International Yoga Day 2024 : निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगा करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. आजकाल अनेक लोक फिटनेसबाबत जागरूक झाले आहेत. शारिरीक तंदूरूस्तीसाठी लोक विविध प्रकारचे व्यायाम, योगा, वर्कआऊटची मदत घेतात. विशेष म्हणजे मागील काही वर्षांमध्ये लोकांमध्ये योगाबद्दल आवड निर्माण झाली आहे. भारताला योगचा प्राचीन इतिहास लाभला आहे.
योगाप्रती जगभरातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि योगाचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी जगभरात २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जसजसे महिलांचे वय वाढत जाते. तसतसे त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात.
या बदलांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आज आम्ही खास योग दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी फायदेशीर असणाऱ्या योगासनांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबद्दल.
बालासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाला ‘चाईल्ड पोझ’ असे म्हटले जाते. हे योगासन महिलांसाठी अतिशय प्रभावी मानले जाते.
कारण, या आसनामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या योगासनात आपले संपूर्ण शरीर ताणले जाते. ज्यामुळे, पाठदुखी, कंबरदुखी आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय, मानसिक ताण-तणाव देखील कमी होतो.
भूजंगासन हे योगासन महिलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी प्रभावी मानले जाते. या योगासनामध्ये शरीराची स्थिती ही सापासारखी असते. त्यामुळे, या योगासनाला भूजंगासन असे म्हटले जाते.
भूजंगासनाचा सराव नियमितपणे केल्याने पाठदुखी, कंबरदुखी, मासिक पाळीतल्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. हे योगासन वयानुसारच करण्याचा सल्ला दिला जातो. खास करून वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने हे योगासन नियमितपणे करावे. संपूर्ण शरीराला ताण देण्यासोबतच आपल्या त्वचेवर चमक आणण्याचे काम हे योगासन करते.
धनुरासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. सर्व वयोगटातील व्यक्ती या योगासनाचा सराव करू शकता. परंतु, जर तुम्ही पहिल्यांदाच या योगासनाचा सराव करत असाल तर, तुम्ही योगा तज्ज्ञांची मदत नक्कीच घेऊ शकता.
ज्या महिलांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हे योगासन अतिशय उपयुक्त आहे. या आसनाच्या नियमित सरावाने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. या आसनाच्या सरावामुळे शरीराची स्थिती ही योग्य स्थितीत राहते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.