Donate The Heart To Save Two Children Life Esakal
आरोग्य

बाळाच हृदय तंदुरुस्त झालं, घर आनंदान डोलू लागलं

एक चार महिन्याची बालिका: दुसरी दोन वर्षीय

शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: सर्वसामान्य कुटूंबात नुकतीच दोन बालिका जन्माला आल्या. घरदार आनंदाने डोलू लागले पण एका बाळाला अवघ्या तिन चार महिन्यातच बाळाच्या कपाळावर, पायावर घाम यायला लागला. डॉक्टरांना दाखवले चाचण्या झाल्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे उघड झाले. कुटूंबच सुन्न झाले. पैशा पासून शाश्वत उपचारापर्यंतच्या काळजीने घरदार घेरले. अशात सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाने या बाळांच्या उपचाराची जबाबदारी घेत डॉ. अक्षय बाफना (Dr.Akshay Bafna) यांच्या पथकाने दोन बाळावर विनाछेद शस्त्रक्रीया यशस्वी केली सर्वात कमी वयाच्या बालिकेवर सीपीआरमध्ये (CPR Kolhapur)पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. (Child Health Care)

राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील आहे शेतकरी कुंटूंबातील बालिका चार महिन्यांची झाली तिला सतत सर्दी, खोकला, ताप लक्षणे वारंवार ॲडमीट करावे लागत होते. चाचण्या झाल्या तेव्हा तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे दिसले. इतक्या लहान बाळावरील शस्त्रक्रिया करणे अवघड तसेच खर्चही जास्त होता. म्हणून बालिकेचे पालक हवालदिल झाले त्यांनी सीपीआरमध्ये बालिकेला दाखवले. डॉ. बाफना यांनी तपासणी केली तेव्हा बालिकेच्या हृदयातील रोहीणी व निला या शुध्द व अशद्ध रक्त वाहिण्यामध्ये पाच एमएमचे छिद्र असल्याने शुध्द व अशुध्द रक्ताचे मिश्रण होत होते. यातून बालिकेला धाप लागणे, घाम येणे अशी हृदयविकाराची लक्षणे दिसत होती. बाळाच्या पालकाशी चर्चा करून विना छेद शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले.

याबालिकेवर वेळीच शस्त्रक्रिया झाली नाहीतर भविष्यात अनेक गुंतागुंतीचा आजाराचा सामना तिला करावा लागला असता अशा अवस्थेत शस्त्रक्रिया करणेही जोखमीची बाब होती. म्हणून बालिकेची खुली शस्त्रक्रीया न करता पायातून स्टेंन्थ टाकून विना छेद शस्त्रक्रीया केली. अवघ्या एक दिवसात बालिकेच्या सर्व हालचाली पूर्ववत झाल्या घाम येण्याचे धाप लागण्याचे प्रमाण कमी झाले. बालिका पून्हा आईच्या कुशीत खेळू लागली याचा आनंद डॉक्टरांसह त्या कुंटूंबाला झाला.

दरम्यान दोन वर्षाच्या बालिकेलाही चार एमएमचे छिद्र होते तिलाही अशीच लक्षण होती. सीपीआरच्या याच विभागात याच डॉक्टरांच्या पथकाने विनाछेद शस्त्रक्रिया यशश्वी केली. दोन्ही बालिकांची प्रकृती उत्तम आहे. दोघी बालिका आता खेळत आहेत. दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

डॉ. माजीद मुल्ला, भुपेंद्र पाटील, भूलतज्ञ डॉ. गणेश कामत, डॉ. सुधीर सरवदे, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, कुलदिप तोटेवार आदीच्या पथकाने यात सहभाग घेतला.

‘‘ शुध्द व अशुध्द रक्त वाहिणीच्यामध्ये जन्मताच झडप असते, यादोन्ही बाळाच्या झडपामध्ये छिद्र होते. त्याला पेटंट ड्क्टस आरटीरियस असे म्हटले जाते. हे जन्मल्यानंतर काही महिन्यात हे छिद्र आपोआप मिटून जाते मात्र काही मोजक्या बाळात ते मिटून जात नाही. विशेषतः मुलीमध्ये हे छिद्र बंद न होण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा दोन्ही रक्तवाहिन्यातील अशुध्द व शुध्द रक्त मिश्रीत होऊऩ हृदयाच्या बाजूला दाब वाढतो त्यातून धाप लागणे, अन्य हृदयांची लक्षणे दिसतात. अशीच छिद्रे बंद करण्यात यश मिळाले आहे.’’

डॉ. अक्षय बाफना (हदयविकार तज्ञ सीपीआर हृदयशस्त्रक्रिया विभाग )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT