Health Checkup  Sakal
आरोग्य

Health Checkup : फुल बॉडी चेकअप करायचंय? जाणून घ्या किती प्रकारच्या असतात टेस्ट

प्रत्येकाला आपण स्वतः आणि त्यासोबतच आपलं कुटूंब निरोगी राहावं असं वाटत असतं.

सकाळ डिजिटल टीम

How Much Test Required For Full Body Test : प्रत्येकाला आपण स्वतः आणि त्यासोबतच आपलं कुटूंब निरोगी राहावं असं वाटत असतं. निरोगी राहण्यासाठी जीवनशैली आणि आहार जेवढा महत्त्वाचा आहे. तितकेच महत्त्वाचे शरिराची नियमित तपासणीदेखील महत्त्वाची आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

ज्याप्रमाणे आपण शरिर निरोगी रहावे यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे शरिराचीदेखील नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. असे म्हटले जाते की, उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. ही बाब लक्षात घेत प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण शरिरासाठी नेमक्या किती चाचण्या कराव्या लागतात याबाबत माहिती सांगणार आहोत.

भारतात खूप कमी लोक आहेत जे नियमितपणे संपूर्ण शरीराची तपासणी करून घेतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वर्षातून एकदा किंवा दोनदा संपूर्ण शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे. जर, तुमचे वय ५० किंवा ६० पेक्षा जास्त असल्यास या वयातील व्यक्तींनी वर्षातून दोनदा संपूर्ण शरीर तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Health Department

संपूर्ण बॉडी चेकअप करण्याचे फायदे

संपूर्ण बॉडी चेकअपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील कोणताही आजार किंवा समस्या यामुले वेळेत ओळखली जाऊ शकते. यामुळे त्या आजारावर वेळीच उपचार करून प्रतिबंध केला जाऊ शकतो.

बहुतेक संपूर्ण शरीर तपासणीमध्ये डॉक्टर प्रथम व्यक्तीचे वजन आणि उंची मोजतात. यानंतर शरीरातील रक्तदाब आणि ऑक्सिजनच्या पातळीसह हृदयाची ठोके मोजले जातात. यानंतरच डॉक्टरांकडून संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात.

संपूर्ण शरीर तपासणीमध्ये प्रामुख्याने 7 ते 8 चाचण्या केल्या जातात, ज्यामुळे व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचे अवलोकन केले जाऊ शकते. डॉक्टरदेखील सर्व प्रथम एखाद्या व्यक्तीला संपूर्ण शरीर तपासणीमध्ये आवश्यक असलेल्याच 7 ते 8 चाचण्या करण्याचा सल्ला देतात.

शरीरासाठी आवश्यक आहेत या आठ चाचण्या

संपूर्ण बॉडी चेकअपमध्ये व्यक्तीची लघवी, कान-नाक- आणि डोळ्यांची तपासणी केली जाते. तसेच रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, कॅन्सर टेस्ट, ब्लड टेस्ट आदी केल्या जातात.

संपूर्ण बॉडीचेकअपमध्ये सर्वात प्रथम रक्ताची तपासणी केली जाते. टेस्टमध्ये ही सर्वात महत्वाची चाचणी आहे. याच्या मदतीने व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिन, पॉलिमॉर्फ्स, लिम्फोसाइट, मोनोसाइट, प्लेटलेट्स इत्यादींची पातळी मोजली जाते. शुगर, कोलेस्टेरॉल इत्यादी फक्त रक्त तपासणीद्वारे तपासले जातात. यानंतर लघवीची चाचणी केली जाते. ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील ग्लुकोज आणि प्रथिनांचे प्रमाण किती आहे हे समजते.

हृदयाच्या चाचणीसाठी ईसीजी चाचणी केली जाते. डोळ्यांचे आरोग्य कसं आहे हे तपासण्यासाठी डोळ्यांची तपासणी केली जाते. यामध्ये अंधत्व, मायोपिया इत्यादी स्थितीची कल्पना येते. यासोबतच कानाची ऐकण्याची क्षमताही तपासली जाते.एक्स-रे आणि स्कॅन या टेस्ट काही परिस्थितींमध्येच करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

प्रथिने, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, बिलीरुबिन, एसजीओटी इत्यादी चाचण्या यकृताचे आरोग्य कसं आहे हे तपासण्यासाठी करतात. या चाचणीला एलएफटी असेही म्हणतात. संपूर्ण शरीर तपासणीमध्ये कर्करोगाशी संबंधित चाचण्याही केल्या जातात. कारण एका वयानंतर महिला आणि पुरुष दोघांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो. किडनी संबंधित चाचण्यांसाठी किडनी फंक्शन टेस्ट केली जाते. किडनीशी संबंधित चाचण्या या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार कराव्यात

कोणत्या वयात कोणत्या टेस्ट कराव्यात

आरोग्य तज्ञांच्या मते, प्रत्येक वयाच्या व्यक्तीने वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. 18 वर्षांनंतर प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आवश्यक आहे. ज्यामध्ये रक्तदाब, बायोमास इंडेक्स यासारख्या सामान्य चाचण्या केल्या जातात. त्याचप्रमाणे 25 ते 45 वयोगटातील लोकांना लिपिड प्रोफाइल, शुगर टेस्ट, ईसीजी इत्यादी आवश्यक चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. फुल बॉडी चेकअपमध्ये किती चाचण्या कराव्यात हे पूर्णपणे तुमच्या शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच तुम्हाला कोणत्या चाचण्यांची गरज आहे हे सांगता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT