Best Eye Hospital in Maharashtra Esakal
आरोग्य

Best Eye Hospital: डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटल शोधताय? मग हे वाचा...

Kirti Wadkar

Best Eye Hospital in Maharashtra: अनेकदा वाढत्या वयानुसार दृष्टीवर परिणाम होतो. तसचं काही इतर कारणांमुळे देखील डोळे आणि दृष्टीसंबधी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

मात्र अलिकडे भारतातही डोळे Eyes आणि दृष्टीसंबधीच्या सर्व समस्या आणि आजारांवर Diseasesअत्याधुनिक उपचार उपलब्ध झाले आहेत. Know about Affordabel Eye Hospitals in Maharashtra

खास करून डोळ्यांशी संबधीत आजारांमध्ये मोतीबिंदूची Cataract समस्या वाढताना दिसतेय. याचसोबत कॉर्नियल प्रत्यारोपण, काचबिंदू शस्त्र क्रिया, डोळ्याच्या Eyes पडद्याची शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील Maharashtra अनेक रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. 

हे देखिल वाचा-

डोळ्यांशी संबंधीत अनेक शस्त्रक्रिया Operations तर अलिकडे लेझरच्या मदतीने केल्या जातात. त्यामुळे जोखमी कमी झाली आहे. डोळ्यांसंबधीत सर्व उपचार महाराष्ट्रातही उपलब्ध असले तरी या उपचारांवरील खर्च देखील मोठा असतो. त्यामुळे डोळ्यांचं ऑपरेशन करायचं म्हंटलं तर ते कुठे करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. 

महाराष्ट्रात अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहे. या ठिकाणी स्वस्तामध्ये उपचार होणं शक्य आहे.

त्याचसोबत काही खासगी रुग्णालयांमध्ये देखील विविध योजनांचा किंवा शिबिरांचा लाभ घेऊन तुम्ही डोळ्यांचं ऑपरेशन करू शकता. यातील काही रुग्णालयांचे पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुंबईतील रुग्णालये

नानावटी सुपरस्पेशलिटी हॉस्पीटल- नानवटी हॉस्पिटल हे  मुंबईतील NABH-MIS अधिमान्यता प्राप्त एकमेव हॉस्पीटल आहे. इथ डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया केल्याजाता.

त्यासाठी संपूर्ण अडव्हान्स टेक्नॉलजी रुग्णालयात उपलब्ध आहे. मुंबईतील विलेपार्ल्यामध्ये असलेल्या या रुग्णालयामध्ये अल्पदरामध्ये डोळ्यांचं ऑपरेशनची सुविधा उपलब्ध आहेत. 

बॉम्बे सिटी आय इन्स्टिट्यूट - बॉम्बे सिटी आय इन्स्टिट्यूट ऍण्ड रिसर्च सेंटरमध्ये डोळ्यांच्या उपचारांसाठी अद्यावत सेवा उपलब्ध आहेत. डोळ्यांचे सर्व प्रकारचे उपार यासाठी अल्प दरात करणं शक्य आहे.

डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात कुशल डॉक्टरांची मोठी टीम आहे. रुग्णालयात वेळोवेळी डोळ्यांच्या तपासणीसाठी आणि उपचारांसाठी विविध शिबिरं राबवली जातात. यात अत्यल्प किंवा अनेकदा मोफत उपचार केले जातात. Eye hospital in mumbai

जसलोक हॉस्पिटल- जसलोक हॉस्पिटल दे देशातील अत्यंत जुनं आणि लोकप्रिय हॉस्पिटल आहे.  DCR आणि एंडो-लेसर शस्त्रिक्रियांसारख्या सेवा या रुग्णालयात उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या अत्याधुनिक सेवा इथं उपलब्ध आहेत. जसलोक ट्रस्टमधून तुम्ही अत्यंत कमी खर्चात डोळ्याचं ऑपरेशन करू शकता. 

या हॉस्पिटल्सशिवाय जे.जे हॉस्पिटल, लोटस आय केअर, ऑरबीट हॉस्पिटल, श्रॉफ हॉस्पिटल, नवी मुंबईतील डी.वाय. पाटील रुग्णालय आणि लोकमान्य हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये अल्प दरामध्ये डोळ्याचं ऑपरेशन होवू शकतं. 

हे देखिल वाचा-

पुण्यातील रुग्णालये

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजी- पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजी हे पुण्यातील बेस्ट हॉस्पिटल्सपैकी एक डोळ्याचं रुग्णालय आहे. डोळ्यांच्या सर्व समस्यांचं निराकारण इथं होतं.

शिवाजी नगर इथं असलेल्या या रुग्णालयात कची खर्चामध्ये डोळ्यांवरील उपचार होतात. Cheap eye operation in pune 

एशियन आय हॉस्पिटल- पुण्यातील विमान नगर इथं असलेलं एशियन आय हॉस्पिटल एक नावाजलेलं रुग्णालय असून इथं डोळ्यावरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचप्रमाणे लेझर ट्रीटमेंटदेखील केली जाते. 

यासोबतच पुण्यातील ससून रुग्णालय , नवले सिंहगड वैदकिय महाविद्यालय, भारती विद्यापीठ या ठिकाणी अप्ल दरामध्ये डोळ्याचे उपचार उपलब्ध आहेत. 

त्याचप्रमाणे मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉल हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, संचेती, सह्याद्री हॉस्पिटल,जहांगीर रुग्णालय तसचं रत्ना मेमोरियल हॉस्पिटल अशी अनेक बडी रुग्णालय ही धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येतात.

म्हणजेच या रुग्णालयात १० टक्के खाटा या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांसाठी राखीव असतात. अशा रुग्णांना उपचारांमध्ये ५० टक्के सवलत मिळते. Pune eye hospital list 

डोळ्यांच्या उपचारांसाठी तुम्ही धर्मादाय आयुक्तालयाअंतर्गत येणारं एखादं मोठं रुग्णालयही निवडू शकता. यासाठी सरकारी योजनांची माहिती करून घेऊन तुम्ही उपचारांमध्ये सवलत मिळवू शकता. 

औरंगाबाद - प्लास्टिक सर्जरी, पापण्यांचे आजार, डोळ्यांच्या मागे गाठ येणे, तिरळेपणा व इतर क्लिष्ट शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयातील नेत्र विभागात अत्यल्प खर्चात होणार आहेत. यशस्वी शस्त्रक्रियांसाठी विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे यांनी यांनी पुढाकार घेतला आहे.

‘ऑक्युलो प्लास्टिक सर्जरी’ म्हणजेच डोळ्यांच्या प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया हा नेत्ररोगांसंबंधात सुपर स्पेशालिटी विषय समजला जातो. याअंतर्गत डोळ्यांची विविध व्यंगे दूर करण्याचा प्रयत्न होतो.

चांगली दृष्टी येण्याबरोबर चेहरा चांगला दिसण्याच्या दृष्टीनेही या शस्त्रक्रिया केल्या जातात. खासगी रुग्णालयांमध्ये या विविध शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च येतो. या खर्चाला फाटा मिळणार असून, आता सर्वसामान्य रुग्णांनादेखील उपचार करता येईल

श्रॉफ आय हॉस्पीटल मुंबई हे जुनं हॉस्पिटलल आहे. १९७३ सालातील हॉस्पीटल, मुंबईतील पहिलं हॉस्पिटल जिथं डोळ्याच्या उपचारांवरील सर्व सुविधा सर्वप्रथम उपलब्ध झाल्या होत्या. २ सेंटर, वांद्रे वेस्ट आणि मरीन ड्राइव्ह उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT