Kapalbhati Pranayam esakal
आरोग्य

Kapalbhati Pranayam : पचनक्षमता मजबूत ठेवण्यासाठी अन् मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर कपालभाती, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kapalbhati Pranayam : आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Kapalbhati Pranayam : आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. आजकाल अनेक जण तंदुरूस्त राहण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम, योगा आणि वर्कआऊट्स करतात. योगाप्रती लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नियमित योगासनांचा सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो.

ही योगासने विविध प्रकारच्या आजारांसाठी लाभदायी ठरू शकतात. या योगासनांमध्ये प्राणायामचा ही समावेश होतो. प्राणायाम केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहते. शिवाय, दररोज प्राणायामचा सराव केल्याने, मनाची एकाग्रता, स्थिरता वाढते आणि मानसिक शांती मिळते.

यासोबतच, प्राणायाम केल्याने पचनक्रिया ही सुधारते. प्राणायामचा महत्वपूर्ण प्रकार असलेल्या कपालभातीचा दररोज सराव केल्याने पचनक्षमता सुधारण्यास आणि शारिरीक संतुलन व्यवस्थित राहण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात कपालभाती करण्याची योग्य पद्धत अन् आरोग्यदायी फायदे कोणते?

कपालभाती करण्याची योग्य पद्धत

कपालभातीचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर किंवा चटईवर पद्मासनात बसा.

त्यानंतर, दोन्ही हातांनी प्रसन्न मुद्रा करा. आता दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा.

या दरम्यान, तुमचे पोट आतील बाजूस खेचा.

जर तुम्ही पहिल्यांदाच कपालभातीचा सराव करत असाल तर केवळ ५-१० मिनिटे सराव करा आणि हळूहळू तुमच्या वेळेनुसार सराव वाढवा.

कपालभाती करण्याचे आरोग्यदायी फायदे

  • कपालभातीचा नियमित सराव केल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते.

  • श्वासोच्छवासाच्या या योगासनामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि फुफ्फुसे मजबूत होण्यास मदत होते.

  • आपल्या शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास कपालभाती मदत करते.

  • कपालभातीचा नियमित सराव केल्याने चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते.

  • कपालभातीचा नियमित सराव केल्याने शरीरातील पित्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  • शिवाय, आपली पचनक्षमता सुधारण्यासाठी मदत होते.

  • कपालभातीचा नियमित सराव केल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

  • कपालभातीचा दररोज सराव केल्याने पोटाच्या समस्या दूर करण्यास आणि पचनक्षमता तंदुरूस्त राहण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT