students tiffin box food esakal
आरोग्य

Healthy Tiffin Box : मुलांना डब्यात पौष्टिक आहार द्या, पॅकबंद पदार्थ टाळा! आहार, बालरोग तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

Healthy Tiffin Box : जिल्ह्यात १५ जूनपासून सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा डबेचे मोठे टेन्शन आईच्या डोक्यावर असते. रोज पोळीभाजी द्यावी की नाही, यावर अनेक पालकांमध्येही मतमतांतरे दिसतात. कोणता पदार्थ द्यावा, यापेक्षा तो किती ‘पौष्टिक’ आहे, याकडे लक्ष द्यायला हवे, असा सल्ला आहार तज्ज्ञांसह बालरोग तज्ज्ञांनी दिला. (Healthy children nutritious food in box avoid packed food)

वाढत्या वयातील मुलांसाठी पौष्टिक आणि संपूर्ण आहार अत्यंत आवश्यक असतो. या संपूर्ण आहारावर मुलांची वाढ, विकास, प्रतिकारशक्ती, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता अवलंबून असते. बहुतांश मुलांची शाळा सकाळची असते. त्यामुळे शाळेचा डबा हा त्यांचा दिवसभरातील पहिला आहार ठरतो. रात्रभर झालेला उपवास आणि सकाळी शाळेमुळे मुलांना कडकडून भूक लागलेली असते. त्यामुळे पहिला आहार सात्त्विक आणि पौष्टिकयुक्त असेल, तर मुले दिवसभर उत्साही राहतात आणि त्यांची प्रतिकारशक्तीही बळकट होते, असे आहार तज्ज्ञ सांगतात.

डब्यात काय देतो आहोत आणि तोच डबा का याबाबत मुलांशी चर्चा करावी. पौष्टिक आहाराचे महत्त्व समजून सांगावे. चुकीच्या आहाराचे कसे चुकीचे परिणाम होतील, याची कल्पना मुलांना द्यावी, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला. मुलांसाठी स्टेनलेस स्टीलचाच डब्या वापरावा. कितीही चांगल्या क्वालिटीचे असले, तरी प्लॅस्टिकचा डबा वापरू नये, प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी अयोग्य आहे.

डब्यात असे द्या पदार्थ

*डब्यात पदार्थ कोरडे असावेत. कारण पाणी जास्त असलेले पदार्थ लवकर खराब होतात

*ऋतूमानानुसार मुलांच्या डब्यातील अन्नपदार्थ ठेवावे

*पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, म्हणून सहज पचतील, खायला सोपे असतील, असे पदार्थ द्यावेत

*संतुलित आहारानुसार योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, तंतूयुक्त (फायबर) पदार्थ योग्य प्रमाणात असायला हवेत. (भाज्यांचे पराठे)

*भाज्यांमध्ये भिजवलेल्या डाळी घालून भाज्यांची पौष्टिक तत्त्वे वाढवा, पदार्थ पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरावा

*मधल्या वेळेच्या छोट्या डब्यात पोहे, उपमा, उसळी देत असाल, तर त्यात भाज्या, किसलेले गाजर, हिरवे वाटाणे घालावेत

*डब्यात तव्यावर फ्राय केलेल्या भाज्या, मोड आलेल्या धान्याची उसळ देणेही योग्य ठरते. डब्यात दिलेल्या पदार्थांमुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणते घटक मिळणार, याबद्दल मुलांशी संवाद साधावा. (latest marathi news)

मुलांच्या डब्यात हे पदार्थ टाळा

*फास्ट फूड, ब्रेड, बेकरीचे पदार्थ, बिस्किटे, चिप्स देणे टाळावे

*डब्यात मॅगी वा नूडल्स, शिळे अन्न, तळलेले पदार्थ देणे टाळावे

*पॅकबंद पदार्थ, प्लॅस्टिक टिफिन, प्लॅस्टिक बॉटल देऊ नये

*ॲल्युमिनिअम पेपरच्या आवरणात पोळी, पदार्थ देऊ नयेत

*मुलांना गोड पदार्थ डब्यात देणे टाळावे, अन्यथा मुलांना शाळेत झोप येऊ शकते

*प्रक्रिया केलेले पदार्थ जसे, की टोमॅटो सॉस, मेयो पाकिटातील चटण्या देऊ नये

*फळे कापून देऊ नयेत, व्यवस्थित धुवून संपूर्ण द्यावीत, डब्यात सॅलेड देऊ नये

"मुलांना चहा, कॉफीऐवजी दूध, दुग्धजन्य पदार्थ द्यावेत. तूप लावलेली चपाती, पौष्टिक भाज्या, केळी व इतर पदार्थ द्यावेत. बाहेर खेळायला जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहनही द्यावे. प्लॅस्टिकऐवजी स्टेनलेस स्टीलचा डबा व पाणी बॉटल द्यावी." - डिंपल कोळी, आहार तज्ज्ञ

"मुलांना डब्यात सकस आहार द्यायला हवा. पचायला हलका व तेलकट नसलेला आहार दिला, तर तो आरोग्यदायी ठरतो. फळे, भाजीपाला, मोड आलेली कडधान्ये दिली पाहिजेत. फास्टफूड, पॅकेज्ड खाद्यपदार्थ अजिबात देऊ नयेत." - डॉ. संदीप पाटील, बालरोग तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT