तुमचा श्‍वास लागतो? जाणून घ्या कोरोना-ओमिक्रॉनसंबंधीची 'ही' लक्षणे esakal
आरोग्य

तुमचा श्‍वास लागतो? जाणून घ्या कोरोना-ओमिक्रॉनसंबंधीची 'ही' लक्षणे

तुमचा श्‍वास लागतो? जाणून घ्या कोरोना-ओमिक्रॉनसंबंधीची 'ही' लक्षणे

सकाळ वृत्तसेवा

सुमारे दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाल्यापासून विषाणूजन्य रोगाची काही स्पष्ट लक्षणे दिसू लागली आहेत.

Omicron व्हेरिएंट नवीन आहे आणि हा विषाणू कसा वाढतो, लक्षणे काय आहेत आणि त्याला अटकाव करण्यासाठी सध्याच्या लसी किती प्रभावी आहेत हे समजून घेण्यासाठी संशोधक अजूनही त्याचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. तथापि, प्रारंभिक अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे, की ज्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला दुसरी लाट आली त्या डेल्टा (Delta) व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या लक्षणांबाबत. (Know the symptoms caused by Corona-19 and Omicron)

ओमिक्रॉनमुळे श्वासोच्छ्वासात अडथळ्याचे 'हे' आहे खरे कारण

सुमारे दोन वर्षांपूर्वी कोरोना (Covid-19) व्हायरसची (Virus) उत्पत्ती झाल्यापासून विषाणूजन्य रोगाची (Viral Diseases) काही स्पष्ट लक्षणे दिसू लागली आहेत. वेळोवेळी उद्‌भवलेल्या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे देखील कमी-अधिक प्रमाणात समान चिन्हे दिसून आली. श्वास लागणे (Respiratory Problems) हे त्यापैकी एक आहे. परंतु कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन, ज्यामुळे काही आठवड्यांत जगभरातील पॉझिटिव्ह केसेसमध्ये तीव्र वाढ झाली आहे. त्यामुळे कदाचित श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसू शकतात, असे एम्सच्या (AIIMS) डॉक्‍टरांनी सुचवले आहे.

कोरोनामुळे का उद्‌भवते श्वासोच्छ्वासाची समस्या?

COVID-19 हा वरच्या श्वसनसंस्थेचा (Respiratory System) आजार आहे आणि फुफ्फुसात (Lungs) वाढतो. हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू श्वास घेत असताना फुफ्फुसात प्रवेश करतो आणि फुफ्फुसांना आणि अल्व्होलींना (Alveoli) (लहान हवेच्या पिशव्या) थेट नुकसान करतो. विषाणू अल्व्होलस आणि केशिकाच्या पातळ भिंतीला हानी पोहोचवतो. प्लाझ्मा प्रोटीन (Plasma Proteins) असलेले खराब झालेले ऊतक (Tissue)) अल्व्होलसच्या भिंतीवर जमा होऊ लागते, ज्यामुळे अस्तर घट्ट होते. मार्ग अरुंद झाल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लाल रक्तपेशींचे (Red Blood Cells) रक्ताभिसरण प्रतिबंधित होते, ज्यामुळे अखेरीस श्वासोच्छ्वासाची समस्या उद्‌भवते.

का होऊ शकत नाही Omicron श्वासोच्छ्वासाची समस्या?

COVID-19 च्या बहुतेक प्रकरणांमध्ये, विषाणू फुफ्फुसांमध्ये वाढतो, ज्यामुळे श्वासोच्छ्वासाच्या समस्या उद्भवतात. परंतु ओमिक्रॉनच्या बाबतीत हे शक्‍य आहे की विषाणू घशात मल्टिप्लाइंग करत आहे. एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे (AIIMS Community Medicine) प्राध्यापक डॉ. पुनेट मुसरा (Dr. Punnet Musra) यांनी सांगितले की, विशिष्ट विषाणूच्या प्रकारात मूळ स्ट्रेनपासून (Strain) वेगळी लक्षणे दिसणे असामान्य नाही. ओमिक्रॉन प्रकारातही तेच आहे. कोरोना व्हायरसच्या या नवीन स्ट्रेनमुळे इतर प्रकारांप्रमाणे श्वासोच्छ्वासाचा त्रास होत नाही, कदाचित तो फुफ्फुसांमध्ये मल्टिप्लाइंग करत नसल्यामुळे. यामुळे फुफ्फुसांवर ओमिक्रॉन संसर्गाचा प्रभाव कमी होतो. तसेच, ओमिक्रॉन व्हेरिएंट पसरत असलेल्या जगभरातील बहुतांश ठिकाणांवरून घशावर परिणाम होत असल्याची नोंद करण्यात आली आहे, ज्यावरून हे सिद्ध होते की व्हेरिएंट तेथे मल्टिप्लाइंग करत आहे.

ओमिक्रॉनची तीव्रता किती?

Omicron व्हेरिएंट नवीन आहे आणि हा विषाणू कसा वाढतो, लक्षणे काय आहेत आणि त्याला अटकाव करण्यासाठी सध्याच्या लसी किती प्रभावी आहेत हे समजून घेण्यासाठी संशोधक (Researcher) अजूनही त्याचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. तथापि, प्रारंभिक अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे, की ज्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला दुसरी लाट आली त्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. डॉ. मुसरा यांनी स्पष्ट केले, की ओमिक्रॉन घशात वाढल्याने गंभीर न्यूमोनिया होत नाही. ओमिक्रॉनची लक्षणे डेल्टापेक्षा अगदी सौम्य आहेत, परंतु मागील व्हेरिएंटपेक्षा ते 7 पटीने संक्रमित होत आहे. याचा अर्थ अधिक लोकांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे परंतु गंभीर लक्षणे किंवा रुग्णालयात दाखल किंवा मृत्यू होऊ शकत नाही. स्पष्ट निष्कर्ष काढण्यासाठी Omicron वर बरेच संशोधन आवश्‍यक आहे.

ओमिक्रॉनची इतर लक्षणे कोणती?

घसा खवखवणे याशिवाय ओमिक्रॉनच्या इतर लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि शरीरातील वेदना यांचा समावेश होतो. ही तिन्ही कोरोनाची सुरुवातीची लक्षणे मानली जातात. इतर प्रकारांप्रमाणे या नवीन प्रकारात श्वास लागणे, उच्च दर्जाचा ताप किंवा वास किंवा चव कमी होणे देखील होत नाही. लस उत्पादक अजूनही त्यांच्या संबंधित लसींची परिणामकारकता निश्‍चित करण्यासाठी, त्यांची चाचणी घेण्यासाठी स्ट्रेनचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT