प्रेग्नन्सीमध्ये उपयुक्त अॅप Esakal
आरोग्य

प्रेग्नन्सीमध्ये हे App करतील तुमची मदत, अॅपच्या मदतीने करा Health Tracking

काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या वेळी कशी काळजी घ्यावी. कोण कोणत्या महिन्यांमध्ये डॉक्टरांना भेटून सोनोग्राफी किंवा इतर तपासण्या करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवणं कठिण जातं. अशा वेळी गरोदर महिला काही अॅप्सची मदत घेऊ शकतात

Kirti Wadkar

गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी खास काळ असतो. या काळात मातृत्वाच्या भावना जागृत होवू लागतात. या काळामध्ये महिलांचं शरीर आणि मन अनेक बदलांना समोरं जात असतं. अशा काळामध्ये दैनंदिन जीवनातील कामं सांभाळून महिलांना आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. Know about apps to track various stages in pregnancy

आपल्या गर्भातील बाळ सुखरुप आणि निरोगी राहवं यासाठी महिलांना प्रत्येक दिवशी आहारासह Diet अनेक गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. अनेकदा महिलांना गरोदरपणामध्ये Pregnancy विविध समस्यांना देखील सामोरं जावं लागत असतं. चक्कर, मळमळ, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होत असतात.

काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या वेळी कशी काळजी घ्यावी. कोण कोणत्या महिन्यांमध्ये डॉक्टरांना भेटून सोनोग्राफी किंवा इतर तपासण्या करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवणं कठिण जातं. अशा वेळी गरोदर महिला काही अॅप्सची मदत घेऊ शकतात.

काही अॅपच्या मदतीन गरोदर महिलाना संपूर्ण गरोदरपणात कशा प्रकारे काळजी घ्यावी, एखाद्या समस्येवर कशा प्रकारे उपाय करावेत, कोणता आहार घ्यावा, डॉक्टरांना केव्हा भेटावं या सगळ्यांची माहिती मिळू शकते. या अॅप्समुळे प्रेग्नन्सीमधील प्रत्येक टप्प्यांमध्ये महिलांना तज्ज्ञांनी पुरवलेली विविध माहिती मिळवणं शक्य होतं. हे अॅप्स कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत.

हे देखिल वाचा-

प्रेग्नन्सी ट्रॅकर- गुगुल प्ले स्टोरवर Pregnancy Tracker हे अॅप उपलब्ध असून या अॅपला ४.९ रेटिंग मिळालं आहे. तसचं ५ मिलियनहून अधिक युजर्सनी डाउनलोडही केलं आहे. या अॅपमध्ये गरदोर महिलांमध्ये प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या बदलांसोबतच गर्भाच्या वाढीची माहिती पुरवण्यात येते.

तसंच यामध्ये गर्भारपणात घ्यायचा योग्य आहार तसचं काही व्यायामही सांगण्यात येतात. या अॅपमुळे गर्भातील बाळाच्या वाढीची माहिती तुम्हाला मिळू शकते. आईसाठी आणि बाळासाठी वेगवेगळी माहिती पुरवण्यात येते. इथं तुम्ही विविध नोंदी देखील ठेवू शकता.

My Pregnancy – Baby Tracker: या अॅपलादेखील अनेक युजर्सनी पसंती दिली आहे. जवळपास १ मिलियनहून अधिक युजर्सनी आजवर या अॅपचा वापर केला आहे. या अॅपमध्ये तुम्हाला गरोदरपणाच्या अगदी पहिल्या आठवड्यापासूनची प्रत्येक आठवड्यात विविध माहिती पुरवली जाते.

यात आठवड्यानुसार होणारी गर्भाची वाढ आणि शरीरात होणारे बदल यासंदर्भातील माहिती पुरवली जाते. गरोदर महिलांनी प्रत्येक आठवड्यात काय करावं आणि काय करू नये याबद्दलच्या टिप्स दिल्या जातात. त्याचसोबत गर्भातील बाळाचं वजन, त्याच्या वाढीची माहिती मिळते.

Pregnancy Tracker & Baby Guide- प्रेग्नन्सी ट्रॅकर अॅण्ड बेबी गाइड अॅपमुळे तुम्हाला गरोदरपणात आवश्यक अशी महत्वाची माहिती मिळू शकते. यामध्ये बाळाच्या जन्मापर्यंत शरीरात होणारे बदल आणि वेळोवेळी घ्यायची काळजी याबद्दलच्या टिप्स मिळतात.

गरोदरपणात घ्यायचा पोषक आहार तसचं प्रसूतीवेळी त्रास कमी व्हावा यासाठी देखील खास टिप्स देण्यात येतात. तसचं प्रेग्नन्सीमध्ये करायचे विविध व्यायाम, प्रसूतीनंतर कोणती काळजी घ्यावी, बाळाचं संगोपन याची माहिती देण्यात आली आहे.

Pregnancy tracker week by week- या अॅपमध्ये देखील तुम्हाला गरोदरपणामध्ये प्रत्येक आठवड्याला होणाऱी बाळाची वाढ तसंच आईने घ्यायची काळजी याबद्दल माहिती पुरवण्यात येते. तसंच प्रसूतीची तारीख, रोजच्या टिप्स देण्यात येतात.

अशा अॅप्सच्या मदतीने गरोदर महिलांना योग्य आहार घेणं तसंच योग्य व्यायाम आणि अनेक टिप्सच्या मदतीने गर्भारपणातील काळ चांगला जाण्यास मदत होवू शकते.

टीप - हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय, व्यायाम किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT