शकते. एचएसजी गर्भाशयाच्या आत फ्लालोपियन ट्यूब्स, पॉलीप्स, फाइब्रॉइड्स, अॅडशेयन्स तपासणी करण्याची प्रक्रिया आहे.

लॅप्रोस्कोपी

लॅप्रोस्कोपीमध्ये बेंबीजवळ एक सूक्ष्म छिद्र पाडून दुर्बिण यंत्राच्या मदतीने गर्भनलिकेची तपासणी करतात या तपासणीमध्ये जननेंद्रियातील असलेले रोग अथवा अडचणी अत्यंत सूक्ष्मपणे तपासल्या जातात व गरज असल्यास तत्काळ योग्य ते उपचार करून जननेंद्रियातलेतले दोष दूर केले जातात.

अँटी-मुलेरियन हॉर्मोन (एएमएच)

रक्तातील अँटी-मुलेरियन हॉर्मोन पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या पुनरुत्पादक ऊतींमध्ये तयार होतो. एएमएचची भूमिका आणि त्याची सामान्य पातळी जोडप्यांच्या वयावर आणि लिंगावर अवलंबून असते.

ओवेरियन  रिझर्व

ओवेरियन  रिझर्व बाबतीत जर एखादी स्त्री लगेच गर्भधारणेची योजना करू शकत नसेल. तर ती बीज गोठवण्याचा पर्याय निवडू शकते. हा पर्याय सध्याच्या युगात ट्रेंडमध्ये आहे. ज्यामध्ये नको असलेले बीज गोठवून हवे त्या वेळी गर्भाशयात सोडले जातात आणि आई होण्याचे सुख मिळू शकते.

हिस्ट्रोस्कोपी

याद्वारे गर्भाशयाच्या आतील भागाचे परीक्षण करून, वैद्यकीय उपकरणाने खरवडून आतील स्तराचा भाग तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला जातो. या तपासणीमुळे स्त्री बीज निर्मितीच्या अडचणी , गर्भाशयाला काही संसर्ग झाला आहे का इत्यादी गोष्टींचे निदान करता येते.

जोडप्यांचे समुपदेशन

वंध्यत्व असलेल्या केवळ स्त्रियांचेच नव्हे; तर जोडप्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. ही त्या जोडप्याची व काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT