Corneal Damage esakal
आरोग्य

Corneal Damage: कॉर्निया म्हणजे काय? कॉर्नियातील दोषामुळे अंधत्वाचा वाढता धोका; जाणून घ्या लक्षणे

Read what is Cornea & Corneal Damage : टिव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनच्या डोळ्यांना नुकतीच एक दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Corneal Damage : डोळा हा आपल्या शरीराचा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा भाग आहे. त्यामुळे, डोळ्यांची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांना थोडी जरी दुखापत झाली तरी गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे, डोळ्यांना काही जरी झाले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांकडे जाऊन लगेच उपचार करा.

टिव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनच्या डोळ्यांना नुकतीच एक दुखापत झाल्याचे समोर आले आहे. तिने एका कार्यक्रमासाठी डोळ्यांमध्ये लेन्स घातल्या होत्या. परंतु, त्यानंतर, तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला आणि तिला दिसणंही बद झालं. जस्मिनच्या डोळ्यांतील कॉर्नियाला दुखापत झाली असून, सध्या तिच्या डोळ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. तिची तब्येत सध्या स्थिर आहे.

तज्ज्ञ सांगतात की, डोळ्यांच्या कॉर्नियाला जर दुखापत झाली किंवा काही दोष निर्माण झाले तर डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते आणि व्यक्तीला अंध्यत्व येऊ शकते. हा कॉर्निया म्हणजे नेमंक काय? आणि कॉर्नियल दोषांची लक्षणे काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

कॉर्निया म्हणजे काय?

आपल्या डोळ्यांच्या वरच्या बाजूला एक नाजूक थर असतो. हा थर आपल्या डोळ्यांचा पुढचा भाग झाकण्याचे काम करतो. यालाच ‘आय कॉर्निया’ (Eye Cornea) असे म्हटले जाते. डोळ्यांमध्ये होणाऱ्या संसर्गामुळे आणि कोणत्याही प्रकारच्या दुखातीमुळे या कॉर्नियाचे नुकसान होऊ शकते किंवा त्याला इजा पोहचू शकते.

त्यामुळे, यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. कॉर्नियाला दुखापत झाल्यास त्यावर वेळीच उपचार करण्यात आले नाही तर, डोळ्यांची दृष्टी कायमची जाऊ शकते आणि व्यक्तीला अंध्यत्व येऊ शकते.

जेव्हा कॉर्नियामध्ये दोष निर्माण होतो किंवा दुखापत होते आणि दृष्टी जाण्याचा धोका असतो, त्यावेळी ही दृष्टी परत मिळवण्यासाठी कॉर्नियाचे प्रत्यारोपण करावे लागते. परंतु, नेत्रदान न झाल्यामुळे, रूग्णांना कॉर्निया प्रत्यारोपण करणे शक्य होत नाही.

कॉर्निअल दोषांची लक्षणे काय आहेत?

  • डोळ्यांची दृष्टी धूसर होणे

  • डोळे लाल होणे

  • डोळ्यांमध्ये वेदना होणे

  • डोळ्यांतून पाणी येणे

  • डोळ्यांवर पांढरे डाग पडणे

  • डोळे सतत मिचकावणे

  • डोळे मिजकावताना डोळे दुखणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT