Keep weight under control before pregnancy Obesity increases risk of childbirth health  sakal
आरोग्य

Weight : गर्भधारणेपूर्वीच वजन ठेवा आटोक्यात; वाढती स्थूलता प्रसूतीसाठी ठरते अडसर

तज्ज्ञांचा सल्ला : मातेचा लठ्ठपणा हा आई आणि बाळ दोघांवरही घातक परिणाम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आईच्या स्थूलतेचे वाढते प्रमाण हे प्रसूतीमध्ये महत्त्वपूर्ण अडथळा निर्माण करते. मातेचा लठ्ठपणा हा आई आणि बाळ दोघांवरही घातक परिणाम करू शकतो. मातांसाठी गर्भधारणा संबंधित समस्यांमध्ये गर्भारपणातील मधुमेह आणि प्रीक्लेम्पसिया यांचा समावेश होतो.

त्यांच्या बाळाला पुरेशा प्रमाणात पोषक द्रव्ये मिळावी याकरिता महिलांनी त्यांचा पोषण आहार वाढवणे महत्त्वाचे आहे. विशेषत: लठ्ठ स्त्रियांच्या बाबतीत, ज्यांच्यासाठी जास्त वजनामुळे होणाऱ्या समस्या टाळण्याबरोबरच निरोगी आहाराची जोड दिली पाहिजे.’’ असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

गर्भधारणेमुळे शरीरावर खूप ताण येतो. हळूहळू जसा गर्भ वाढतो तसा ते आईच्या विविध अवयवांवर ताण पडतो. लठ्ठपणामुळे आईच्या शरीरावर आधीच ताण असतो, तेव्हा गर्भधारणेच्या दबावामुळे अनेक गुंतागुंत होऊ शकतात. ज्या महिलांचे वजन जास्त आहे किंवा लठ्ठ आहेत त्यांना गरोदरपणात उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते.

काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, उच्च रक्तदाब यकृत किंवा मूत्रपिंडासारख्या अवयव प्रणालींना हानी पोहोचवू शकतो, ही स्थिती प्री-एक्लॅम्पसिया म्हणून ओळखली जाते. गरोदरपणातील मधुमेह ही महिलांसाठी आणखी एक समस्या आहे. हे गर्भधारणेदरम्यान विकसित होणाऱ्या मधुमेहाचा संकेत देते. उपचार न केल्यास, गर्भावस्थेतील मधुमेहामुळे नवजात आणि आई दोघांनाही त्रास होऊ शकतो.

समस्या

  • लठ्ठ महिलांना गर्भारपणात मधुमेह जडण्याची शक्यता अधिक

  • गर्भधारणेदरम्यान फुप्फुस किंवा हृदयासंबंधित गुंतागुंत होऊ शकते

  • गर्भपात, हृदयरोग आणि निद्रानाशाची शक्यता वाढते

  • सामान्य महिलांच्या तुलनेत लठ्ठ महिलांना सिझेरियनची गरज

लठ्ठ महिलांना गर्भारपणात मधुमेह जडण्याची शक्यता सामान्य महिलांपेक्षा तिपटीने अधिक असते. संपूर्ण गर्भधारणेदरम्यान, स्त्रियांना फुफ्फुस किंवा हृदयाशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते, जी घातक ठरू शकते. लठ्ठपणामुळे सी-सेक्शन प्रसूतीचा धोकाही वाढतो, असे तज्ज्ञांच्या संशोधनानुसार समोर आले आहे.

- डॉ. सुश्रुता मुकादम, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल

गर्भधारणेदरम्यान लठ्ठपणा हा अनेक समस्यांशी निगडित असल्याने हा उच्च जोखमीचा आजार मानला जातो. लठ्ठ लोकांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असते. गर्भधारणा झाल्यानंतर त्यांना न्यूरल ट्यूबच्या समस्यांसह गर्भपात आणि गर्भाच्या विकृतीची शक्यता असते. लठ्ठ स्त्रियांना गरोदरपणामुळे होणारा उच्च रक्तदाब, गर्भधारणेचा मधुमेह, थ्रोम्बोइम्बोलिझम, मॅक्रोसोमिया याशिवाय आधीच अस्तित्वात असलेला मधुमेह मेल्तिस आणि दीर्घकालीन उच्चरक्तदाबाच्या समस्या असतात. लठ्ठ महिलांना सामान्य महिलांच्या तुलनेत सिझेरियनची आवश्यकता भासते.

- डॉ. नितीन गुप्ते, स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पोक्ट्रा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT